उभ्या ट्रकला पाठीमागून धडक, कारचा अक्षरश: चुराडा, तिघांचा जागीच मृत्यू
पुलगाव ते वर्धा मार्गावरील मलकापूर-केळापूर शिवारात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. (Wardha car and truck accident)
वर्धा : पुलगाव ते वर्धा मार्गावरील मलकापूर-केळापूर शिवारात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला (Wardha car and truck accident).
या घटेनतील मृतक नागरीक हे नागपूरच्या हिंगणा रोड परिसरातील रहिवासी आहेत. खरंतर डिझेल संपलं म्हणून चालकाने ट्रकला रस्त्याच्या कडेला उभी केली होती. मात्र, याच ट्रकला भरधाव वेगाने मागून येऊन एका कारने जोरदार धड दिली. ही कार महिला चालवत होती. गाडीचा वेग इतका जास्त होता की चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत कार चालक महिला हेमंती दीपक मुंजेवार किरकोळ जखमी झाली आहे. तर तिचे दोन मुलं सुरक्षित आहे. ते वर्ध्यातून नागपूरला परत जास्त असताना हा अपघात घडला (Wardha car and truck accident).
या घटनेत दिलीप इंगोले (वय 65 वर्ष ), दीपक चैतराम मुंजेवार (वय 43 वर्ष) आणि सुरेखा दिलीप इंगोले (वय 58 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला. सर्व मृतक आणि जखमी नागपूरच्या हिंगणा परिसरातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमी आणि मृतकाना पुलगाव येथील रुग्णालायत दाखल केले. जखमींची प्रकृती अस्वस्थ असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले तर मृतकांचे पुलगाव येथील रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. उभ्या ट्रकला कारने मागून धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झालाय. पुलगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरवात केली आहे.
हेही वाचा : खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन