Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Malaria : ठामपा हद्दीत जून महिन्यात डेंग्यूचे शून्य तर मलेरियाचे 27 रुग्ण

प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 31427 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 307 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 41004 कंटेनरची तपासणी केली असता 359 कंटेनर दूषित आढळून आली.

TMC Malaria : ठामपा हद्दीत जून महिन्यात डेंग्यूचे शून्य तर मलेरियाचे 27 रुग्ण
ठामपा हद्दीत जून महिन्यात डेंग्यूचे शून्य तर मलेरियाचे 27 रुग्णImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 8:10 PM

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जून 2022 मध्ये डेंग्यू (Dengue)ची संशयित रुग्णसंख्या 40 आणि निश्चित निदान झालेला एकही रुग्ण आढळून आला नाही. तर मलेरिया (Malaria)चे 28 रुग्ण आढळून आले व चिकनगुनिया (Chikangunia)चे संशयित व निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या शून्य आहे. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 31427 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 307 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 41004 कंटेनरची तपासणी केली असता 359 कंटेनर दूषित आढळून आली. या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात 50 हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-10, ई रिक्षा 6, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 2194 ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे 14765 ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली. तसेच 03 ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिताली हुमरसकर यांनी नमूद केले.

अतिपर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा रस्त्यावर

गेल्या दोन दिवसात पावसाने चांगलाच जोर घेतला असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. अतिवृष्टीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी अतिवृष्टी कालावधीत नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी व अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांनी सर्व नाल्याची साफसफाई करणे, शहरात सखल भागात पाणी साठणार नाही, धोकादायक इमारती तसेच वृक्ष पडून जीवित व वित्तहानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. अति पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप लावून पाण्याच्या निचरा करणे, तसेच रस्त्यावर पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या, रस्त्यांवरील डेब्रिज तात्काळ उचलण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. (There were zero cases of dengue and 27 cases of malaria in the TMC area in June)

हे सुद्धा वाचा

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.