लॉकडाऊनची परिस्थिती नाही, निर्बंधाबाबत सरकारनं आम्हाला विचारात घ्यावं, फडणवीसांचं आवाहन
सध्या राज्यात कोरोनामुळे लगेच लॉकडाऊन लावावा, अशी परिस्थिती नाही. निर्बंधाबाबत सरकारने आम्हाला विचारात घ्यावे. एक्सपर्टची मते घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईः सध्या राज्यात कोरोनामुळे लगेच लॉकडाऊन लावावा, अशी परिस्थिती नाही. निर्बंधाबाबत सरकारने आम्हाला विचारात घ्यावे. एक्सपर्टची मते घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते.
शेतकऱ्यांना मदत नाही
फडणवीस म्हणाले की, ही कोणती संधी आहे हे मला समजलं नाही. कोरोनाच्या काळात देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. ३५ टक्के देशातील मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के मृत्यू राज्यात आहेत. सर्वाधिक अफेक्टेड राज्य महाराष्ट्र आहे. हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना मदत नाही. बाराबलुतेदारांना नवा पैसा दिला नाही. इतर छोट्या राज्यांनी बलुतेदारांना मदत केली. राज्य सरकारने एकाही शेतकऱ्याला मदत दिली नाही. आमच्या काळात 15 हजार कोटी विम्याचे मिळाले. यांच्या काळात 500 कोटीही मिळाले नाहीत. त्यामुळे संधीचे रुपांतर कशात, हे मला कळत नाही. मला एवढं लक्षात आलं की संकटात काही संधी साधू या सरकारमध्ये होते. त्यांनी संधी साधली आणि आपले खजाने भरले. यापेक्षा काही रुपांतर दिसले नाही, असा आरोप त्यांनी केला.
भगवान भरोसे महाराष्ट्र चालला
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेपेक्षाही कोरोनाच्या काळात खरंच जनतेपर्यंत कोण गेलं हो… चला, मुख्यमंत्र्यांच्या काही शारीरिक अडचणी असतील समजूया. म्हणून ते गेले नाही. मंत्री का गेले नाही, पालकमंत्री का गेले नाही…जनतेचं दुःख का बघितलं नाही. मी महाराष्ट्रात तीनवेळी फिरलो. मी आयसीयूत गेलो. लोकांची दुख समजून घेतले. विरोधी पक्षनेता म्हणून माझं कामच होतं ते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रशासनालाही आनंद व्हायचा. आम्हाला कोणी सांगायलाही नाही आणि विचारायलाही येत नाही, असं ते सांगायचे. मी त्यांना म्हटलं मी विरोधी पक्षनेता आहे मी तुमचं फार काही करू शकेन असं नाही. त्यावर किमान तुम्ही आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचू शकाल, असं ते म्हणाले. त्यामुळे एकूणच या कोरोनाच्या काळात सरकारचं अस्तित्वच नव्हतं. भगवान भरोसे महाराष्ट्र चालला, म्हणूनच एवढे मृत्यू झाले, असा आरोपही त्यांनी केला.
तुम्ही काम काय करता हे महत्त्वाचे
फडणवीस म्हणाले की, मी विरोधी पक्षनेता म्हणून सक्षमपणे काम करत आहे. तुम्ही कोणत्या पदावर आहात हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही काय काम करू शकता हे महत्त्वाचे आहे. हे मी मागे बोललो होतो. खरं म्हणजे विरोधी पक्षाला सत्तारूढ पक्षाला धास्ती आहे. आपलं सरकार कधीही जाईल असं त्यांना वाटतं. त्यामुळे 20-20 ची मॅच असते तसं जेवढं लुटता येईल तेवढं लुटण्याचं काम त्यांचं चाललं आहे. म्हणून असे वक्तव्य ते करतात, ती त्यांची भीती बोलत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
इतर बातम्याः
ओमिक्रॉनमुळे साहित्य संमेलनाचे होणार काय, मुख्य मंडपाची आसनक्षमता 14 हजार, बाका प्रसंग उद्भवला…!
संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय…?