पूजा खेडकर यांच्याकडून आरोपावर उत्तर देण्यास टाळाटाळ, पुणे पोलिसांची नोटीसही धुडकावली?
पूजा खेडकर या अद्याप वाशिममधील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. त्यांनी विश्रामगृहाची बुकींग वाढवून घेतली आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात उपस्थित राहणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Pooja Khedkar Case Update : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती. यात त्यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र पूजा खेडकर यांनी पुणे पोलिसांची नोटीस धुडकावली आहे. पूजा खेडकर या अद्याप वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत.
पूजा खेडकर यांच्यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप केले होते. या आरोपासंदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरला नोटीस बजावण्यात आली होती. यात त्यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र पूजा खेडकर या अद्याप वाशिममधील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. त्यांनी विश्रामगृहाची बुकींग वाढवून घेतली आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात उपस्थित राहणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
60 तासांपासून वाशिममध्ये मुक्कामी
वादग्रस्त IAS पूजा खेडकर या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात गेल्या 60 तासांपासून मुक्कामी आहेत. पूजा खेडकर यांनी वाशिमच्या विश्रामगृहाची बुकींग उद्या सकाळपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे त्या आज संध्याकाळी वाशिमवरुन निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजा खेडकर या वाशिममधून निघाल्यानंतर पुणे किंवा दिल्लीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 60 तासांपासून पूजा खेडकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.




पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी काल रात्रीच पुण्याला जाणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्याकडून काहीही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे पूजा खेडकर या पुण्याला जाण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे बोललं जात आहे. तसेच त्यांनी पुणे पोलिसांची नोटीसही धुडकावल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे पूजा खेडकर जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात उपस्थित राहणार का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
बडतर्फ करण्याची मागणी
पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण जरी थांबवले असले तरी ही कारवाई पुरेशी नाही. त्यांना बडतर्फ करण्याची गरज आहे. शिवाय त्यांनी ज्या पद्धतीने बनवाबनवी केली त्यावरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
मनोरमा खेडकर यांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी
तर दुसरीकडे आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. धडवली (ता. मुळशी) शेतकऱ्यांना पिस्तूल रोखत धमकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.