मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे नोंद असणं आवश्यक
Ladka Bhau Yojana: मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्रातील लाडहकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर लाडका भाऊ योजना देखील जाहीर करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर शिंदे सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. यालाच लाडका भाऊ योजना असं म्हटलं जात आहे. या योजनेचा जीआर देखील जारी केला गेला असून त्यामध्ये अट आणि नियम सांगितले गेले आहेत. त्यानुसारच या योजनेसाठी तुम्ही अर्ज करु शकतात. बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण असलेल्या वेगवेगळ्या उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
लाडका भाऊ योजना
लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला म्हणजेच उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असेल. तरच याचा लाभ मिळणार आहे. लाडका भाऊ योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकदाच घेता येणार आहे. बारावी पास असलेल्या उमेदवाराला सहा हजार रुपये, आयटीआय-पदविका पास असलेल्या उमेदवाराला दहा हजार रुपये आणि पदवीधर-पदव्युत्तर उमेदवाराला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय किमान 18 ते 35 या दरम्यान असावे.
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या उमेदवारालाच घेता येणार आहे.
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार सोबत बँक खाते लिंक असावे.
- प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन उमेदवाराच्या थेट बैंक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एका घरातील फक्त दोनच महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. या योजेनेचे पैसे १५ ऑगस्टच्या आधी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.