नाशिकच्या खमक्या पाटलांची बदली अखेर रद्द; जिल्हा पोलीस अधीक्षकपदीच राहणार, ‘त्या’ आमदाराच्या पत्राची मात्र जोरदार चर्चा

नाशिकचे (Nashik) सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे आणि गुन्हेगाराच्या नाड्या आवळणारे दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन (Sachin Patil) पाटील यांची बदली अखेर रद्द झाली आहे.

नाशिकच्या खमक्या पाटलांची बदली अखेर रद्द; जिल्हा पोलीस अधीक्षकपदीच राहणार, 'त्या' आमदाराच्या पत्राची मात्र जोरदार चर्चा
सचिन पाटील
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 10:09 AM

नाशिकः नाशिकचे (Nashik) सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे आणि गुन्हेगाराच्या नाड्या आवळणारे दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन (Sachin Patil) पाटील यांची बदली अखेर रद्द झाली आहे. त्यांच्या बदलीला मॅट कोर्टाने (Mat Court)तूर्तास स्थगिती दिली असून, डिसेंबर अखेर या बदलीबाबत निर्णय घेऊ असे निर्देशही दिले आहेत. (Transfer of Nashik District Superintendent of Police canceled, who is the MLA writing the letter for Patil’s transfer?)

राज्यातल्या 32 पोलिस अधिकाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात नाशिकच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी शहाजी उमाप यांची बदली करण्यात आली होती. तर पाटील यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागतील आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. या बदलीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. पाटील यांनी केलेल्या धडकेबाज कारवायांमुळे गुन्हेगारीला वेसण बसली होती. त्यामुळे नागरिकांनी स्वतः रस्त्यावर उतरून आणि नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी फलकबाजी करून या बदलीला विरोध केला होता. तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही पाटील यांची बदली रद्द करावी, अशी मागणी केली होती.

‘तो’ आमदार कोण?

पाटील यांच्या बदलीचे प्रकरण मॅट कोर्टमध्ये गेले होते. न्यायालयाने कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना केवळ एका आमदाराच्या पत्रावरून बदली केल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढल्याचे समजते. आता बदली रद्द झाल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच बदली करण्यासाठी उत्सुक असणारा ‘तो’ आमदार कोण होता, याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

धडाकेबाज कामगिरी

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक म्हणून रुजू होताच पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली होती. जिल्ह्यात रेव्ह पार्ट्या, हुक्का पार्टी, अवैध गुटखा प्रकरणांमध्ये पाटील यांनी केलेली कारवाई गाजली. त्यांनी रोलेट किंगचा पर्दाफाश केला. अवघ्या काही महिन्यांत पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळे जनसामान्यांत त्यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख झाली होती. शेतकऱ्यांना फसविणारा व्यापारी वर्ग, रोलेटचा जुगार चालविणारे, भूमाफिया या साऱ्यांना पाठिशी घालणारे राजकारणी यांच्या नाड्या पाटील यांनी आवळल्या होत्या. पाटील यांच्या कार्याकाळात गुन्हाचा छडा लवकर लागत असे. त्यामुळेच त्यांची बदली केल्याचा आरोप होता. (Transfer of Nashik District Superintendent of Police canceled, who is the MLA writing the letter for Patil’s transfer?)

इतर बातम्याः 

असा जीव तोळा तोळा…सोने 600 रुपयांनी स्वस्त…जाणून घ्या नाशिक सराफातील भाव

धक्कादायकः दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…ढकलेला मित्र जागेवर गतप्राण…नाशिकमधली चटका लावणारी घटना

नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने टाकली कात; आता पदवी प्रमाणपत्रे ‘डिजिलॉकर’द्वारे मिळणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.