रोज संध्याकाळी तीन तास टीव्ही, मोबाईल राहणार बंद; या ग्रामपंचायतीने घेतला ठराव

आताच्या काळात मुलाचा व पालकांचा संवाद होत नाही. त्यामुळे मुलांनादेखील अभ्यासाचा ताण वाटत आहे. त्यामुळे अनेक मुले तणावाखाली राहत आहेत. विद्यार्थी तणावमुक्त झाला पाहिजे.

रोज संध्याकाळी तीन तास टीव्ही, मोबाईल राहणार बंद; या ग्रामपंचायतीने घेतला ठराव
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 9:01 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील माणगाव या गावाने आपल्या 15 हजार रहिवाशांना वाचनाची सवय वाढवण्याचा संकल्प केला. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधणेसुद्धा गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांमधील गॅझेटची सवय सोडण्यासाठी दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत त्यांचे मोबाईल आणि घरातील टीव्ही बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव हे गाव 15 हजार लोकसंखेचे गाव आहे. या गावामध्ये दरवर्षी गावाच्या हितासाठी काही न काही ठराव केला जातो. यावर्षी महिला दिनानिमित्त गावचे सरपंच राजू मगदूम व सदस्यांनी गावातील रात्री ६ ते ९ या दरम्यान मोबईल घरातील टीव्ही बंद ठेवण्याचा संकल्प केला. मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आपला व आपल्या मुलाचा संवाद झाला पाहिजे, असा एकमुखी निर्णय घेतला आहे.

आताच्या काळात मुलाचा व पालकांचा संवाद होत नाही. त्यामुळे मुलांनादेखील अभ्यासाचा ताण वाटत आहे. त्यामुळे अनेक मुले तणावाखाली राहत आहेत. विद्यार्थी तणावमुक्त झाला पाहिजे. आपला अभ्यास व आई वडिलांकडे लक्ष दिले पाहिजे. या अनुषंघाने माणगाव गावातील सरपंच राजू मगदूम व सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

सायंकाळी सहा वाजता वाजेल सायरन

ग्रामपंचायत इमारतीच्या वरच्या बाजूला एक सायरन बसवण्यात आला आहे. तो दररोज संध्याकाळी 6 वाजता वाजेल. ग्रामस्थांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट बंद करण्यास सांगतील. तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरुवातीला जनजागृती करण्यासाठी घरोघरी भेट देणार आहेत. लोकांना गॅझेट न वापरण्यास सांगणार आहेत. त्याऐवजी कुटुंबातील सदस्यांशी गप्पा मारा किंवा पुस्तक वाचा, असे आवाहन करणार आहेत. संध्याकाळी ७ च्या सुमारास सायरन वाजवून नागरिकांना सूचना दिली जाईल. पाच वेळा कुटुंबाला सूचना दिली जाईल. जे कुटुंब या नियमाचे पालन करणार नाहीत, कुटुंबाने सहाव्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास मालमत्ता कर वाढीच्या स्वरूपात दंड आकारला जाईल.

गावाला मिळाले अनेक पुरस्कार

ग्रामपंचायतीने परिसरातील केबल ऑपरेटरना दररोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत त्यांची सेवा खंडित करण्यासाठी पत्र लिहिले आहे. ज्यांच्याकडे DTH कनेक्शन आहे त्यांना त्यांचे टीव्ही सेट बंद करण्याचे आवाहन केले. तसेच या गावामध्ये स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येते. त्यामुळे या गावाला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच गावामध्ये फिल्टर पाण्याचे प्लांटही बसवण्यात आले आहेत. माणगाव हे गाव कायम कोणत्याना कोणत्या निर्णयामुळे कायम चर्चेत असते. आता ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.