आंदोलन स्थगित केलंय थांबवलं नाही, उपोषण सोडल्यानंतर काय म्हणाले लक्ष्मण हाके

सरकारच्या शिष्टमंडळाने आज ओबीसी नेत्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. या भेटीनंतर आणि चर्चेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. उपोषण मागे घेत असलो तरी ते संपलं नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

आंदोलन स्थगित केलंय थांबवलं नाही, उपोषण सोडल्यानंतर काय म्हणाले लक्ष्मण हाके
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 4:07 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं अखेर उपोषण सोडले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी भेट देत सरकारचं म्हणणं मांडलं. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर आम्ही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून हाके यांचं उपोषण सुरू होतं. शासनाचं शिष्टमंडळाला उपोषण मागे घेण्यास यश आलं आहे.

उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘एक-दोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावर सरकाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाचं शिष्टमंडळाला विनंती आहे. गेल्या तीन वर्षापासून पंचायत राजमधील आरक्षण पेंडिग आहे. आमचे ५६ हजार गावे वंचित आहे. एक हजार पंचायत सदस्य भेटून गेले आहेत. शासनाने कोर्टात काही विनंती केली पाहिजे. हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. सरकारला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. याचा अर्थ आम्हाला कळत नाही. त्याला डावललं जात आहे हे समजू नये. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. आताचं आंदोलन स्थगित करत आहोत.’

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, ‘राज्य सरकारने आमच्या मांडलेल्या मागण्या त्यातील दोन मागण्या मंजूर केल्या आहेत. दोन मागण्याबाबत तांत्रिक कारण आहेत. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश यायचा आहे. सर्व पक्षीय बैठक घेतल्याशिवाय अध्यादेश काढणार नाही असं सरकारने सांगितलं. बोगस कुणबी सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे यांच्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. ज्या सरकारने प्राधान्य क्रमाने प्रमाणपत्र दिले. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही त्याच्यावर आता विश्वास ठेवणार नाही. आम्ही त्यावर लाखो हरकती दाखल केल्या आहेत. त्याबाबतची श्वेत पत्रिका काढा. आमचं आंदोलन थांबलेलं नाही. आंदोलन स्थगित केलं आहे.’

‘बोगस सर्टिफिकेट जे दिले. सरकारच्या संरक्षणात दिले. अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊन. विक्रमी वेळात दिले. ते बोगस दाखले आहेत. त्यावर आमच्या हरकती आहे. त्याची श्वेत पत्रिका जाहीर करा आणि अॅक्शन टेकन रिपोर्ट द्या. त्या मुद्द्यावर आम्ही नाराज आहोत. त्यावर आम्ही आंदोलन करणार आहे. पंचायत राजमध्ये आमचं ५६ हजाराचं आरक्षण गेलं आहे. ते आरक्षण देणार की नाही कि ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहे. हे सरकारने स्पष्ट करावं.”

‘आमचं आंदोलन थांबलं नाही. सुरूच राहील. आम्हाला त्यांनी बैठकीला बोलावलं आहे. हे आंदोलन आता कंटिन्यू सुरू राहील. या लेखी दिलेल्या पत्राचं ३० ते ४० टक्के यश मानतो. हे सरकार काठावर पास झालं आहे. आम्ही विजयी झालो नाही. पण आमच्या आंदोलनाकडे लक्ष वळवण्यात यशस्वी झालो ओहोत. बाळासाहेब सराटे हा प्राणी नवीन नवीन कल्पना मांडतो. वेगळं मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं.’ असं ही हाके म्हणालेत.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.