AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोनच दिवसात नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द

नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करण्यात आली आहे (Navi Mumbai commissioner Annasaheb Misal transfer cancel).

दोनच दिवसात नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 7:50 PM

नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे (Navi Mumbai commissioner Annasaheb Misal transfer cancel). त्यामुळे अण्णासाहेब मिसाळ हेच आता नवी मुंबईचे आयुक्त असतील. आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊपर्यंत ते नवी मुंबई आयुक्तपदी कायम राहतील अशी माहिती मिळतेय. मिसाळ यांच्या जागेवर अभिजित बांगर यांची नियुक्ती झाली होती. नवी मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा होती. नवी मुंबईचा कोरोनाबधितांचा आकडा 5 हजार पार गेलाय. मात्र, बदलीच्या आदेशानंतर दोनच दिवसात ही बदली रद्द झाली.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात राज्य सरकारने अचानक मिसाळ यांची बदली केल्यामुळे महापालिका वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत होत्या. मात्र त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. अण्णासाहेब मिसाळ यांची जुलै 2019 ला तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या जागेवर बदली झाली होती. मिसाळ यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करून संवाद वाढवला. तसेच रामास्वामी यांनी राबवलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मिसाळ यांना महापालिकेची सूत्रे स्वीकारुन काही महिने न उलटले तेच कोरोना सारख्या आजाराने शहरात शिरकाव केला.

वाशीत सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भव्य क्वारंटाईन केंद्र तयार करुन मिसाळ यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. मात्र तरी देखील काही नाराज लोकांकडून मिसाळ यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरुच होते. मिसाळ यांना निवृत्त होण्यासाठी काही वर्षे शिल्लक असल्यामुळे त्यांना नवी मुंबई महापालिका नियुक्ती देण्यात आली होती. मिसाळ यांना महापालिकेत जेमतेम एक वर्ष होत आलं आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी राज्यातील 3 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. यात नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकांच्या आयुक्तांचाही समावेश होता. यानंतर मिसाळ यांच्या जागेवर तुकाराम मुंढे यांच्याआधी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या अभिजीत बांगर यांची नियुक्त करण्यात आली. मागील चार महिन्यात त्यांची दुसऱ्यांदा बदली झाली. मात्र, दोनच दिवसात त्याची ही नियुक्ती देखील अधांतरी राहिली आहे.

यंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंत बांगर हे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार सांभाळत होते. मात्र त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महिनाभर बांगर यांच्याकडे कोणतेही खाते नव्हते. फेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग संचालक म्हणून अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

आता जेमतेम चार महिन्यात पुन्हा त्यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी सांभाळले होते, आता तिथेच बांगर यांची बदली झाली होती. मात्र, ही नियुक्ती देखील रद्द झाली आहे.

कोण आहेत अभिजीत बांगर?

  • 2008 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी
  • युवा आणि धडाडाचे सनदी अधिकारी म्हणून ओळख
  • सध्या नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त
  • नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2020 असे 14 महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम
  • 14 महिन्यात कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली, स्वच्छ भारतमध्ये नागपूरचा क्रमांक सुधारला
  • फेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून बदली झाली, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता
  • अखेर नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली

उल्हासनगर, मीरा भाईंदर महापालिकेला नवे आयुक्त 

दुसरीकडे, राज दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर विजय राठोड यांची मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या या कामाचा आढावा घेऊनच केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीचे कारण तर नाही ना, अशी चर्चा आता सुरु झाली होती. अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीमुळे महापालिकेत तर्कवितर्कांना उधाण आले होते. अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह आणखी दोन सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. डॉ. विजय राठोड यांची मीरा भाईंदर मनपा आयुक्तपदी तर डॉ. राज ध्यानिधी यांची उल्हासनगर मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची तडका फडकी बदली, अभिजित बांगर नवे आयुक्त

IAS Transfer | राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली, तीन महापालिकांचे आयुक्त बदलले

IAS Transfer | ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली, डॉ. विपीन शर्मा नवे आयुक्त

Navi Mumbai commissioner Annasaheb Misal transfer cancel

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....