Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात आधी वादळ आणि अवकाळी पाऊस, आता तापमानाचा पारा भडकला; या उच्चांकी तापमानाची नोंद

राज्यात तापमानात वाढ झाली. आधी अवकाळी पावसाने झोडपले. आता उन्हाचा पारा भडकला. त्यामुळे नागरिक हैराण झालेत. पाहुण्यात राज्यातील तापमानाची परिस्थिती.

राज्यात आधी वादळ आणि अवकाळी पाऊस, आता तापमानाचा पारा भडकला; या उच्चांकी तापमानाची नोंद
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 8:01 PM

मुंबई :  महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले त्यातच आता. वेधशाळेने दर्शविलेल्या आपल्या अंदाजानुसार पावसाने जोर धार हजेरी लावल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र पावसानंतर आता पुन्हा परिसरात ढगाळ वातावरण असले तरी सूर्य नारायणाने आग ओकण्याला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. राज्यातील बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांना बसू लागलाय. मुंबईत तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत चढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत सध्या तापमान ३१ डिग्री सेल्सियसवर पोहचलंय तर हवेतील आर्द्रता ४१ वर नोंद झालीय.

परभणी शहराचा जिल्ह्याच्या तापमानात वाढ

परभणीचे तापमान 40 च्या पुढे गेल्याने गर्मीचा सामना करावा लागतोय. मागच्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तापमानात घट निर्माण झाली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक गर्मीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना करत आहेत.

Temperature 2 n

हे सुद्धा वाचा

शहापुरात तापमान चाळीशी पार

शहापूर तालुक्यात सूर्य नारायण कोपल्याने नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही होत आहे. लहान मुलांसह वयोवृद्ध माणसं या उष्म्याने हैराण झाले आहेत. तापमान ४० अंशाच्या वर गेले.

मार्च महिना लोटल्यानंतरही चंद्रपूरचा खास उन्हाळा सुरू झालेला नव्हता. ठरावीक अंतराने येणारी वादळे -अवकाळी पाऊस यामुळे चंद्रपूरचा पारा 38 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहिला. मात्र गुरुवारी अचानक यात वाढ झाली. 43.2 असे उच्चांकी तापमान नोंदवत चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून गणले गेले.

Temperature 3 n

मालेगावच्या तापमानात वाढ

आज मालेगाव शहरासह परिसरात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला. पारा ३९.०२ अंशावर चढला आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. ढगाळ वातावरण असले तरी उन्हाची वाढलेल्या तीव्रतेमुळे रस्ते निमनुष्य झाले आहेत.

तापमान 43.3 अंशावर पोहोचले

जळगाव जिल्ह्यात हॉट सिटी समजल्या जाणाऱ्या भुसावळ शहराचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 40 पार राहिला. भुसावळ मध्ये 41. 6 अंश तापमान झाले होते. फेब्रुवारी महिन्यापासूनच भुसावळच्या तापमानाने चाळीस ओलांडली आहे. वातावरणात बदल झाला. त्यामुळे तापमान 43.3 अंशावर पोहोचले आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये उष्णतेत वाढ झाली असून तापमानाचा पारा 39 अंशावर पोहचला आहे. सकाळी कडक ऊन तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहतंय. महत्त्वाचं म्हणजे ढगाळ वातावरण असलं तरी उष्णता कायम असल्याने जीवाची लाही लाही होत आहे. दुपारी बारा वाजे नंतर घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसले आहे.

गोंदिया @ 40.4 डिग्री सेल्सिअस

गोंदिया जिल्ह्यात एप्रिल महिना आता अर्ध्यावर आला. एवढा काळ अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आरामात निघून गेला. काल जिल्ह्याचे कमाल तापमान 40.4 अंशावर पोहोचले होते. हे यंदाचे सर्वाधिक तापमान नोंदण्यात आले. यानंतर आता पुढील काळ आणखी कठीण राहणार, यात शंका वाटत नाही.

नांदेडमध्ये मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने वातावरणात ओलावा टिकून होता. त्यामुळे आजवर उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नाही. मात्र आता नांदेडचे कमाल तापमान 40 अंशावर पोहोचल्याने उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झालीय. उन्हाच्या या तिव्रतेपासून वाचण्यासाठी नांदेडकर अनेक उपाययोजना राबवत आहेत.

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.