राजर्षी शाहू महाराजांपासून बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, दत्तक पुत्रांची परंपरा देशातल्या ‘या’ राजघराण्यांमध्ये

शाहू महाराज छत्रपतींच्या वारशावर प्रश्न उपस्थित करुन संजय मंडलिकांनी नवा वाद ओढवून घेतलाय. शिवाय आपण माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं अजून हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

राजर्षी शाहू महाराजांपासून बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, दत्तक पुत्रांची परंपरा देशातल्या 'या' राजघराण्यांमध्ये
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 10:19 PM

छत्रपती शाहू महाराजांबद्दल संजय मंडलिकांनी वादग्रस्त विधान करुन सेल्फ गोल केल्याची चर्चा कोल्हापुरात आहे. मंडलिकांनी थेट छत्रपती शाहूंवर प्रश्न उपस्थित करत ते कोल्हापूरचे नसून खरे वारसदार नसल्याचं विधान केलंय. ज्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसह भाजप आणि अजित पवार गटातल्या नेत्यांचीही अडचण झालीय. तर मंडलिकांचा बोलवता धनी कोण? असा प्रश्न काँग्रेसच्या सतेज पाटलांनी विचारलाय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच संजय मंडलिकांसह स्थानिक भाजप नेत्यांनी शाहू महाराज अस्मिता असल्यानं आम्ही वैयक्तिक टीका करणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र त्याच्या काहीच दिवसात मंडलिकांनी थेट कोल्हापूर गादीच्या वारशावरच प्रश्न उभा केलाय.

संजय मंडलिकांच्या या विधानावर राजघराण्यांच्या नेत्यांनी मात्र प्रतिक्रियेस नकार दिलाय. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी बोलण्यास नकार दिलाय. फलटणच्या रामराजे निंबाळकरांनी प्रतिक्रियेस नकार दिला आणि समरजीत घाडगेंनी सुद्दा प्रतिक्रिया दिली नाही. खुद्द कोल्हापूरच्याच असणाऱ्या संजय मंडलिकांनी केलेल्या या विधानानं आश्चर्य व्यक्त होतंय. कारण दत्तक पुत्रांची परंपरा देशातल्या अनेक राजघराण्यांमध्ये राहिलीय.

दत्तक पुत्रांची परंपरा देशातल्या ‘या’ राजघराण्यांमध्ये

स्वतः राजर्षी शाहू महाराज कागलच्या घाटगेंच्या घराण्यातून कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले. मूळ मालेगावातील सयाजीराव गायकवाड बडोद्याच्या गादीवर दत्तक गेले. सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही घराण्यात गेल्या 250 ते 300 वर्षांपासून दत्तक परंपरा चालत आलीय. आत्ताचे शाहू महाराज हे नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आले आहेत. शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आत्ताच्या शाहू महाराजांना नागपूर घराण्यातून दत्तक घेतलं होतं

1970 साली आत्ताचे शाहू महाराज नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आले. त्यावेळी काही काळ शाहू महाराजांना विरोध झाला होता. मात्र नंतर शाहू महाराजांचा स्वभाव आणि कार्यानं तो विरोध मावळला. पण संजय मंडलिकांनी कोल्हापुरात 54 वर्षानंतर पहिल्यांदा वारशाचा वाद छेडलाय. मात्र अशा प्रकारे जर दत्तकाचा प्रश्न काढला गेला तर उद्या राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाडांवर प्रश्न उभे केले जातील. कारण ही दोन्ही महापुरुषही दत्तक आली होती.

तूर्तास विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू या स्वतःच्याच दाव्याला मंडलिकांनी खोटं ठरवत वारशाचा मुद्दा उकरुन काढलाय. मंडलिकांचं हे विधान विरोधकांच्या पथ्यावर पडण्याचीच जास्त शक्यता आहे.

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.