Aurangabad: झुलेलाल मंदिराचा चोर जेरबंद, 60 वर्षांची अखंड तेवणारी समाईसुद्धा मिळाली, बायकोला पैसे देण्यासाठी पहिल्यांदाच केली चोरी!
शहरातील शहागंज येथील सिंधी समाजाचे कुलदैवत असलेल्या वरुणदेव जलाश्रम झुलेलाल मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी पाचच तासात मुद्देमालासह पकडले. रविवारी सकाळी मंदिरातील दानपेटीसह दोन चांदीच्या मूर्ती, पितळी समई चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती.
औरंगाबादः शहरातील शहागंज येथील सिंधी समाजाचे कुलदैवत असलेल्या वरुणदेव जलाश्रम झुलेलाल मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी पाचच तासात मुद्देमालासह पकडले. रविवारी सकाळी मंदिरातील दानपेटीसह दोन चांदीच्या मूर्ती, पितळी समई चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या होत्या. ज्याने ही चोरी केली असेल, त्याने किमान अखंड ज्योत तेवत असलेली मंदिरातील समईतरी परत आणून ठेवावी, असे आवाहन भाविकांनी केले होते. पोलिसांनी चोराला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अखंड तेवणारी समईदेखील हस्तगत केली. दरम्यान चोराने जबाब नोंदवला असून यापूर्वी कधीही चोरी केली नव्हती. पण पत्नी सारखा पैसे मागत होती, त्यामुळे चोरी केल्याचे सांगितले.
सिटी चौक पोलिसांनी 5 तासात पकडले
शनिवारी रात्री आठच्या सुमारास मंदिर बंद करण्यात आले. रविवारी सकाळी मंदिराचे सदस्य दीपक दर्डा हे दर्शनासाठी आले असता त्यांना मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच दानपेटीसह दोन चांदीच्या मूर्ती आणि पितळी समई असा 18 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. मंदिरातील सीसीटीव्ही नादुरूस्त अवस्थेत होता. मात्र दुसऱ्या एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना अवघ्या पाच तासात चोराला मुद्देमालासह अटक केली.
भाविकांमध्ये आनंदाची लाट
झुलेलाल मंदिरात मागील 60 वर्षांपासून अखंड ज्योत सुरु आहे. ही ज्योत ज्या पितळी समईत लावली जाते, ती समईदेखील चोराने पळवली होती. यामुळे सिंधी समाजातील भाविकांच्या भावना दुखावल्या होत्या. मात्र सिटी चौक पोलिसांनी चोरांकडून चांदीच्या मूर्ती, दानपेटी आणि समईदेखील हस्तगत केली. यामुळे भाविकांमध्ये आनंदाची लाट पसरली.
इतर बातम्या-