घाटात मरणाचं ट्रॅफीक, परीक्षा द्यायची होती मग पॅराग्लायडिंगने उडत विद्यार्थी परीक्षेला पोहचला
त्याने मित्राला सांगितले की आज मी कामावर आलो होतो. दोन वाजताचा पेपर आहे. घाटात ट्रॅफीक आहे. मी आज येऊच शकणार नाही. परंतू पॅराग्लायडरचे सर त्याच्या मदतीसाठी धावून आले....
आकांक्षा पुढती गगन ठेंगणे, असे म्हटले जाते. एका तरुणाचा एक व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. एका विद्यार्थ्यांला त्याची परीक्षा द्यायची होती. परंतू पाचगणीतील घाटात ट्रॅफीक जाम लागले होते. मग करायचे काय ? या तरुणाची ही अवस्था पाहून पॅराग्लायडिंगचे केद्र चालविणाऱ्यांनी या तरुणाची समस्या ओळखून त्याला घाटातून थेट खाली माळराणावर पोहचवे आणि हा तरुण परीक्षा केंद्रावर आरामात पोहचला याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूयात…
सातारा येथील पाचगणीच्या पसरणी घाटात घडलेला हा प्रकार आहे. येथे पर्यटकांसाठी पॅराग्लायडिंगची उपक्रम गेली अनेक वर्षे सुरु आहे. या पॅराग्लायडिंगच्या एका प्रशिक्षकाने एका तरुणाला निराश बसलेले पाहीले आणि त्यांनी त्याला या निराशेमागचे कारण विचारले तेव्हा त्याने आपली समस्या सांगितली आणि या तरुणाला अलगद पॅराग्लायडिंगने थेट परीक्षा केंद्रावर पोहचले. कारण घाटामध्ये त्या दिवशी भयंकर ट्रॅफीक जाम झाले होते. अखेर धाडस करुन त्या पायलटसोबत या पॅराग्लायडिंगच्या द्वारे घाट उतरण्याचा निर्णय घेतला आणि तो विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचला. ही परीक्षा आता आपण देऊच शकणार नाही म्हणून तो हताश बसला असताना गोविंद येवले हे पॅराग्लायडिंग प्रशिक्षक त्यांच्या मदतीला देवदूत बनून धावून आले.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
कपडे चेंज करुन तो पेपरला पोहचला
समर्थ महागडे हा तरुण वाईतील पसरणी गावात राहतो. हा विद्यार्थी बीकॉम फस्ट इयरचा आहे. त्याच्या परीक्षेची तारीख बदलल्याची त्याला नीट माहिती नव्हती. आणि तो रविवार असल्याने कामाला आला होता. त्यानंतर त्याच्या मित्राचा फोन आल्याने त्याला कळले आज पेपर आहे. तो तर कामाला आला असल्याने आता घाट बाईकने उतरण्यास देखील काही हशील नव्हते. कारण घाटात मोठा ट्रॅफीक जाम झाला होता. अखेर या तरुणाला प्रशिक्षक गोविंद येवले यांनी नाराजीचे कारण विचारले, त्यांनी त्याला पॅराग्लायडिंगने जातोस का असा प्रश्न विचारला. त्याने कधीच पॅराग्लायडिंग केलेले नसल्याने त्याने सुरुवातीला घाबरुन नकार दिला. आणि परीक्षा नंतर देऊ असे म्हटले. परंतू नंतर त्याने मित्राला डोंगराच्या खाली बाईक आणि कपडे घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर पॅराग्लायडिंग पायलट सोबत तो खाली उड्डाण करीत लगेच पोहचला. त्यानंतर खाली उभ्या असलेल्या मित्रांच्या मदतीने तेथेच कपडे चेंज करुन तो पेपरला पोहचला. बीकॉम फस्ट इयरची परीक्षा डेट चेंज करुन रविवारी घेण्यात आली होती. आपला व्हिडीओ कोणी तरी काढू तो व्हायरल केल्याचे त्याला नंतर कळल्याचे समर्थ महागडे याने म्हटले आहे.