Maharashtra Breaking News LIVE 7th March 2025 : सोलापुरात लोहार समाजाकडून विविध मागण्यांसाठी उपोषण
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 7 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहे. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर बोलण्यापूर्वी सभागृहात या राजीनाम्याची माहिती द्यायला हवी होती, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. 48 तासांनंतरही सभागृहात विरोधकांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली नसल्याने महाविकास आघाडी आज आक्रमक होण्याची शक्यता आहे. भंडाऱ्याच्या वरठी गावातील रेल्वे पुलावर ट्रकची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर रोष व्यक्त करण्यात येत आहे, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं. भारतीय जनता पक्ष आज अनिल परबांविरोधात आंदोलन करणार. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अनिल परबांच्या भाषवार भाजपने आक्षेप घेतला आहे. स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली. गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा सह सर्वत क्षेत्रातील महत्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हाँ ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात ईडीचे छापे
राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात ईडीचे छापे सुरू आहेत. अंमलबजावणी संचालनालयाचे पथक सहाहून अधिक शहरांमध्ये छापे टाकत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी पियुष नवलखा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात येत आहेत. हे बेकायदेशीरपणे परदेशात पैसे पाठवण्याचे प्रकरण आहे. कस्टम्सने अनेक गुन्हे दाखल केले होते. या आधारावर, ईडीने मनी लाँड्रिंग अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
-
अयोध्या आणि काशीनंतर आता मथुराची पाळी – मुख्यमंत्री योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्या एक सुंदर शहर बनले आहे. प्रयागराज सूर्यकिरणांनी चमकत आहे. आता मथुराची पाळी आहे. थोडी वाट पाहा. बरसानाच्या रंगोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी उपस्थित होते.
-
-
सर्वोच्च न्यायालयात पेगासस प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार
सर्वोच्च न्यायालय २२ एप्रिल रोजी पेगासस प्रकरणाची सुनावणी करणार आहे. शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आम्ही पुढील महिन्याच्या २२ तारखेला यावर सुनावणी करू.
-
सोलापुरात लोहार समाजाकडून विविध मागण्यांसाठी उपोषण
लोहार समाजाकडून विविध मागण्यांसाठी सोलापूरातील टाकळी(टे) गावात गेल्या 5 दिवसांपासून दादा कळसाईत यांचे उपोषण सुरु आहे. प्रशासन आणि सरकार लोहार समाजाच्या या उपोषण आणि आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याने आंदोलनकर्त्यांकडून निषेधार्थ घोषणा दिल्या जात आहेत. तसेच आंदोलनस्थळी यशवंत कळसाईत या लोहार समाज बांधवाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आत्महत्येपासून रोखले.
-
चंद्रपुरात वाघाच्या हल्यात मेंढपाळ ठार, मुल एमआयडीसी परिसरातील घटना
चंद्रपुरात वाघाच्या हल्यात मेंढपाळाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुल एमआयडीसी परिसरातील ही घटना आहे. वाघाने एमआयडीसी परिसरात शेळ्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला. या दरम्यान मेंढपाळ निलेश दुर्गा कोरेवार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मुल तालुक्यातील चिमढा शेतशिवारात केलझरकर यांच्या शेतात शेळ्या मेंढ्याचा कळप मुक्कामी होता. निलेश कोरेवार आणि योगेश कोरेवार हे दोघेही भाऊ सोबत होते. तेव्हा वाघाने हल्ला करून निलेश याला फरफटत नेले. याबाबतची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाला शोधमोहीमदरम्यान एमआयडीसी कपंनीच्या मागील जंगलात मृतदेह आढळला. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
-
-
पोलीस स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेसह गुनाट गावात
मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुनाट या गावात घेऊन आले आहेत. पोलिसांनी दत्तात्रय गाडे या विकृताच्या गुनाट या गावातून मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी गाडेला नेमक्या ज्या जागेवरुन पकडलं त्याच ठिकाणी त्याला घेऊन आले आहेत. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल हस्तगत करण्यासाठी त्याला गुणाटमध्ये आणल्याची माहिती आहे.
-
मनोज जरांगेवर मानसिक उपचाराची गरज आहे – लक्ष्मण हाकेंची टीका
कैलास बोराडे बोळसर स्वभावाचा माणूस आहे. तो दारुडा आहे किंवा देवाची विटंबना करतोय असं ठरवून त्याचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी विचारला.
कट रचून जीव घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला. जरांगेचा डोक्यावर इलाजाची आवश्यकता आहे. मीडियाने आठ दिवस त्याच्यावरचा कॅमेरा हटवा. जरांगेवर मानसिक उपचाराची गरज आहे, अशी टीकाही हाकेंनी केली,
-
जरांगे यांनी महाराष्ट्राला दृष्ट लावलीय – लक्ष्मण हाके
कैलास बोराडे भोळसर स्वभावाचा माणूस आहे. तो दारुडा आहे किंवा देवाची विटंबना करतोय असं ठरवून त्याचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? कट रचून जीव घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे.जरांगेचा डोक्यावर इलाजाची आवश्यकता आहे.जरांगेंनी महाराष्ट्राला दृष्ट लावली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
-
मुंबई काँग्रेस कार्यालयाला लवकरच लागणार टाळे – संजय निरुपम
पीडब्ल्यूडी आवरत असलेल्या काँग्रेस कार्यालयाचे 18 लाख भाडे सरकारला दिले नाही त्यामुळे वीज मीटर काढून नेला आहे.काँग्रेस कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून पगार नाही.शिवसेना पक्षासोबत काँग्रेस गेल्यामुळे काँग्रेस संपली अशी टीका शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली आहे..
-
दीड कोटी ग्राहक वीजबिलापासून होणार मुक्त
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना यातही आपण नंबरवर आहोत. पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेच्या धर्तीवर आपण योजना आणत आहोत. या योजनेत आपल्याकडे एकूण घरगुती ग्राहक आहेत. त्यांच्या ७० टक्के ग्राहक शून्य ते १०० युनिट वीज वापरतात.
त्यांच्यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या धर्तीवर आपण योजना करत आहोत. त्या योजनेमुळे हे ७० टक्के ग्राहक या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. म्हणजे दीड कोटी ग्राहक विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
-
साऱ्याच शंकाची अशी मागू नको उत्तरे – फडणवीसांनी उद्धृत केल्या सुरेश भटांच्या ओळी
साऱ्याच शंकाची अशी मागू नको उत्तरे असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे?
असं सुरेश भट म्हणतात. त्यामुळे तरुणांनी शंका उपस्थित केली तर समजू शकतो. पण जयंतराव तुम्ही व्यक्त करणं बरं नाही. तुमचा प्रॉब्लेम आहे की, तुम्ही योग्य लोकांसोबत बसलेले नाहीयेत. रोहित पवार बोलू शकतात. ते अनभिज्ञ आहेत असं म्हणणार नाही. ते तुलनेने तरुण आहेत. तरुण आणि वरुण बोलू शकतात. तुम्ही बोलणं योग्य नाही – असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
-
राज्यात 13 हजार 900 किलोमीटरचे रस्ते आपण बांधणार आहोत – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत आहेत. अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.
राज्यात 13 हजार 900 किलोमीटरचे रस्ते आपण बांधणार आहोत
मतदार संघ न पाहता आपण रस्ते करणार आहोत
6 हजार किलोमीटरचे हायवे आपण करत आहोत
4 हजार गावाना काँक्रिटी रस्त्याने जोडणार
निवडणुकीमुळे आपण कंत्राट दाराना बिले दिली नव्हती
अर्थ मंत्र्यांनी पुढाकार घेतला तर पैसे निघतील
गुलाबी जॅकेट मला अर्थ मंत्र्यांनी शिवून दिले
शक्ती पीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार आहे
प्रमुख शक्ती पीठे आहेत तिथून हा महामार्ग जोडणार आहोत
शक्ती पीठ महामार्गाने मराठवाड्याचा विकास होणार आहे
-
पुण्यात बाबा आढाव यांचे आंदोलन
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या सक्ती विरोधात पुण्यात बाबा आढाव यांच्यासह प्रवासी व मालवाहतूकदार संघटनांचे आंदोलन सुरू आहे. पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.
-
राणा जगजितसिंह पाटील यांची निवड
राज्याला आर्थिक व धोरणात्मक दिशा देणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राणा जगजितसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. ‘मित्र’ उपाध्यक्ष म्हणून शासन आदेशाद्वारे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली.
-
राज्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा
यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा बसणार आहे. महाराष्ट्र तापणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले. राज्यात पुढील काही दिवस उष्ण तापमान असणार .सोलापूर मध्ये जास्त तापमान ३९,° नोंद झाली आहे.
-
महापुरूषांच्या अवमानप्रकरणी विशेष कायदा मंजूर करा
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महापुरुषांच्या अवमानाची चौकशी वगैरे काही नाही, एक विशेष कायदा मंजूर करा, आजामीन पात्र कायदा करा, त्याची चौकशी मोठ्या अधिकाऱ्याकडून चौकशी व्हायला हवी. याच अधिवेशनात हा कायदा मंजूर करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.
-
वसई-विरार महापालिकेचा आज 3 वाजता अर्थसंकल्प सादर होणार
सण 2024-25 सुधारित अर्थसंकल्प आणि सण 2025-26 चा मूळ अर्थसंकल्प दुपारी 3 वाजता आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार पालिकेच्या मुख्यालयात सादर करणार आहेत.
-
कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप
बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. चंद्रपुरात हे वाटप सुरू असून याला कामगारांची मोठी गर्दी उसळली आहे,सुमारे दाहा हजार कामगारांना इथे साहित्याचे वाटप केले जाणार आहे. कामगार विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात सध्या इमारत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप केले जात आहे.
-
भैय्याजी जोशींचा निषेध केला का तुम्ही?
मराठी ही मुंबईची भाषा नाही, असे भैय्याजी जोशी म्हणाले. त्यावर मराठी हीच राज्याची भाषा आहे, असे थातुरमातूर उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पण त्यांनी जोशींचा निषेध केला का? असा खडा सवाल संजय राऊत यांनी केला.
-
चिल्लर कोरटकर कोणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतोय? – संजय राऊत
“चिल्लर कोरटकर कोणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतोय? प्रशांत कोरटकर अजूनही कसा सापडत नाही? मराठीबद्दल वक्तव्य करणं भाजपच्या रणनितीचा भाग. राहुल सोलापूरकरवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य भाजपच्या रणनितीचा भाग” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
-
जवान संतोष रामू राठोड यांना देशसेवा बजावताना वीरमरण
देश सेवेमध्ये कार्यरत असणारे जत तालुक्यातील लमानतांडा दरीबडचीचे सुपुत्र वीर जवान संतोष रामू राठोड यांना देशसेवा बजावताना कोलकत्ता या ठिकाणी वीरमरण आले. ते देशसेवेमध्ये 16 वर्षे कार्यरत होते. त्यांचे वय 38 वर्ष होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगी. आई, वडील भाऊ व दोन बहीणी असा परिवार आहे. अंत्यविधी जत तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी लमानतांडा दरीबडची येथे 11 वाजता होणार आहेत.
-
छावणी चालकांची बिले अदा करा आमदार बाबासाहेब देशमुख यांची मागणी
अधिवेशन संपण्यापूर्वी छावणी चालकांची बिले अदा करा आमदार बाबासाहेब देशमुख यांची अधिवेशनात मागणी. सांगोला तालुक्यातील 149 आणि मंगळवेढा तालुक्यातील 61 चारा छावण्याची पाच वर्षा पूर्वी पासूनची बिलं थकली आहेत. सन 2019-20 मध्ये दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगवण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या चारा छावण्या. मात्र त्या छावण्यांची अंतिम बिले अद्याप अदा केलेली नसून ती बिले हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर अदा करावीत अशी मागणी सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली.
-
Maharashtra News: मावळमधील पवना कॅम्पिंग साईट येथे उंबराच्या झाडावर बिबट्या
मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या बाजूला असलेल्या आंबेगाव कॅम्पिंग साईट येथे सकाळी एक बिबट्या उंबराच्या झाडावर बसलेला आढळून आला. त्यापूर्वी त्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक ग्रामस्थ जखमी झाला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून,पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाळू शिंदे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
-
Maharashtra News: जालना जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई सुरूच
जालना जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई सुरूच;अंबड तालुक्यातील प्रल्हाद उर्फ पिंटू मरकड 9 महिन्यांसाठी तडीपार… मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह यापूर्वी 9 जणांना तडीपार केले होते; मरकडही अनेक वाळू चोरी प्रकरणांत मागील आरोपी सोबत सामील होता… गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू चोरीप्रकरणी मरकडवर गोंदी पोलीस ठाण्यात 2021 आणि 2023 मध्ये दोन गंभीर गुन्हे दाखल आहे… आरोपी प्रल्हाद मरकड छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातून तडीपार… महिनाभरापूर्वीच अंबड तालुक्यातील कारवाई करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आलीय.
-
Maharashtra News: म्हाडाने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या शाळेतील क्रीडा जाळी पाडली
म्हाडाने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या शाळेतील क्रीडा जाळी पाडली… बोरिवली पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद शाळेने बांधलेले क्रीडा जाळे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पाडले आहे… रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी क्रीडा जाळे तोडल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे…. दिनेश लाड म्हणाले की त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना क्रीडा जाळे तोडू नका अशी विनंती केली होती.
-
लेट कमर्स शाळेच्या मुख्याध्यापिकेला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी झापलं
लेट कमर्स शाळेच्या मुख्याध्यापिकेला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी झापलं. उशीरा शाळेत का येता ? म्हणत खडसावले. माढ्याच्या महातपुर गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या महेश मोहळे,युवराज वसगडेकर यांची शिक्षण विभागाकडे तक्रार.
नेहमीच तुम्ही उशीरा शाळेत का येता ? असं म्हणत खडसावले, या घटनेचा व्हिडिओ (चित्रीकरण) देखील शिवसैनिकांनी समोर आणला.
मुख्याध्यापिका सुषमा रणदिवे यांना शाळेत सातत्याने उशीरा येत असल्याच्या मुद्यावरुन धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती करुन शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी केलीय.
-
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदा नवीन करवाढ, दरवाढ होईल की नाही? याकडे ठाणेकरांचे लक्ष लागलं आहे.
ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य आणि शिक्षणावर जास्त भर. अर्थसंकल्पात 600 ते 700 कोटी वाढ अपेक्षित आहे. गेल्यावर्षी सादर झालेला अर्थसंकल्प 5025 कोटीचा होता. 2023 – 24 मध्ये सादर झालेला अर्थसंकल्प 4370 कोटीचा होता.
-
पुणे – चाकण जवळील वाकी येथे प्लास्टिक मोल्डिंग कंपनीला आग
चाकण जवळील वाकी येथे प्लास्टिक मोल्डिंग कंपनीला आग लागली असून रात्रीपासून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. चाकण राजगुरुनगर नगरपरिषद, खेड सिटी, आग्निशामक दलाचे चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
-
डोंबिवली एमआयडीसी कंपनीत महिलेला मारहाण प्रकरण, कंपनीच्या मॅनेजर आणि मुकादमाला अटक
डोंबिवली एमआयडीसी कंपनीत महिलेला मारहाण करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजर आणि मुकादमाला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
रणजित आगवले सह त्याचा साथीदार विजय बेंडलया दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली.
-
स्वारगेट बलात्कार प्रकरण – आरोपी गाडेची 3 तास कसून चौकशी
पुण्यातील स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी चौकशी केली. मात्र, गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे.
गाडेचा मुक्कम सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांकडून नुकताच गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.
-
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहे. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर बोलण्यापूर्वी सभागृहात या राजीनाम्याची माहिती द्यायला हवी होती, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. 48 तासांनंतरही सभागृहात विरोधकांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली नसल्याने महाविकास आघाडी आज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Published On - Mar 07,2025 8:02 AM





