महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित हा नियम बदलणार, न पाळल्यास 10 हजार रुपयांचा दंड!
महाराष्ट्रात वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने नवा नियम बनवला आहे. त्यामुळे या नियमानुसार तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार आहे. तसे न केल्यास अशा वाहन मालकांना दहा हजारांचा दंड आकारला जाणार आहे. काय आहे तो नवा नियम जाणून घ्या.
महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलीये. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना 31 मार्च 2025 पर्यंत उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक असणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट नसेल त्या वाहक चालकांवर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचा हा नियम राज्यभरात लागू होणार आहे. या नियमानुसार जवळपास 20 दशलक्षाहून अधिक वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. वाहन मालकांना सध्याच्या स्थितीत असलेली नंबर प्लेट बदलून हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावावी लागणार आहे.
1 एप्रिलपासून 10 हजार रुपयांचा दंड
जर वाहन चालकांनी या आदेशाचे पालन केले नाही तर मोटार वाहन कायद्यांतर्गत 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. HSRP नसलेल्यांसाठी वाहनांना वाहन नोंदणी आणि पत्ता बदलणे यासारख्या मिळणाऱ्या सेवा देखील बंद केल्या जाणार आहे. HSRP उपक्रमाचा उद्देश वाहनांची सुरक्षा वाढवणे आहे. ज्यामुळे चोरीला गेलेली वाहने परत मिळवला येतील.
HSRP बसवण्यासाठी किती खर्च येईल?
नवीन वाहनांची बुकिंग केल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्यांना ही नंबर प्लेट लावावी लागेल. प्रवासी वाहनांसाठी 745 रुपये, तीनचाकी वाहनांसाठी 500 रुपये, दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
HSRP कुठे आणि कोण लावणार?
वाहनाच्या आरटीओ कार्यालयानुसार एचएसआरपीची तरतूद करण्याचे काम तीन एजन्सींना देण्यात आले आहे. ते आधी अधिकृत वाहन पोर्टल वापरून वाहन तपशीलांची पडताळणी करतील. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) खूप महत्त्वाची आहे.
HSRP च्या नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत जे प्रकाशात सहज दिसतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज कॅप्चर होतात. या नंबर प्लेट्स युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करतात.
HSRP चा रंग आणि फॉन्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी डिझाइन केले आहे. पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगात ही प्लेट तयार केली जाते. या क्रमांकांवर “इंडिया” असे देखील मुद्रित असते. याशिवाय निळ्या रंगात अशोक चक्र असते.