झोपाळ्यावर बसले, शहाळ्याचं पाणी प्यायले, देवाला गाऱ्हाणंही घातलं, Aaditya Thackeray रमले मामाच्या गावात

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सिंधुदुर्गाच्या (sindhudurga) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते थेट मामाच्या गावी पोहोचले.

झोपाळ्यावर बसले, शहाळ्याचं पाणी प्यायले, देवाला गाऱ्हाणंही घातलं, Aaditya Thackeray रमले मामाच्या गावात
Aaditya Thackeray रमले मामाच्या गावातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 5:58 PM

सिंधुदुर्ग: राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सिंधुदुर्गाच्या (sindhudurg) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते थेट मामाच्या गावी पोहोचले. तब्बल सात वर्षानंतर आदित्य ठाकरे मामाच्या गावी आले होते. मामाच्या घरी गेल्यावर झोपाळ्यावर बसून त्यांनी शहाळं घेतलं. देवाला गाऱ्हाणं घातलं. आजी, मामा-मामी आणि इतर नातेवाईकांची ख्याली खुशाली विचारली. भरपूर गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला. मामांच्या मुलांसोबत सेल्फीही काढला. यावेळी त्यांच्या मामाने त्यांना आंब्याची पेटी देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत (vinayak raut), आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर आदी नेते उपस्थित होते. आदित्य ठाकरे बराचवेळ मामाच्या घरी होते. त्यानंतर ते पुढील दौऱ्याला निघाले.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

देवगड येथील दाभोळे या गावी पाटथर वाडीत आदित्य ठाकरे यांचे मामा प्रकाश पाटणकर राहतात. प्रकाश पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे चुलत बंधू आहेत. या ठिकाणी आदित्य ठाकरे सात वर्षानंतर आले. मामाच्या घरी आल्यावर आधी त्यांनी महापुरुषाचे (देव) दर्शन घेतलं आणि गाऱ्हाणं घातलं. त्यानंतर प्रकाश पाटणकर यांनी त्यांना शहाळ्याचे पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं. घराच्या कलमाच्या आंब्यांची पेटी भेट दिली.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

आदित्य ठाकरे येणार म्हणून सगळं पाटणकर कुटुंब त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होतं. आदित्य ठाकरे आल्यानंतर सर्वांचा चेहरा खुलून गेला. आजी, मामा, मामी, भावंड भेटली. त्यानंतर गप्पा रंगल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. ख्याली खुशाली विचारली गेली. आदित्य यांना कुटुंबीयांनी फोटो अलबम दाखवला. नंतर मोठ्यांनी आणि पोरासोरांनी आदित्य यांच्यासोबत फोटो काढले. सेल्फी घेतले आणि पुन्हा एकदा येण्याचे हक्काचे आमंत्रण दिले गेले.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा देवगडमध्ये सुरू आहे. या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर उपस्थित होते.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

देवगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालं होतं. आमदार नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात हे यश मिळालं. त्यामुळे या कार्यक्रमात शिवसेनेच्या नगरसेवकांचा व काही लोकप्रतिनिधीचा सत्कार ही केला जाणार आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’चा उल्लेख, अजितदादा म्हणाले…

नंदवाळमधील रिंगण सोहळ्याचा वाद चिरघळला; पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

नंदुरबारमध्ये बसमधील प्रवाशाचा heart attack ने मृत्यू; रुग्णालयाकडे गाडी वळवली पण…

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.