Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Koratkar : कोरटकरला पोलीस कोठडी, कोर्टाबाहेर येताच शिवप्रेमी अंगावर धावून गेले, पण तितक्यात.. VIDEO

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Prashant Koratkar : कोरटकरला पोलीस कोठडी, कोर्टाबाहेर येताच शिवप्रेमी अंगावर धावून गेले, पण तितक्यात.. VIDEO
Prashant Koratkar Arrest
Follow us
| Updated on: Mar 25, 2025 | 2:55 PM

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. कोल्हापूर कोर्टात आज सुनावणी झाली. पोलीस प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाबाहेर आणत असताना शिवप्रेमी त्याच्या अंगावर धावून गेले. पण त्याचवेळी सर्तक असलेल्या पोलिसांनी रोखलं. म्हणून पुढची अप्रिय घटना टळली. वेगवेगळ्या घटनांचा तपास करायचा असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी हवी असा युक्तीवाद कोल्हापूर पोलिसांच्यावतीने कोर्टात करण्यात आला.

इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी सुद्धा सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली. प्रशांत कोरटकरने ज्या मोबाईल फोनचा वापर केला, तो आता पोलिसांना हस्तगत करायचा आहे. त्याचा जो प्रवास झाला, त्याला कोणी-कोणी मदत केली? ते पोलिसांना शोधून काढता येईल. पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. ज्या-ज्यावेळी पोलिसांना तपासात आवश्यक असेल, तेव्हा सहकार्य करु असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. पण कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोर्टात काय युक्तीवाद झाला?

प्रशांत कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती असा युक्तीवाद आरोपीचे वकील सतिश घाग यांनी कोर्टात केला. प्रशांत कोरटकरवर लावलेल्या कलमानुसार त्याच्या अटकेची गरज नव्हती, असं त्याच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं.

राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा आहे, असं वकील असिम सरोदे म्हणाले.

प्रशांत कोरटकरची विधानं गंभीर आहेत. त्यामुळे त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहे, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.

आरोपी महिन्याभरापासून फरार होता. त्यामुळे त्याची चौकशी करायची आहे. म्हणून त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती पोलिसांनी कोर्टात केली.

प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले. कोरटकरने डाटा डिलीट केला, त्याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांनी कोर्टात युक्तीवाद करताना सांगितलं.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.