Maharashtra Breaking News LIVE 28th March 2025 : छत्रपती संभाजी महाराजांची 336 वी पुण्यतिथी पुण्याच्या वढु बुद्रुक येथे साजरी होणार
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 28 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

पुणे शहरात गुन्हेगारींचे 2576 हॉटस्पॉट पुणे पोलिसांकडून मॅपिंग सुरु. सर्वाधिक गुन्हे परिमंडळ पाच आणि तीन मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत असल्याचे समोर… पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जास्त गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी रेड झोन हॉटस्पॉट करून लक्ष देण्याचं काम सुरु आहे… दोन सत्रात पाच वेळा गस्त घालण्यावर पुणे पोलिसांनी भर दिला आहे. पिंपरी पोलिसांनी बेटिंग प्रकरणी माजी नगरसेवकाच्या पुतण्यासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. पिंपरी पोलिसांनी दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मयूर चंदर मेवानी, धीरज चंदर मेवानी आणि आकाश हरेश आहुजा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. ही कारवाई राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असताना छापा टाकून कारवाई करण्यात आली. पोलीस कर्मचारी विष्णू भारती यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील शहीद भगतसिंग पथ रस्ता बनला अपघाताचा रस्ता… शहीद भगतसिंग पथावरील पेव्हर ब्लॉक आणि रस्त्याच्या उंचीतील फरकामुळे वाहनचालकांना अडचण. रिक्षाचालकांना आणि वाहन चालकांना धक्का मारून वाहने काढावा लागत असून अपघाताचे प्रमाण वाढल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. चार दिवसांत रस्ता दुरुस्त न केल्यास रिक्षा चालकांनी रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील मह्तवाच्या बातम्यांचे अपडेट्स घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
मंत्री गणेश नाईक यांची टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांना तंबी
महामार्गांवर आता प्लास्टिक आणि कचरा दिसल्यास त्या दिवशीचा टोल देणार नाही
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात हद्दीपासून मुंबईच्या हद्दीपर्यंत उद्यापासून स्वच्छता वाहने फिरली पाहिजे
महामार्गांवरील स्वच्छता ही टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी
मंत्री गणेश नाईक यांचे जिल्हा प्रशासनासह , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंपन्यांना निर्देश
-
छत्रपती संभाजी महाराजांची 336 वी पुण्यतिथी पुण्याच्या वढु बुद्रुक येथे साजरी होणार
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा 336 वी पुण्यतिथी पुणे जिल्ह्याच्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक या गावी उद्या संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अन्य खासदार आमदार आणि शिवछावाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.
-
-
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे करण्यात आली आहे. ब्रह्मपुरीचे तापमान 42.2 नोंदवण्यात आले आहे तर चंद्रपूरचे तापमान 41.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.
-
जोगेश्वरीमध्ये तबेल्याला आग
जोगेश्वरीमध्ये एका तबेल्याला आग लागली. अग्निशमन दलाने आगीची पातळी १ घोषित केली आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
-
एप्रिल महिन्यात प्राथमिक शाळा सुरु ठेवण्यावरुन वाद
विदर्भातील प्राथमिक शाळा २५ एप्रिलपर्यंत सुरु ठेवण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विरोध केला आहे. महामंडळाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
-
-
क्लोजर रिपोर्ट संशयास्पद
मालवणी पोलिसांनी दिशा सालियन प्रकरणात जो तथाकथित क्लोजर रिपोर्ट दिला आहे, त्यावर आम्हाला संशय वाटतो. कारण या प्रकरणाची चौकशी सुरु असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुलाचे नाव या प्रकरणात आले होते, असे शिवसेना नेते संजय निरुपन यांनी म्हटले आहे.
-
महाराष्ट्रातील तरुणीची बंगळूरुमध्ये पतीकडू हत्या
महाराष्ट्रातील तरुणीची पतीने बंगळूरुमध्ये हत्या केली आहे. पती आणि पत्नीमध्ये वाद झाले होते. त्यानंतर पतीने पत्नीवर चाकूने वार केले. त्यानंतर पतीने मृतदेह ट्रॅव्हल सुटकेसमध्ये भरला आणि पळून जाण्यापूर्वी तो बाथरूममध्ये ठेवला. पुणे पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
-
नागपूरमधील भंडारा परिसरात चालत्या ट्रकला आग
नागपूर येथील भंडारा परिसरात एका चालत्या ट्रकला आग लागली आहे. हा ट्रक संसार उपयोगी सामानाची वाहतुक करत होता. अचानक आग लागल्यामुळे ट्रकमधील सर्वसामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
-
संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ आणि 8 फोटो रिकव्हर
संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ आणि 8 फोटो रिकव्हर झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तब्बल 2 तास संतोष देशमुखांना आरोपींकडून मारहाण झाली. दुपारी 3 वाजून 46 मिनीटांनी मारहाण करतानाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी घुलेला मारहाण केल्याची असं आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कृष्णा आंधळेने सुग्रीव कराडचं नाव सांगितल्याचंही म्हटलं. तसेच देशमुखांची हत्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरूनच झाली फक्त ते जबाबातून येण्याचं बाकी आहे. असं वक्तव्य आंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. पोलीस चौकशीत सर्व माहिती समोर येईल असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
-
बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही त्यांचे फोटो आम्ही लावत नाही: संदीप देशपांडे
मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. “महापौरचा कोट्यावंधींचा बंगला स्मारकासाठी घेतला मग बाळासाहेब तुमचेच कसे. बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही त्यांचे फोटो आम्ही लावत नाही. आमच्या पक्षाचं ते धोरण नाही” अशी टीका संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
-
नांदेड मनपा कचरा निविदा प्रक्रियेस स्थगिती
नांदेड मनपा कचरा निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. भाजप पदाधिकार्यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नांदेड महानगरपालिकेने राबवली निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
-
अखेर तो बिबट्या जेरबंद
नाशिकच्या दारणा धरण काठ परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. नानेगाव येथे असलेल्या शिंदे मळ्यात पंधरा दिवसात दुसरा बिबट्या जेर बंद करण्यात आला. तर मागच्या काही महिन्यांपासून सातवा बिबट्या जेरबंद करण्यात आला. वनविभागाकडून पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता.
-
भुसावळ रेल्वे स्थानकावर दीड कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त
पाटणा पुणे एक्सप्रेस मधून भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरलेल्या एकावर रेल्वे सुरक्षा पथकाला संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ पाचशे रुपयाचे 30 नकली बंडल आढळून आले आहे अंदाजे दीड कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
-
क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर नाही
मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला नाही, असा दावा सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी केला. ते याप्रकरणी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचे म्हटले.
-
आंबिवलीतील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
आंबिवलीतील कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नईत चकमकीत ठार झाला. बनेली स्मशानभूमीत आज दफनविधी होत आहे. आंबिवली परिसरात तणावाचे वातावरण आहे. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
-
मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवरून ट्विस्ट
मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवरून नवीन ट्विस्ट आला आहे. या रिपोर्टनुसार, दिशा सालियन हिने आत्महत्या केली. वडिलांच्या अफेअर आणि सतत पैसे मागत असल्याच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याचे क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
-
आसाराम बापूविषयी अजब विधान
आसाराम बापूचा संपद्राय अजून संपलेला नाही, असे अजब विधान उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
-
नाशिकला देखील तीर्थक्षेत्र अ दर्जा मिळावा
फक्त त्रंबकेश्वरच नाही तर नाशिकला देखील तीर्थक्षेत्र अ दर्जा मिळावा. अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. फक्त अ दर्जा देऊन उपयोग नाही. कुशावर्त आणि रामतीर्थाच्या परिघात मास, मद्य विक्री कायमस्वरूपी बंद करावी. हरिद्वारच्या धरतीवर नाशिक आणि कुशावरताचा विकास व्हावा. गोदावरी प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ वाहण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे.
-
202 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी जाहीर होणार
नाशिक जिल्ह्यातील 202 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा असून पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या आणि मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक इगतपुरी तालुक्यात 65 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
-
नाशिक – सिंहस्थात रामकुंड, कुशावर्तावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार
नाशिक – सिंहस्थात रामकुंड, कुशावर्तावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या गर्दीची माहिती मिळण्याकरिता ड्रोन कॅमेरे लावणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबक येथील गर्दी नियोजनाकरिता प्रशासन ड्रोन कॅमेरे लावण्याच्या तयारीत आहे.
कुंभमेळ्याच्या बैठकीत ड्रोन कॅमेरे लावणं आवश्यक असल्याचं मत अधिकाऱ्यांनी मांडलं होतं. सीसीटीव्ही कॅमेरेसाठी नवीन निविदा काढण्याचं सूचित करण्यात आलंय.
-
खाजगी सावकाराच्या व्याजाच्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या
जळगावातील चंदू अण्णा नगरात खाजगी सावकाराच्या व्याजाच्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. मुकेश अर्जुन पाटील असं 35 वर्षीय आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पावित्रा होता. नातेवाईकांच्या आक्रमक पावित्र्यनंतर तब्बल सात ते आठ तासानंतर याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
Maharashtra News: रोहित कुंडलवालच्या फरार कुटुंबीयांचा चौदाव्या दिवशी देखील शोध सुरू
पंचवटी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रोहित कुंडलवालची चौकशी सुरू… चौकशीत ठोस माहिती हाती न लागल्याने 14 मार्चपासून कुंडलवाल कुटुंबीयांचा शोध सुरू…. रोहित कुंडलवालवर अवैध सावकारी, अपहरण, फिर्यादी दाखवून जीव मारण्याची धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल… शहरातील पाच पोलिस ठाण्यांमध्ये कर्जदारांनी दिलेल्या तक्रारींमुळे दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली… वडील कैलास कुंडलवाल, भाऊ निखिल कुंडलवाल आणि आई यशोदा कुंडलवाल अद्याप पोलिसांना सापडले नाहीत… पोलिसांकडून शोध पथकाद्वारे तपास सुरू…
-
Maharashtra News: पुण्यातील वाढत्या तापमानाचा फटका शाळांना…
शाळांमधील विद्यार्थी हजेरी संख्या 18 ते 25 टक्क्यांनी घटली… उन्हाचा चटका वाढल्याने विद्यार्थी शाळेत जाण्यास देत आहेत नकार…
-
Maharashtra News: पिंपरी चिंचवड शहरातील दोन लाखांहून अधिक मुलांचे ‘जेई’ लसीकरण पूर्ण
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाची लसीकरण मोहीम होत आहे यशस्वी… पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या जापनीज मेंदूज्वर (जेई) प्रतिबंधक लस मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे… आतापर्यंत शहरातील दोन लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात आली आहे… संपूर्ण शहरात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत २५ मार्च २०२५ पर्यंत २ लाख ७ हजारांहून अधिक बालकांचे जेई लसीकरण करण्यात आले आहे.
-
Maharashtra News: ठाण्यात हवा प्रदूषणात वाढ झाली असताना आता ध्वनी प्रदूषणात देखील वाढ झाल्याची माहिती समोर
ठाण्यातील 30 प्रमुख चौकापैकी 14 चौकातील ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली… पर्यावरण अहवालात नमूद… विनाकारण हॉर्न वाजविणे, सुरू असलेले बांधकाम ,सणासुदीत मोठ्या आवाजात ढोल ताशे अनेक आणि गाणी वाजविणे यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे..
Published On - Mar 28,2025 8:11 AM





