Ajit Pawar | 2019 मध्ये एकटे पडले, पण आता ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा

Ajit Pawar | यावेळी अजित पवार यांना बहुतांश आमदारांनी पाठिंबा कसा दिला? त्यामागे काय कारण आहे? मागच्यावेळी अजित पवार यांच बंड फसलं होतं, आता तसं होण्याची शक्यता कमी आहे.

Ajit Pawar | 2019 मध्ये एकटे पडले, पण आता 'या' कारणामुळे राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा
Ajit pawar
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 1:11 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणला. अजित पवार असं काही करतील, याची मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर ती शक्यता काल रविवारी खरी ठरली. अजित पवार उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. काही आमदार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. काही आमदार अजित पवारांसोबत आहेत.

अजित पवार यांना नेमका किती आमदारांचा पाठिंबा आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. ते चित्र पुढच्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल. पण यावेळी अजित पवार यांचं बंड फसण्याची शक्यता फार कमी आहे.

असाच प्रयत्न फसलेला

मागच्यावेळी 2019 मध्ये अजित पवार यांनी असाच प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सरकार स्थापनेसाठी शिवेसना आणि काँग्रेससोबत बोलणी सुरु होती. या दरम्यान अचानक एकदिवस सकाळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

पण आता तसा धोका नाही

सर्वसामान्यांसाठी हा मोठा राजकीय धक्का होता. त्यावेळी काही तासातच अजित पवारांना पाठिंबा नाही, असं शरद पवारांकडून जाहीर करण्यात आलं. त्यावेळी सरकार काही तासात कोसळलं. आता सुद्धा शरद पवारांनी असंच जाहीर केलय. पण आता फडणवीस सरकारला कुठलाही धोका नाहीय. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंमुळे हे सरकार स्थिर आहे.

आमदार समोर येऊन बोलत आहेत

उलट अजित पवारांच्या येण्याने ताकत आणखी वाढली आहे. अजित पवारांसोबत किती आमदारा आहेत? ते लवकरच समजेल. पण काही आमदारांनी आता समोर येऊन बोलायला सुरुवात केली आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी अजित पवारांच समर्थन करत असल्याचं सांगितलं. आमदारांनी आता पाठिंबा कसा दिला?

त्यावेळी त्यांना अजित पवारांना बहुतांश आमदारांनी पाठिंबा कसा दिला? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात अजित पवारांनी विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला, असं उत्तर दिलं. म्हणजे मतदारसंघात विकास दादांमुळेच घडू शकतो, अशी अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची भावना आहे. याच कारणामुळे 2019 मध्ये एकट्या पडलेल्या अजित पवार यांना, यावेळी राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांची साथ लाभू शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.