मोठी बातमीः देशातील सर्वात रूंद बोगदे ऐतिहासिक वेळेत पूर्ण; कसारा घाट फक्त 5 मिनिटांत पार, मुंबई आणखी जवळ

देशातील सर्वात रूंद (widest tunnel) म्हणून ओळखले जाणारे दोन बोगदे इगतपुरीजवळील कसारा घाटात (Kasara Ghat) विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भारतीय अभियांत्रिकी इतिहासात पहिल्यांदाच (Historical record) असा भीमपराक्रम झाला आहे.

मोठी बातमीः देशातील सर्वात रूंद बोगदे ऐतिहासिक वेळेत पूर्ण; कसारा घाट फक्त 5 मिनिटांत पार, मुंबई आणखी जवळ
देशातील सर्वात रूंद बोगदा कसारा घाटात तयार.
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 10:42 AM

नाशिकः देशातील सर्वात रूंद (widest tunnel) म्हणून ओळखले जाणारे दोन बोगदे इगतपुरीजवळील कसारा घाटात (Kasara Ghat) विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भारतीय अभियांत्रिकी इतिहासात पहिल्यांदाच (Historical record) असा भीमपराक्रम झाला आहे. (The widest tunnel in the country completed in historic time; Cross Kasara Ghat in just 5 minutes, even closer to Mumbai)

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सध्या सुसाट सुरू आहे. याच मार्गावर नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंत या महाकाय दुहेरी बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्यांची लांबी तब्बल आठ किलोमीटर आहे, तर रूंदी 17.5 मीटर आहे. या बोगद्यांचा मुंबईला जाण्यासाठी व येण्यासाठी वापर होणार आहे. कसारा घाट भेदून हे बोगदे एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तयार केले आहेत. प्रकल्पाचे व्यवस्थापक शेखर दास, अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, एकूण 1500 कामगार, 150 अभियंते अशा टीमने हे भवदिव्य शिवधनुष्य पेलले आहे.

ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा वापर हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग मुंबई ते नागपूर दरम्यान तयार करण्यात येत आहे. या महामार्गाची लांबी 700 किलोमीटर आहे. त्यासाठी 55 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. इगतपुरी जवळी बोगद्यासाठी 2745 कोटींचा खर्च आला. या कामाची सुरुवात 6 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती. सप्टेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. त्यापूर्वीच 14 सप्टेंबरला हे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी ऑस्ट्रियन तंत्रज्ञान वापर करण्यात आला. सध्या कसारा घाट पार करण्यासाठी 35 मिनिटे लागतात. आता या बोगद्यांमुळे अवघ्या पाच तासांत कसारा घाट पार करता येणार आहे.

कठीण खडकाचे आव्हान कसारा घाटातील खडक फोडणे हे या टीमसमोरचे सर्वात मोठे आव्हानात्मक काम होते. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एफकॉन्स कंपनीच्या शिलेदारांनी ते विक्रमी वेळेत पूर्ण केले. हे काम पूर्ण होताच कामगार आणि अभियंत्यांनी एकच जल्लोश केला. आता या बोगद्यांमध्ये रस्ताबांधणी, व्हेंटीलेशन, विद्युत जोडणी आदी कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंत तयार करण्यात आलेल्या आठ किलोमीटर लांबीचा बोगदा फक्त 2 वर्षांत पूर्ण झाला आहे. अभियांत्रिकीच्या इतिहासातील भारतातील हा पहिला असा बोगदा आहे की, ज्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. – अनिलकुमार गायकवाड, सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग (The widest tunnel in the country completed in historic time; Cross Kasara Ghat in just 5 minutes, even closer to Mumbai)

इतर बातम्याः

बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अकोलामध्ये बांधकाम परवानगी आता ऑफलाइन

नाशिकमध्ये विधिमंडळ समितीने काढली स्मार्ट सिटीच्या कारभाराची पिसे

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.