AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा हाच तो? का केला तसा फोन?

एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्याने दारूच्या नशेत हा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा हाच तो? का केला तसा फोन?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 10:27 AM

अभिजित पोते, पुणे : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उडवून देणार’ असा धमकीचा कॉल आल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे. काल रात्री हा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. तपासाची सूत्र वेगाने हलवण्यात आली. या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय. राजेश मारूती आगवणे असं या आरोपीचं नाव आहे. या व्यक्तीने कोणत्या कारणाने एकनाथ शिंदे यांना मारण्याचा फोन केला, हेसुद्धा प्राथमिक चौकशीत उघड झालंय.

का केला फोन?

एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्याने दारूच्या नशेत हा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी राजेश मारुती आगवणे याने कौटुंबिक वादानंतर मद्यप्राशन करून सदर कॉल केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. आरोपीची बायको पुण्यात धायरी येथे वास्तव्यास आहे. तर पुण्यातील वारजे येथून आरोपीने धमकी देणारा फोन केला. 112 नंबरला सोमवारी रात्री ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे..’ असे बोलून त्याने फोन कट केला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. वारजे येथून आरोपीचे लोकेशन मिळाले. सदर आरोपी मारुती आगवणे हा शास्त्री नगर धारावी येथील रहिवासी असल्याची माहितीदेखील पोलीस तपासात उघड झाली आहे.

कोण आहे आरोपी?

राजेश मारुती आगवणे असा आरोपींचं नाव आहे. त्याचं  वय 42 वर्षे एवढे आहे. तो धारावी येथील रहिवासी असून  मुंबईतच वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्याची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो.

2वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोक फोन केल्यावर सांगत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काल रात्री प्रथम त्याने 112 वर call करून छातीत दुखतंय ambulance पाठवा असे कळविले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून 108 ला कळवा असे सांगण्यात आले. त्याने दुसऱ्यांदा त्याच नंबरवरून त्याने  मुख्यमंत्री यांना धमकी देण्याचा कॉल केला. त्यानंतर पोलिसांनी सदर व्यक्ती कोण आहे, याचा तत्काळ तपास केला. त्याच्यासंबंधीची प्राथमिक माहिती मिळाली असून दारुच्या नशेत त्याने हा कॉल केल्याचं उघडकीस आलंय.

धमक्यांचे सत्र सुरूच

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांना धमक्या येण्याचे सत्र सुरुच आहे. आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन आल्याने पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.