Rain Update | गंभीर पूरस्थितीत सुखद वार्ता, महाराष्ट्राची तहान भागवणारी धरणं भरतायत, वाचा कोणत्या धरणाची काय स्थिती?

यंदा सर्वात आगोदर पूरस्थिती ही गडचिरोलीमध्ये झाली होती. महाराष्ट्राच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सुरू असून राज्यातून सर्वात जास्त विसर्ग या धरणातून सध्या होत आहे. 19 लाख 66 हजार 90 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मेड्डीगट्टा लक्ष्मी धरणांमुळे गोदावरी प्राणहिता नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Rain Update | गंभीर पूरस्थितीत सुखद वार्ता, महाराष्ट्राची तहान भागवणारी धरणं भरतायत, वाचा कोणत्या धरणाची काय स्थिती?
राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने धर क्षेत्रात वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 11:16 AM

मुंबई : हंगामाच्या सुरवातीला (Monsoon Rain) मान्सूनने आपला लहरीपणा दाखविला असला तरी 1 जुलैपासून राज्यात मान्सून असा काय सक्रीय झाला आहे की सर्व चित्रच बदलून गेले आहे. रखडलेल्या पेरण्या मार्गी लागल्या आहेत तर शेत शिवराचे चित्रच बदलून गेले आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने (RE-Sowing) दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तर गेल्या 10 दिवसांपासून सुर्यदर्शनही झालेले नाही. या सर्व परस्थितीमध्ये दिलासादायक बाब घडली आहे ती म्हणजे राज्यातील सर्वच (Dam Water) धरणांची पाणी पातळी तर वाढली आहे पण अनेक ठिकणाच्या धरणांचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात का होईना मिटली आहे. असे असताना पावसामध्ये सातत्य आहे. शिवाय अजून तीन दिवस राज्यात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभगाने व्यक्त केला आहे. राज्यातील धरणांची काय स्थिती आहे याचा tv9 मराठीने घेतलेला हा आढावा

अमरावतीमधील अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडले

जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये व धरण क्षेत्रात जोरदार पावसाची बॅटींग सुरू आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती मधील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.जलसाठा 76 टक्के झाला असून या धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 45 सेमी ने उघडण्यात आले आहे. सध्या 500 क्यूमेकचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान धरणाचे पाणी सोडल्याने अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

येळगाव धरणात पाणीसाठा, बुलडाणाकरांची चिंता मिटली

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुलडाणा शहर आणि 13 खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊन येळगाव धरण 55% भरले आहे. त्यामुळे बुलढाणेकर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. धरणं 55% भरल्याने आता पाण्याची आठ महिन्यांची चिंताही मिटली आहे. तर पाऊस अजूनही सुरूच असून येत्या काही दिवसात धरणात आणखी पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. पावसामध्ये सातत्य राहिले तर शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे

हे सुद्धा वाचा

कोल्हापूरातील 59 बंधारे हे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने उसंत घेतली असली तरी पंचगंगा नदी पात्रात पाण्याची आवक ही सुरुच आहे. त्यामुळे नदीची पातळी ही 36 फूट 10 इंचावर येऊन ठेपली आहे. इशाऱ्याची पाणीपातळी गाठण्यासाठी अवघ्या दोन फूटाचे अंतर कमी आहे. त्यामुळे पाण्याची आवक जर अशीच राहिली तर मात्र इशारा पातळीही ओलांडली जाणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कचेचा इशारा देण्यात आला आहे. दरवर्षी परतीच्या पावसाने ही स्थिती ओढावते यंदा मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यातच चित्र बदलले आहे.

गडचिरोलीतील मेडीगट्टाचे 85 दरवाजे उघडले, सर्वाधिक पाण्याचा विसर्ग

यंदा सर्वात आगोदर पूरस्थिती ही गडचिरोलीमध्ये झाली होती. महाराष्ट्राच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सुरू असून राज्यातून सर्वात जास्त विसर्ग या धरणातून सध्या होत आहे. 19 लाख 66 हजार 90 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मेड्डीगट्टा लक्ष्मी धरणांमुळे गोदावरी प्राणहिता नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल सिरोंचा तालुक्यातील अकरा गावांना रेड अलर्ट करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर परिस्थिती कायम आहे.

चंद्रपुरातील इरई धरणातून पाण्याचा विसर्ग

चंद्रपुरात देखील पावसाचा कहर हा सुरु आहे. पावसाचे पाणी शहरातील अनेक भागात घुसले आहे. शहरातील रहमत नगर, राजनगर आणि सहारा पार्क या भागातल्या अनेक घरांमध्ये इरई नदीच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. महानगरपालिकेच्या पथकाने रहमतनगर परिसरातून 15 ते 20 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. तर इरई धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे 7 दरवाजे हे 1 मीटरने उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग हा नदीमध्येच आहे.

पिंपरी चिंचवडकरांची तहान भागली, धरणात 60 टक्के पाणी

मानळसह पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात 50.97% टक्के पाणीसाठा आहे. 24 तासात धरण परीक्षेत्रात 144 मिलिमीटर पाऊस पडलाय त्यामुळे तब्बल अवघ्या 12 तासात 7.30% टक्के इतका पाणीसाठ्यात वाढ झाली, यामुळं पाणी कपातीच संकट दूर झाले आहे. असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास जुलै च्या शेवटच्या आठवड्यात धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.

मावळातील कासारसाई धरण 87.71 टक्के भरले

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे कासारसाई धरण 87.71 टक्के भरले असून धरणाच्या तीनही दरवाज्यातून 3 हजार 200 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरण परिसरात आतापर्यंत 534 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली असून सध्या धरणात 14.88 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास हा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी बंद

गडचिरोलीत पूर परिस्थिती निर्माण झाली असून आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग व भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग मागील पाच दिवसापासून बंद आहे.मुसळधार पावसामुळे अहेरी आलापल्ली नागेपल्ली भामरागड एटापल्ली सिरोंचा या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात सभोवताली असलेले प्राणहिता गोदावरी इंद्रावती वैनगंगा नदया धोका पातळीच्या वर वाहत असून चार नद्यांच्या नंदी नदीकाठावर असलेल्या सर्व गावांना अलर्ट करण्यात आलेला आहे.

नंदुरबारातील सारंगखेडा, प्रकाशा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग

मध्यप्रदेश आणि विदर्भात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तापी आणि पूर्णा नदींना पूर आल्याने हातनूर धरणाचे 45 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मधील पाण्याची पातळी वाढ झाली आहे. या धरणातून मोठ्या प्रमाणात तापी नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे सारंगखेडा येथील बॅरेजचे सहा दरवाजे उघडण्यात आले. तर प्रकाश येथील पाच दरवाजे पूर्ण तर तीन दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आल्याने तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पालघरच्या धामणी धरणात 80 टक्के पाणीसाठा

पालघर जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी पावसाची संततधार सुरू असून यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत . धरण क्षेत्रातील चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे . जिल्ह्यात सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाची पाणी पातळी 80 टक्के झाली आहे. या धरणातून सध्या बारा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीद्वारे सुरू आहे . धामणी धरणाचे 5 दरवाजे 1 मीटर ने उघडण्यात आले असून धामणी आणि उपधरण असलेल्या कवडास मिळून तब्बल 48 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू असल्याने सूर्या नदीला मोठा पूर आला आहे .

मालेगावातील गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये संततधार पावसामुळे गिरणा व मोसम नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पूरुपाणी बघण्यासाठी नागरिकांनी गिरणा पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, यातच काही हौशी आबाल वृद्ध व महिला सुद्धा पूर्व भागातून रिक्षा करून हे पूर पाणी बघण्यासाठी येत होत्या. येथील किती वेळ बंधाऱ्यातून अनेक जण पुरात उड्या मारत असतात, मालेगाव येण्यासाठी इतर पूल रहदारीसाठी बंद करण्यात आल्याने या पुलावरून वाहतूक सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.