Mumbai Pune Express Way : पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक, प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या!
Mumbai Pune Expressway news : मुंबई-पुणे महामर्गावरील किवळे ते सोमाटणे या दरम्यान वाहनधारकांना मार्गस्थ होता येणार नाही. 12 ते 2 या कालावधीत या मार्गावरील ओव्हर हेड गॅन्ट्री हे बसवण्याचे काम केले जाणार आहे. ऐनवेळी वाहनधारकांची गैससोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्वकल्पना देण्यात आली आहे.
पुणे : (Mumbai-Pune Highway) मुंबई-पुणे महामार्गावर कायम (Queues of vehicles) वाहनांच्या रांगा लागेलेल्या असतात. दोन मुख्य शहरातील नागरिकांची वर्दळ या मार्गावर असते. मात्र, आज (शुक्रवारी) किवळे ते सोमाटणे या दरम्यान, दुपारी 12 ते 2 या वेळेत (Traffic block) ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. ओव्हर हेड गॅन्ट्री बसविन्यासाठी एक्सप्रेस हायवेवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन तासात या मार्गावरुन वाहनधारकांना मार्गस्थ होता येणार नाही. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे या महामार्गावरील काम पूर्ण केले जाणार आहे.
किवळे ते सोमाटणे दरम्यान ब्लॉक
मुंबई-पुणे महामर्गावरील किवळे ते सोमाटणे या दरम्यान वाहनधारकांना मार्गस्थ होता येणार नाही. 12 ते 2 या कालावधीत या मार्गावरील ओव्हर हेड गॅन्ट्री हे बसवण्याचे काम केले जाणार आहे. ऐनवेळी वाहनधारकांची गैससोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्वकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या मुंबईहून पुण्याकडे किंवा पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
दोन तास सुरु राहणार काम
भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ नये म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत हे काम केले जाणार आहे. तर वाहनधारकांच्या निदर्शनास यावे म्हणून या मार्गावर गार्डही असणार आहेत. या दोन तासामध्ये ओव्हर हेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत होईल असा विश्वास प्रशासनाला आहे.
असा असणार पर्यायी मार्ग
दुरुस्तीच्या कामासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील वेवर किवळे ते सोमाटणे पर्यंतची वाहतूक ही बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळविण्यात येणार आहे. यामुळे वाहनधारकांची सोय होणार आहे. ऐन वेळची गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.