पोहण्याचा आनंद जीवावर बेतला; धुळ्यात तीन लहान मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू

हुजैफ हुसेन पिंजारी वय 10 वर्ष, नोमान शेख मुख्तार वय 12 वर्ष व अयान शहा शफी शाह वय 11 वर्ष अशी मृत मुलांची नावे आहेत. एकूण सहा मित्र पोहण्यासाठी गेले होते. मात्र या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि पाण्याच्या प्रवाहात तिघेही वाहून गेले.

पोहण्याचा आनंद जीवावर बेतला; धुळ्यात तीन लहान मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 9:03 PM

धुळे : पोहण्याचा आनंद मुलांच्या जीवावर बेतला आहे. कालव्यात बुडून(children drowned) तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळ्यात(Dhule) घडली आहे. मृत तिन्ही मुलं ही दहा ते बारा वयोगटातील आहेत. यांच्यासह गेलेली मुल मात्र बचावली आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलांच्या कुटुंबियावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या मुलांसोबत कुणी मोठं माणूस नव्हत का? कालवा(canal) खोल असताना मुलांना येथे पोहण्यासाठी का जाऊ दिले जाते असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नवापाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. ही मृत मुल गावाजवळील कालव्यात पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पाण्याच्या प्रवाहात हे तिघेही वाहून गेले.

हुजैफ हुसेन पिंजारी वय 10 वर्ष, नोमान शेख मुख्तार वय 12 वर्ष व अयान शहा शफी शाह वय 11 वर्ष अशी मृत मुलांची नावे आहेत. एकूण सहा मित्र पोहण्यासाठी गेले होते. मात्र या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि पाण्याच्या प्रवाहात तिघेही वाहून गेले.

हे तिघेजण वाहून गेल्याचे इतर मुलांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ कालव्याजवळ उपस्थित असलेल्यांकडे मदत मागीतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल पथक व स्थानिकांच्या मदतीने या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

ज्याचा बर्थ डे सेलिब्रेट करायला गेले त्याचाच मृत्यू झाल; लोणावळ्यात दोन वर्षाचा मुलगा स्विमींग पुलमध्ये बुडाला

नाशिकचा पवार परिवार या २ वर्षीय चिमुरड्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात(Lonavala) एका व्हीलावर गेला होता. या ठिकाणी २ वर्षीय शिवबा खेळत मग्न होता. तो एकटाच खेळता खेळता स्विमिंग पुल परिसरात आला. आणि तसाच खेळात त्याचा स्विमिंग पूल मध्ये तोल गेला. स्विमिंग पूलमध्ये पडल्यावर या चिमुकल्याने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी अथक परिश्रम केले. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर त्याचे हातपाय थकले आणि त्याचा जीव गेला.

अंबरनाथच्या मलंगगड परिसरातील नदीत दोघे बुडाले

अंबरनाथच्या मलंगगड परिसरात दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. आंभे गावाजवळील नदीत पोहता (Swimming)ना पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तरुण बुडाल्या (Drowned)ची घटना घडली. अंकित जयस्वाल आणि निखिल कनोजिया अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. डोंबिवलीतील 12 मित्र पिकनिकसाठी मलंगगड परिसरात आले होते. यावेळी पोहण्यासाठी नदीत उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडाले. स्थानिकांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.