महामार्गावर विचित्र अपघात, आयशर टेम्पो अन् दोन कारचा अपघातात तीन जण ठार

| Updated on: Jun 03, 2023 | 10:58 AM

highway Accident : महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

महामार्गावर विचित्र अपघात, आयशर टेम्पो अन् दोन कारचा अपघातात तीन जण ठार
Follow us on

अहमदनगर : राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात झाला आहे. शनिवारी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तीन वाहनांच्या झालेल्या या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या अपघातामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे.

कुठे झाला अपघात

अहमदनगर-कल्याण महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ भीषण अपघात झाला. आयशर टेम्पो आणि दोन कारचा हा अपघात झाला. तीन वाहनांचा या विचित्र अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

हे सुद्धा वाचा

धारशिव बस अपघात

धाराशिव बार्शी परंडा बसचाही अपघात झाला आहे. बस रस्त्यावरून खाली पलटी झाली. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. २५ जणांना परंडा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एसटीचा हा अपघात खासगाव कुंभारवाडाजवळ झाला आहे.

का होतात अपघात

राज्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. नेमकी कारणं काय? पाहू या…

  • वाहन चालवताना चालकांचे वेगावर नियंत्रण नसणे
  • मद्य पिऊन वाहन चालवणे, अधिक वेळ वाहन चालवणे
  • धोकेदायक पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेन कटिंग करणे
  • क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे
  • गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे
  • इतर वाहतूक नियमांचे पालन न करणे

…तर अपघात टाळणे शक्य

लोकांनी आणि सरकारी यंत्रणेने ठरवल्यास अनेक अपघात सहज टाळता येतील. यासंदर्भात प्रशासनाने साम, दाम, दंड, भेद अशा उपाययोजना करायला हव्या. त्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होईल. परंतु सरकारी यंत्रणा आपल्या पारंपारीक कामकाज पद्धतीनेच चालतात. वाहन चालवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.