बँकेत अकाऊंट नसेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही?, काय खरं?; अर्जात नेमकं काय म्हटलंय…

अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलीये. राज्य सरकारकडून महिलांसाठी ही योजना आणली गेलीये. यामध्ये महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आरामात अर्ज करू शकता.

बँकेत अकाऊंट नसेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही?, काय खरं?; अर्जात नेमकं काय म्हटलंय...
adki bahini yojana
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 11:38 AM

राज्य सरकारने अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा केलीये. खास महिलांसाठी ही योजना सरकारकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये सरकारकडून मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच महिलांना या योजनेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जातंय. या योजनेची घोषणा झाल्यापासून अर्ज भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचे देखील बघायला मिळतंय. काही नियम व अटी देखील या योजनेसाठी लागू करण्यात आल्या आहेत.

या योजनेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 21 ते 65 वयोगटापर्यंतच्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच आधार कार्ड अर्ज करणाऱ्या महिलांकडे आवश्यक आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र अर्ज करणाऱ्या महिलेकडे असायला हवे.

जर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करत असाल तर सर्वात महत्वाची एक गोष्ट तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेत खाते असणे आवश्यक आहे. जर एखाद्या महिलेचे बँकेत खाते नसेल तर ती संबंधित महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीये. फक्त हेच नाही तर बँकेत अकाऊंटसोबत तुमचे आधारकार्ड कनेक्ट असणेही आवश्यक आहे.

जर एखाद्या महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्या महिलेचे बँकेत अकाऊंट नसेल तर त्या महिलेचा अर्ज अपात्र ठरणार आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे बँकेत तुमचे खाते असणे. तहसील कार्यालयात सर्व अर्ज जमा केली जातील.यासोबतच तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात. यासोबत अर्जात अनेक अटी लागू करण्यात आल्या आहेत.

त्यासर्व अटींमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न हे सर्वात महत्वाचे या योजनेसाठी असणार आहे. महिलांसाठी ही मोठी योजना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलीये. अनेक ठिकाणी सकाळपासून महिलांना अर्जासाठी मोठी गर्दी केल्याचे देखील बघायला मिळतंय. आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.