House Flies Home Remedies: ‘या’ रामबाण उपायांनी घरातील माश्या लावा पळवून

पावसाळ्याच्या दिवसात घरात माश्यांचा खूप त्रास होतो. अनेक पदार्थांवर भिरभिरणाऱ्या माश्यांमुळे बरेच आजारही पसरू शकतात. माश्यांच्या या त्रासापासून मुक्ती मिळवायची असेल तर काही घरगुती उपाय करून पहा. घरात पुन्हा कधीही माश्या दिसणार नाहीत.

House Flies Home Remedies: 'या' रामबाण उपायांनी घरातील माश्या लावा पळवून
घरातील माशा पळवून लावण्याचे उपायImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 11:08 AM

House Flies: पावसाळ्याच्या दिवसात (Monsoon Season) घरात माश्यांचा खूप त्रास होतो. दरवाजे किंवा खिडकी उघडी राहिल्यास त्या हमखास घरात शिरतात. विशेषत: ज्या घरात लहान मुले अथवा वृद्ध व्यक्ती राहतात, तिथे माश्यांचा (House Flies)वावर बराच त्रासदायक ठरू शकतो. अनेक पदार्थांवर भिरभिरणाऱ्या माश्यांमुळे बरेच आजारही (Falling Sick) पसरू शकतात. बाहेरची घाण त्यांच्यामुळे घरात येऊ शकते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता, गंभीर आजार होऊ शकतात. त्याशिवाय दिवसभर त्यांच्या भुणभुणीमुळे वैताग येतो, ना धड काम करता येतं ना आपण शांतपणे झोपू शकतो. जर तुम्हीही माश्यांच्या त्रासामुळे वैतागला असाल तर खाली दिलेले काही घरगुती उपाय (Home Remedies) करून पहा. घरात पुन्हा कधीही माश्या दिसणार नाहीत.

ॲपल सायडर व्हिनेगर –

एका ग्लासमध्ये ॲपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) घेऊन त्यात भांडी घासण्याचा लिक्विड सोपचे काही थेंब टाकावेत. त्यानंतर त्या ग्लासवर स्वयंपाकघरात वापण्यात येणारा प्लॅस्टिक रॅप रबर बँडच्या सहाय्याने घट्ट लावावा. एक टुथपिक घेऊन ग्लासवर लावण्यात आलेल्या प्लॅस्टिक रॅपवर छोटी-छोटी छिद्रं / भोकं पाडावीत. ज्या जागी माश्या जास्त घोंगावतात, त्या जागी आता हा ग्लास ठेवावा. माश्या त्या ग्लासमध्ये प्रवेश करतील आणि भांडी घासण्याच्या लिक्विड सोपमुळे पुन्हा बाहेर पडू शकणार नाहीत.

मीठाचे पाणी –

एक ग्लास पाण्यात दोन चमचे मीठ घाला. आता हे मिश्रण नीट ढवळा. पाण्यात मीठ पूर्णपणे विरघळल्यानंतर ते पाणी एका स्प्रे- बॉटलमध्ये भरावे आणि माशांवर फवारावे. घरातून माश्या पळवून लावण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

पुदीना व तुळस –

घरातील माश्या पळवून लावण्यासाठी पुदीना आणि तुळस यांचाही उपयोग करता येऊ शकतो. पुदीना आणि तुळस यांची बारीक पूड अथवा पेस्ट तयार करावी. हे मिश्रण पाण्यात मिसळावे. ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये घालून माश्यांवर तसेच त्या , ज्या जागी जास्त घोंगावतात, तिथे फवारावे. हा स्प्रे कीटकनाशकाप्रमाणे असल्याने त्यामुळे माश्यांच्या उपद्रव नक्की कमी होईल.

दूध आणि काळी मिरी

हे मिश्रण तयार करण्यासाठी प्रथम एका ग्लासमध्ये दूध घ्यावे. त्यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर (Black Pepper) आणि तीन चमचे साखर घालावी. हे मिश्रण नीट मिसळन, दुधात साखर पूर्णपणे विरघळू द्यावी. ज्या जागी माश्यांचा जास्त उपद्रव असेल, तिथे हा दुधाचा ग्लास ठेवावा. माश्या या मिश्रणाकडे आकर्षित होतील आणि त्याला चिकटून डुबतील.

व्हीनस फ्लायट्रॅप

व्हीनस फ्लायट्रॅप ( Venus Flytrap) ही एक मांसाहारी वनस्पती (Carnivorous Plant) असून ते कीटक- किडे यांचे भक्षण करते. घराच्या आत किंवा बाहेरच्या परिसरात व्हीनस फ्लायट्रॅपचे रोप लावावे. या रोपाचे तोंड उघडे असते, माश्या त्यांच्यावर येऊन बसल्यास, ते रोपटे त्यांना खाऊन टाकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.