Nashik| अजूनही 425 कोरोना रुग्ण; निफाडमध्ये 83, सिन्नरमध्ये 56 जणांवर उपचार सुरू

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 551 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Nashik| अजूनही 425 कोरोना रुग्ण; निफाडमध्ये 83, सिन्नरमध्ये 56 जणांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 4:22 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात अजूनही 425 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात निफाडमध्ये 83, सिन्नरमध्ये 56 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 551 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

पॉझिटिव्ह रुग्ण असे

सध्या जिल्ह्यात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 35, बागलाण 04, चांदवड 13, देवळा 07, दिंडोरी 02, इगतपुरी 02, कळवण 02 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मालेगावमध्ये 04, नांदगाव 04, निफाड 83, सिन्नर 56, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 01, येवला 21 अशा एकूण 235 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 165, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 08 तर जिल्ह्याबाहेरील 17 रुग्ण असून, असे एकूण 425 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 670 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 02, चांदवड 01, निफाड 03, सिन्नर 04, येवला 03 अशा एकूण 13 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे.

बरे होणारे रुग्ण वाढले

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.17 टक्के, नाशिक शहरात 98.19 टक्के, मालेगावमध्ये 97.11 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.78 इतके आहे. आजपर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये कोरोनाने 4 हजार 210 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरणाचा वारू चौखुर

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत विक्रमी लसीकरण झाले आहे. नाशिक विभागही लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहे. अनेक भागात लस न घेणाऱ्यांना रेशन बंद ते विविध नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण वाढले आहे.

जिल्ह्यात अजूनही 425 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात निफाडमध्ये 83, सिन्नरमध्ये 56 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 551 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. – डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

Nashik| तरुणांना मिळणार मोफत निवासी वाईन प्रशिक्षण; काय आहे पात्रता, घ्या जाणून!

Malegaon: मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे; दंगल पू्र्वनियोजित असल्याचा आमदार मुफ्तींचा दावा

Nashik|पैल्या धारंच्या प्रेमानं साला…हळदीत गाणं वाजलं अन् लग्नाआधीच नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.