रासायनिक प्रवाहामुळे या नदीत हजारो माशांचा मृत्यू ?

सध्या तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली आहे. त्याचबरोबर काही लोकं पाण्यात उतरून माशांची पाहणी करीत आहे. तर काही तडफडत असलेले मासे नागरिक पकडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रासायनिक प्रवाहामुळे या नदीत हजारो माशांचा मृत्यू ?
SANGLI FISH DEATHImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 2:13 PM

शंकर देवकुळे, सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातून जात असलेल्या कृष्णा नदीला (krishna river) प्रदुषणाचा विळखा कायम असल्याची तक्रार नागरिक करीत असतात. या गोष्टीला कारखाने आणि नागरिक जबाबदार असल्याची ओरड नागरिक नेहमी करीत असतात. कृष्णा नदीत विविध पद्धतीचे मासे आहेत. अनेकदा कृष्णा नदीत मासे मृत्यूमुखी (fish death) पडल्याचे पाहायला मिळते. कित्येकदा अशा पद्धतीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सध्या कृष्णा नदीत मेलेल्या माशांचा खच दिसून येत आहे. ही बातमी वाऱ्यासारखी सगळी पसरली आहे. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी अधिक गर्दी केली आहे. हा नेमका प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली

कृष्णा नदीमध्ये दूषित पाणी मिसळल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत, धक्कादायक प्रकार कृष्णा नदीकाठी घडल्याने सांगलीकरांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे. गेले काही दिवस कृष्णा नदीमध्ये मळी मिश्रित दूषित पाणी येत आहे असं सांगलीकरांनी वारंवार सांगत आहेत. तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले

या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. भविष्यात या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही फार मोठा परिणाम होणार आहे. नागरिकांनी या आगोदर सुध्दा वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु कसल्याची प्रकारची दखल घेतली नसल्याचं नागरिक सांगत आहेत.

हे सुद्धा वाचा

सध्या तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली आहे. त्याचबरोबर काही लोकं पाण्यात उतरून माशांची पाहणी करीत आहे. तर काही तडफडत असलेले मासे नागरिक पकडत असल्याचं पाहायला मिळत आहे. हजारोंच्या संख्येने मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.

अशा पद्धतीच्या घटना कोल्हापूरमधील पंचगंगा नदीत सुध्दा घडल्या आहेत. अनेकदा विषाणु पदार्थ पाण्यात मिसळल्याने माशांचा मृत्यू झाला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.