सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट? केरळमध्ये स्फोट, महाराष्ट्रातही आकडा वाढतोय, वाचा सविस्तर

काही रिपोर्टनुसार तर हा आकडा येत्या एक दोन दिवसात 10 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. शेवटच्या हाती आलेल्या माहितीनुसार 7 हजार 431 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत.

सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट? केरळमध्ये स्फोट, महाराष्ट्रातही आकडा वाढतोय, वाचा सविस्तर
CORONA
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 11:45 AM

गेल्या आठवड्याभरापासून देशातला कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही कोरोनाच्या केसेसमध्ये अचानक वाढ होताना दिसतेय. आपल्या राज्यात गेल्या चोवीस तासात पीआयबीच्या माहितीनुसार 6 हजार 600 नव्या रुग्णांची भर पडलीय तर देशात हा आकडा 41 हजार 49 एवढा आहे. त्यातही 41 हजार रुग्णांपैकी एकट्या केरळच्या रुग्णांची संख्या ही निम्म्यावर आहे.

महाराष्ट्रात काय घडतंय? बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा प्रार्दुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात साडे सहा हजारापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काही रिपोर्टनुसार तर हा आकडा येत्या एक दोन दिवसात 10 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. शेवटच्या हाती आलेल्या माहितीनुसार 7 हजार 431 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत. तर 231 जणांना मात्र जीव गमवावा लागलाय. सध्यस्थितीत महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांचा आकडा हा 77 हजार 494 एवढा आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 1 लाख 32 हजार 566 रुग्णांचा बळी गेलाय.

कोरोनाची तिसरी लाट डेंजर, एकट्या मराठवाड्यात दररोज 1 लाख रुग्णवाढीचा अंदाज

केरळमध्ये कोरोनाचा स्फोट केरळ सरकारच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात तिथं कोरोनाच्या 20 हजार 772 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 116 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात ज्या नव्या केसेस सापडतायत त्यात एकट्या केरळचा वाटा हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केरळमध्ये 13.61 एवढा संक्रमनाचा दर आहे. बकरी ईदला केरळ सरकारनं मोठी सुट दिली आणि त्याचाच परिणाम म्हणून कोरोनाचा स्फोट झाल्याचा आरोपही केला जातोय. पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता, तिथल्या सरकारनं शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केलीय.

देशाची संख्या चाळीस हजारावर गेल्या चार दिवसांपासून देशात रोज कोरोनाचे 40 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडतायत. गेल्या चोवीस तासात 41 हजार 649 एवढे नवे रुग्ण सापडलेत. शुक्रवारी हाच आकडा 44 हजार 230 एवढा होता. दिलासादायक म्हणजे अजूनही रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यापेक्षा जास्त आहे. गेल्या चोवीस तासात 37 हजार 291 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.