Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 21 March 2025 : अकोल्यात सिलेंडरचा स्फोट, तीन घरांचे मोठे नुकसान

| Updated on: Mar 22, 2025 | 8:58 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 21 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 21 March 2025 : अकोल्यात सिलेंडरचा स्फोट, तीन घरांचे मोठे नुकसान
Maharashtra Live News Updates

नाशिकमध्ये दोन दिवस पाणीबाणी. उद्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तांत्रिक कामासाठी उद्या पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगत दोन दिवस पाणी जूपन वापरण्याचे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरात दाखल झालीय. यासोबतच मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याही ठिकाणी एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करत आहे. कल्याण पश्चिमच्या राधा नगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या त्रासावरून प्राणीमित्र आणि रहिवासी भिडले. रस्त्यावर खाणं टाकण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव, शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. राज्यात उष्माघाताच्या 9 रुग्णांची नोंद झाली आहे. गडचिरोली, पालघर, लातूर, नांदेड यासह नाशिका आणि धाराशिव तसेच ठाण्यातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. उष्णता जास्त वाढल्याव आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Mar 2025 09:26 PM (IST)

    चित्रा वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन

    भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचं अंधेरीमध्ये आंदोलन

    चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून निषेध

    चित्रा वाघ यांनी माफी मागावी, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी

  • 21 Mar 2025 07:40 PM (IST)

    पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्याचा बळी, पुणे हादरलं

    पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील चंदननगर परीसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पती-पत्नीच्या भांडणामध्ये चिमुकल्याचा बळी गेला आहे. वडिलांनीच आपल्या साडेतीन वर्ष्याच्या मुलाची हत्या केली आहे. त्यानंतर मुलगा हरवल्याचा बनाव करण्यात आला. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतलं आहे.

  • 21 Mar 2025 07:19 PM (IST)

    आईच्या डोळ्यादेखत मुलीचं अपहरण; नाशिकमध्ये धक्कादायक घटना

    आईच्या डोळ्यादेखत मुलीचं अपहरण; नाशिकमध्ये धक्कादायक घटना

    सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन हद्दीतील पांगरी येथे घडली घटना

    आईच्या डोळ्यादेखत केलं मुलींच अपहरण

    आई आणि मुलगी सोबत असताना आईला मारहाण करत मुलीचं अपहरण

    19 वर्षाच्या मुलीच्या अपहरणाने सिन्नरमध्ये खळबळ

    अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

    सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 21 Mar 2025 05:57 PM (IST)

    नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या तपासाला एनआयएची सुरुवात

    नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या तपासात एनआयएने प्रवेश केला आहे. एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरला भेट दिली. औरंगजेबाच्या कबरीची आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली.

  • 21 Mar 2025 05:31 PM (IST)

    उत्तर प्रदेशात दंगली नाहीत, पण उत्सव साजरे होतात – मुख्यमंत्री योगी

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, हा ‘नवीन भारताचा’ ‘नवीन उत्तर प्रदेश’ आहे, येथे समाजातील प्रत्येक घटकाला कोणताही भेदभाव न करता आर्थिक स्वावलंबीता सुनिश्चित करण्यासाठी धोरणे बनवली जात आहेत. हे तेच उत्तर प्रदेश आहे जिथे दंगली व्हायच्या, आज त्या राज्यात दंगलींऐवजी उत्सव साजरे केले जात आहेत. गेल्या ८ वर्षात उत्तर प्रदेशच्या विकासात अडथळा आणणारे सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत.

  • 21 Mar 2025 05:26 PM (IST)

    राहुल गांधींच्या सल्ल्याने कर्नाटकात ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले: संबित पात्रा

    भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधींच्या सल्ल्याने आणि मदतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ओबीसींसाठी आरक्षण रद्द केले आहे.

  • 21 Mar 2025 05:15 PM (IST)

    बिहार: मुजफ्फरपूरमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

    राष्ट्रगीताचा अपमान केल्याच्या आरोपाखाली बिहारच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध मुझफ्फरपूर एसीजेएम न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. वकील सूरज कुमार यांनी मुझफ्फरपूर एसीजेएम वेस्टर्न कोर्टात खटला दाखल केला आहे.

  • 21 Mar 2025 04:56 PM (IST)

    स्वारगेट अत्याचार प्रकरणात बसची पडताळणी

    स्वारगेट एस. टी बस स्थानक बलात्कार प्रकरणाचील शिवशाही बसची शास्त्रोक्त पडताळणी करण्यात आली. स्वारगेट एसटी बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधून आवाज बाहेर येतो की नाही त्याची पोलिसांनी पडताळणी केली.

  • 21 Mar 2025 04:31 PM (IST)

    ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास निर्बंध

    पुणे जिल्ह्यात कोणतीही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणारे व्यावसायिकांना ड्रोन कॅमेऱ्याचा वापरासाठी निर्बंध आणले आहे. ड्रोनचा वापर करण्यापूर्वी त्याची पूर्वमाहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

  • 21 Mar 2025 04:11 PM (IST)

    पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड

    पुण्यातील धायरी परिसरात 3 ते 4 जणांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. हातात हत्यार घेत आरोपींनी गाड्या फोडल्या. दुपारी झालेल्या भांडणाचा राग काढत आरोपींनी सामान्य नागरिकांच्या गाड्या फोडल्या.  या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • 21 Mar 2025 03:46 PM (IST)

    अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेतचा मृतदेह अखेर सापडला

    वाशिमच्या बाभुळगाव येथून अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेत सादुडे याचा सापडला मृतदेह अखेर वाशिम – पुसद मार्गावर सापडला आहे. त्याचे १२ मार्चला अपहरण झाले होते

  • 21 Mar 2025 03:21 PM (IST)

    लोकांना ब्लॅकमेल करण हे चित्रा वाघचा व्यवसाय आहे – महबूब शेख

    लोकांना ब्लॅकमेल करण हे चित्रा वाघचा व्यवसाय आहे असा आरोप महबूब शेख यांनी केला आहे.आपल्याला बलात्काराच्या आरोपात फसविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा तो प्रयत्न असफल ठरला असेही महबूब शेख यांनी म्हटले आहे.

  • 21 Mar 2025 02:34 PM (IST)

    प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

    महापुरुषांचा अवमान केल्या प्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून कोरटकरला तूर्तास दिलासा नाही. सुनावणीपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण नाही. अटकपूर्व जामीन अर्जावरही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. सरकारी वकिलांना याचिकेची प्रत न मिळाल्यामुळे सुनावणी तहकूब.

  • 21 Mar 2025 02:16 PM (IST)

    मुंबईतील रस्त्यांवरील खड्यांमुळे विधानसभेत गदारोळ

    मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय सध्या चर्चेत आहे. या विषयावरून विधानसभेत गदारोळ निर्माण झाला आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी, ‘नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी’ अशी मागणी केली आहे.

  • 21 Mar 2025 01:57 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी गुलाबराव पाटलांचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

    गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर त्यांचं मत मांडलं आहे. शेतीची नापिकी, शेतकऱ्यांमध्ये असलेली निराशा असे अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारण असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच ते पुढे म्हणाले, “आत्महत्या होणे हेच चुकीचे आहे. शेतीला पूरक व्यवसाय ही गरज झाली असून त्यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. दुय्यम शेती बचत गटांना प्रोत्साहन देणे, यासारख्या योजना शासनाकडून राबवल्या जात आहेत. कुटुंबामध्ये एका माणसावर अवलंबून असल्यास परिस्थिती किती वाईट होते हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे. जळगाव जिल्हा नव्हे तर राज्यात व देशात शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी सुटणार नाही” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे.

  • 21 Mar 2025 01:32 PM (IST)

    “तपासात जे व्हायचं असेल ते होईल, सध्या…”; दिशा सालियन हत्या प्रकरणावर गुलाबराव पाटलांचे व्यक्तव्य

    गुलाबराव पाटील दिशा सालियन हत्या प्रकरणावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, “दिशा सालियन प्रकरण हे पाच वर्षापासून सुरू आहे त्यामुळे तपासात जे व्हायचं असेल ते होईल. जे काही सत्य आहे ते समोर येणारच आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर सध्या बोलणं तरी उचित नाही.” असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले आहे.

  • 21 Mar 2025 01:15 PM (IST)

    औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल; कसून तपास सुरु

    औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत.  NIA च्या पथकाकडून औरंगजेबाच्या कबर परिसराची आणि आजुबाजूच्या भागाची पहाणी करण्यात आली आहे. NIA पोलिसांकडून प्राथमिक माहिती गोळा करून पुढील तपास करण्यात येत आहे.  बांगलादेश कनेक्शन समोर आल्यानंतर NIA च्या पथकाकडून तपास करण्यात येत आहे. NIA च्या पथकाकडू हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच परदेशी हिंसाचार कनेक्शन आढळून आल्यास लवकरच गुन्हा नोंदवून तपास सुरु करू अशी भूमिका आता NIA पथकानं घेतली आहे.

  • 21 Mar 2025 01:00 PM (IST)

    टेम्पो ट्रॅव्हल्सच्या चालकाचा पगार थकवला नाही, मालकाचा खुलासा

    पुण्याच्या हिंजवडीतील व्युमा ग्राफिक्स कंपनीने पगार थकवला, म्हणून टेम्पो ट्रॅव्हल पेटवली अशी कबुली चालक जनार्दन हंबर्डीकरने दिली. मात्र आम्ही त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही, असा खुलासा मालक नितेन शाहने केलाय. परंतु कंपनीतून एक लीटर की पाच लिटर चोरीला गेलं, याबाबत मला कल्पना नाही. असं म्हणत मालकाने काढता पाय घेतला. पोलीस कंपनीत येऊन तपास करतायेत, आम्ही त्यांना सहकार्य करतोय. असं शाह म्हणाले.

  • 21 Mar 2025 12:36 PM (IST)

    नाशिकच्या बांबूच्या गोडाऊनला भीषण आग, मोठ्या प्रमाणात वित्तहानी

    नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर आजूबाजूची काही दुकानं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. ही आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 21 Mar 2025 10:59 AM (IST)

    अखेर तो बिबट्या जेरबंद

    धाराशिवच्या परंडा तालुक्यात गेल्या तीन चार महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेला बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले असून परंडा तालुक्यातील कपिलापूरी शिवारात रात्री 11 वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या बिबट्याने चार महिन्यात या परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली होती.

  • 21 Mar 2025 10:50 AM (IST)

    दिग्गजांचा अजित पवार गटात प्रवेश

    सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार गट आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप,कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश होईल,अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • 21 Mar 2025 10:45 AM (IST)

    सातपुड्याचा जंगलाला भीषण वनवा

    सातपुड्यातील लागलेली आग ५ दिवसांपासून कायम आहे. धडगाव वनक्षेत्रातील १२ हेक्टर पेक्षा क्षेत्रामध्ये डोंगरांवर भीषण आग लागली आहे.

  • 21 Mar 2025 10:29 AM (IST)

    तो विषय या क्षणी निरर्थक

    औरंगजेबाच्या कबरीचा विषय या क्षणी निरर्थक असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.

  • 21 Mar 2025 10:22 AM (IST)

    १ हजार ४०६ झाडे काढणार

    उत्तनच्या डोंगरी येथे मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यात १ हजार ४०६ झाडे काढण्यावर मिरा भाईंदर मनपाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात तब्बल ९ हजार ९०० झाडे बाधित होत असल्याने ती झाडे तोडण्याबाबत एमएमआरडीएने मिरा-भाईंदर महापालिकेला पत्र दिले आहे.

  • 21 Mar 2025 10:10 AM (IST)

    सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली

    सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याला गृहमंत्री जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी घातला.

  • 21 Mar 2025 10:01 AM (IST)

    हे तर पोलीस स्टेट

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे पोलीस स्टेट झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

  • 21 Mar 2025 09:55 AM (IST)

    Maharashtra News: काँग्रेसमधील फूट रोखण्यामध्ये प्रदेशाध्यक्षांकडून मोठ्या हालचाली

    युवक काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांना सुरुवात… राज्यभरातील जवळपास 90 पदांवरती नव्या युवकांना देण्यात आली संधी… पुण्यातील युवक काँग्रेसमध्ये मोठे बदल… पुन्हा एकदा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी राहुल शिरसाठ यांची निवड… तर धनदांडगे असणारे सौरभ आमराळे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी… पुण्यातील युवक काँग्रेसमध्ये मोठे बदल…

  • 21 Mar 2025 09:45 AM (IST)

    Maharashtra News: औरंगजेबाच्या कबरीचा विषय या क्षणी निरर्थक – संजय राऊत

    औरंगजेबाच्या कबरीचा विषय या क्षणी निरर्थक… बाबरी पाडताना कुणाची परवानगी घेतली नव्हती… औरंगजेबाच्या कबरीच्या विषयाबाबत भाजपनं भूमिका स्पष्ट… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 21 Mar 2025 09:34 AM (IST)

    Maharashtra News: ‘परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीतच…’

    परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं न्यायदंडधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलं आहे… परभणीमधील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार… सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणीतील नवामोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली… असं अहवालात म्हटलं आहे…

  • 21 Mar 2025 09:25 AM (IST)

    Maharashtra News: एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय बनावटीचं तेजस विमान बाहेर पडणार

    नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL ) मध्ये तेजस विमानाची सुरू आहे निर्मिती… दरवर्षी ८ विमान बनविण्याचं भारताचं आहे नियोजन… तेजससाठी लागणारे इंजिनही अमिरेकेने देण्याचं केलंय मान्य… वायुसेनेला तेजस विमानाच्या मदतीनं मिळणार मोठी ताकद

  • 21 Mar 2025 09:15 AM (IST)

    Maharashtra News: नाशिक महानगर पालिका कर थबाकीदारांच्या विरोधात आक्रमक

    थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या बजावल्या नोटीसा… ४२६ जणांना बजावल्या मनपाने होत्या जप्तीच्या नोटीसा… नोटिसा बजावल्यानंतर ८७ थकबाकीदारांनी धसका घेत केला भरणा… थकबाकी भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, मनपाचा थकबाकीदारांना इशारा…

  • 21 Mar 2025 09:03 AM (IST)

    Maharashtra News: सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी

    चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार… भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं, यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय… चैत्रोत्सवाच्या कालावधीत सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंद… नांदुरीपासून गडावर जाण्यासाठी २५० बसेसची व्यवस्था

  • 21 Mar 2025 08:57 AM (IST)

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर,  27 एप्रिल रोजी मतदान तर 28 एप्रिलला होणार मतमोजणी. गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

  • 21 Mar 2025 08:34 AM (IST)

    ठाणे – थकबाकीदारांचे पाणी तोडले ,127 कोटींची पाणीपट्टी महापालिकेने केली वसुली

    थकबाकीदारांचे पाणी तोडले ,127 कोटींची पाणीपट्टी महापालिकेने केली वसुली, पाणीपुरवठा विभागाकडून मोहीम आक्रमक

    पाणीपुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलाच्या 225 कोटी रुपयांपैकी 127 कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्या वर्षीच्या याच काळातील वसूल पेक्षा 12 कोटी रुपयांनी अधिक आहे.

  • 21 Mar 2025 08:27 AM (IST)

    कल्याण – 60 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या; दागिने लंपास

    कल्याण आंबिवली अटाळी परिसरात ६० वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करून दागिने लंपास करण्यात आले.  राहत्या घरात शिरून चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या कानातील आणि गळ्यातील दागिने लुटले, हत्या केल्याचा संशय.  रजनी चंद्रकांत पाटकर (60) असे मृत महिलेचे नाव; पती आणि मुलगी घरी परतल्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह.

  • 21 Mar 2025 08:16 AM (IST)

    सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच

    परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे.

  • 21 Mar 2025 08:06 AM (IST)

    कल्याणच्या मोहोने येथे गॅस सिलेंडर गळतीमुळे आग; दोघांचा मृत्यू

    कल्याणच्या मोहोने येथे गॅस सिलेंडर गळतीमुळे आग; तिघे भाजले, दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.  कल्याणच्या मोहोने येथे २५ फेब्रुवारी रोजी गॅस रेग्युलेटर दुरुस्त करताना आग लागली होती.  यामध्ये तिघे जखमी झाले होते व त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

    उपचारादरम्यान 12 वर्षीय मुलीसह 56 वर्षीय व्यक्तीने गमावला जीव, पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; खडकपाडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे

  • 21 Mar 2025 08:01 AM (IST)

    राज्यात उष्माघाताच्या 9 रुग्णांची नोंद

    राज्यात उष्माघाताच्या 9 रुग्णांची नोंद झाली आहे. गडचिरोली, पालघर, लातूर, नांदेड यासह नाशिका आणि धाराशिव तसेच ठाण्यातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

  • 21 Mar 2025 08:00 AM (IST)

    नाशिकमध्ये दोन दिवस पाणीबाणी

    नाशिकमध्ये दोन दिवस पाणीबाणी. उद्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तांत्रिक कामासाठी उद्या पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगत दोन दिवस पाणी जूपन वापरण्याचे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे

Published On - Mar 21,2025 7:59 AM

Follow us
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.