तुळजाभवनी मंदिरातील ड्रेस कोड प्रकरणात संस्थानचा काही तासांत ‘यु टर्न’

tuljabhavani temple : देशभरातील काही मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोडचे नियम तयार करण्यात आले आहे. तुळजाभवनी मंदिरात हा प्रयोग लागू करण्यात आला. परंतु काही तासांत हा निर्णय मागे घेण्यात आला. आता मंदिरात कोणत्याही परिधानात जात येणार आहे.

तुळजाभवनी मंदिरातील ड्रेस कोड प्रकरणात संस्थानचा काही तासांत 'यु टर्न'
Temple rule
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 12:13 PM

संतोष जाधव, धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी नियमावली तयार केली होती. मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू केला होता. मंदिर परिसरात यासंदर्भात फलक लावण्यात आले होते. संस्थानच्या या निर्णयाचे अनेक जणांकडून स्वागत करण्यात आले होते. काही जणांनी विरोधही केला. नियमावलीचे पालन न करणाऱ्या लोकांना मंदिराच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी आडवण्यात आले होते. या निणर्याची अंमलबजावणी गुरुवारी दुपारपासून सुरु झाली. त्यानंतर मंदिर संस्थानने यु टर्न घेत सात तासांत निर्णय फिरवला. आता मंदिरात जातांना कोणतेही निर्बंध नसणार आहे.

काय घेतला निर्णय

तुळजाभवानी मंदीर संस्थानने भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न घेतला आहे. मंदिरात आता भाविकांना कपड्याच्या कोणत्याही निर्बंध शिवाय प्रवेश दिला जात आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांकडून गुरुवारी रात्री काढण्यात आले. गुरुवारी दुपारी मंदिर प्रशासनाने मंदिरात तोडक्या कपड्याने जात येणार नाही, असा निर्णय अचानक घेतला. त्यासंदर्भातील फलक लावण्यात आले. दुपारीनंतर वेस्टर्न कपडे किंवा तोडके कपडे असणाऱ्या कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. परंतु यानंतर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालणाऱ्यांना काल नो एन्ट्री केली होती. त्याबाबत बॅनर सुद्धा लावले होते. मात्र तो निर्णय मागे घेतला असून बॅनर काढले आहेत. अवघ्या 7 तासात मंदिर संस्थांनाने भूमिका बदलत निर्णय मागे घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे नियम

तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री केली होती. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. गुरुवारी तोडके कपडे असलेल्या भाविकांना मंदिर प्रवेशदारावर अडवण्यात आले होते. अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही. भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भाव ठेवण्याचे मंदिर संस्थांनने आवाहन केले होते.

पुरुषांसाठी आहे नियम

कपडे परिधान करण्याचा नियम फक्त महिलांसाठी नाही. हा नियम पुरुषांसाठीसुद्धा लागू केला होता. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले . गुरुवारी बरमुडावर आलेल्या अनेक मुलांना मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. संस्थानच्या या निर्णयाचे मंदिरातील पुजारी आणि स्थानिक भाविकांनी स्वागत केले होते. परंतु काही जणांनी विरोधही केला.

बैठकीत घेतला निर्णय

18 मे रोजी मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावले होते. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाने सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...