Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 20 March 2025 : सातपुड्यांचा जंगलाला भीषण वनवा, आग 4 दिवसांपासून कायम

| Updated on: Mar 20, 2025 | 9:02 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 20 March 2025 : सातपुड्यांचा जंगलाला भीषण वनवा, आग 4 दिवसांपासून कायम

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Mar 2025 09:02 PM (IST)

    डॉक्टरने केला सहकारी महिलेचा लैंगिक छळ, वसईतील धक्कादायक घटना

    डॉक्टरने केला सहकारी महिलेचा लैंगिक छळ, वसईतील धक्कादायक घटना

    पीडित महिलेच्या तक्रारीवरून वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    अंजुम शेख (वय 54 ) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव असून, वसई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    पीडित महिले सोबत फेब्रुवारी 2023 ते 2025 दरम्यान अश्लील शेरेबाजी व सीसीटीव्ही बंद करून जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचा आरोप

  • 20 Mar 2025 07:18 PM (IST)

    नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत, हॉटेलमध्ये घुसून मालकाला मारहाण

    नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत

    हॉटेल चालवणाऱ्या दोघा भावांना हॉटेल मध्ये घूसून मारहाण

    नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना

    हॉटेल अजु दा ढाबा वर जाऊन गुंडांनी केली दोघा भावांना बेदम मारहाण

    हॉटेल कसे चालवतो ते बघतो अशी धमकी देत केली मारहाण

    6 ते 7 जणांनी मिळून केली मारहाण

    मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी

    घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

  • 20 Mar 2025 06:41 PM (IST)

    अंधेरी एमआयडीसीमधील न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीला भीषण आग

    अंधेरी एमआयडीसीमधील न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीला भीषण आग

    आगीमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी

    इमारतीची भिंत अग्निशमन दलाच्या जवानांवर कोसळल्यामुळे जवान जखमी

    तब्बल तीन तासानंतर आगीवर नियंत्रण

    सध्या फायर कूलिंगचे काम सुरू

  • 20 Mar 2025 05:58 PM (IST)

    सातपुड्यांचा जंगलाला भीषण वनवा, आग 4 दिवसांपासून कायम

    सातपुड्यांचा जंगलात लागलेली आग 4 दिवसांपासून कायम आहे. धडगाव वनक्षेत्रातील 4 ते 5 हेक्टर क्षेत्रामध्ये डोंगरांवर भीषण आग लागली आहे. बलक क्षेत्रातील साधारण 10 किलोमीटर अंतर पर्यंत ही आग भडकल्याचा अंदाज आहे. आगीमुळे सातपुड्यातील डोंगर जळून खाक झाले आहेत. चार दिवस उलटले तरी आगीचे लोट डोंगरांवर कायम आहेत. वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

  • 20 Mar 2025 05:23 PM (IST)

    औरंगजेबाचा फोटो ठेवून ‘बाप तो बाप रहेगा’ असे स्टेटस ठेवणाऱ्याला अटक

    औरंगजेबाचा फोटो ठेवून ‘बाप तो बाप रहेगा’ असे स्टेटस ठेवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेविरधात धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे हिंदु संघटनाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीला तात्काळ अटक करण्याची हिंदु संघटनांकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आंदोलनस्थळी जात उमरगा पोलिसांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला ताब्यात घेतले.

  • 20 Mar 2025 05:09 PM (IST)

    दिशा सालियानच्या विषयात तथ्य नाही, दूर दूर संबंध नाही : उद्धव ठाकरे

    दिशा सालियानच्या विषयात तथ्य नाही, दूर दूर संबंध नाही. खोट्याच्या नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाबाबत दिली.

  • 20 Mar 2025 03:53 PM (IST)

    नागपूर हिंसाचारावर काँग्रेसने 7 सदस्यीय समिती स्थापन केली

    नागपूर हिंसाचाराबाबत काँग्रेसने 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

  • 20 Mar 2025 03:42 PM (IST)

    छत्तीसगड: बिजापूर-दंतेवाडा येथे चकमक, 18 नक्षलवादी ठार

    बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील गंगलूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 18 नक्षलवाद्यांना ठार केले.

  • 20 Mar 2025 03:33 PM (IST)

    कोणत्याही आक्रमकाचा गौरव केला जाऊ नये – मुख्यमंत्री योगी

    उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कोणत्याही आक्रमकाचे गौरव होता कामा नये. आक्रमकाचे गौरव करणे म्हणजे देशद्रोहाचा पाया मजबूत करणे आणि स्वतंत्र भारत अशा कोणत्याही देशद्रोही व्यक्तीला स्वीकारू शकत नाही जो भारतातील महापुरुषांचा अपमान करतो आणि त्या आक्रमकांचे गौरव करतो. आजचा नवीन भारत हे स्वीकारण्यास तयार नाही. आम्ही वारसा पुढे नेण्यासाठी पूर्ण अभिमानाने काम करत आहोत, आमचा अभिमान वारशाशी जोडलेला आहे, वारसा विकासाशी जोडलेला आहे.

  • 20 Mar 2025 03:08 PM (IST)

    मुस्लिमांना वक्फ दुरुस्ती विधेयक मान्य नाही, सरकारने ते मागे घ्यावे: मदनी

    मौलाना अशरद मदनी यांनी म्हटले आहे की, वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध देशभर आंदोलन केले जाईल. हे विधेयक मुस्लिमांना मान्य नाही. हे विधेयक मागे घेतले पाहिजे. सरकारला वक्फ मालमत्ता ताब्यात घ्यायच्या आहेत.

  • 20 Mar 2025 02:55 PM (IST)

    शिवसेना प्रमुखांच्या नातूवर आरोप गंभीर बाब- कदम

    आदित्य ठाकरे यांच्या दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचे नारायण राणे सुरवातीपासूनच बोलत होते. पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत. शिवसेना प्रमुखांच्या नातूवर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.

  • 20 Mar 2025 02:47 PM (IST)

    अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

    भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे घरी कोणीही नसल्याची संधी साधत एका तरुणाने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी साकोली पोलिसात विविध कलमान्वये पॉप्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय. आरोपी हा गोंदिया जिल्ह्यातील आहे.

  • 20 Mar 2025 02:22 PM (IST)

    मालमत्ताधारकांकडे तब्बल 100 कोटी रुपयांची थकबाकी

    धुळे महापालिकेचे मालमत्ताधारकांकडे तब्बल 100 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे महापालिकेच्या वतीने आतापर्यंत वीस कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून अद्यापही काही कोटी रुपये वसूल करण्याचे बाकी आहे मात्र महापालिकेने आता शास्ती माफी दिली असून शास्ती माफ झाल्याने महापालिकेत मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

  • 20 Mar 2025 02:02 PM (IST)

    हवेत गोळीबार करणाऱ्यांना कोठडी

    वाडेबोल्हाई येथे झालेल्या भांडणाच्या दरम्यान हवेत गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या पाच जणांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५.९७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

  • 20 Mar 2025 01:52 PM (IST)

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर! शिल्पकार राम सुतार यांचा होणार गौरव

    विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार आहे. ते १०० वर्षांचे आहेत. ते आजही शिल्प तयार करतात.

  • 20 Mar 2025 01:25 PM (IST)

    ‘आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे’, चित्रा वाघ यांची मागणी

    पाच वर्षापूर्वीच्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आज, विधान परिषदेत दिशा सालियन मुद्यावर चर्चा सुरु आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांनी ‘आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे’ अशी मागणी केली आहे.

  • 20 Mar 2025 01:05 PM (IST)

    ‘पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे’, दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

    दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी नवीन ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केला आहे. त्यावर आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देते, ‘पाच वर्ष हे चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. मी एकच सांगेल. पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात बोलू’ असे म्हटले आहे.

  • 20 Mar 2025 12:58 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना समज द्यावी,चर्चेवेळी मंत्रीच उपस्थित नसतात; आदित्य ठाकरेंची तक्रार

    राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी  त्यांनी सुरुवातीला राज्यपालांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसे पुढे त्यांनी सरकारवर टीका केली तसेच वारंवार सत्ताधाऱ्यांकडून हाऊस बंद पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलं आहे. आदित्या ठाकरे म्हणाले की, ” या अधिवेशनात आम्ही सरकारचा पर्दाफाश केलाय. सत्ताधाऱ्यांकडे अजेंडा राहिलेला नाही. विधान परिषद सुरु असताना मंत्र्यांनी हजर राहावं आणि त्यांनी अभ्यासपूर्वक उत्तर द्यावी.  मात्र चर्चेवेळी मंत्रीच उपस्थित नसतात. आमच्या ज्या काही मागण्या असतील, जे काही मुद्दे असतील त्यावर मंत्र्यांकडून गांभिर्याने विचार झाला पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडे बोलायला मुद्दे नाहीत म्हणून ते वारंवार हाऊस बंद पाडतायत” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मंत्र्यांच्या उपस्थितीवर प्रश्न निर्माण केले आहेत.  तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना समज द्यावी अशी विनंतीही केली आहे.

  • 20 Mar 2025 12:43 PM (IST)

    “दिशा सालियानची प्रथमदर्शनी हत्या”, संजय शिरसाट यांचं खळबळजनक वक्तव्य

    दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी संजय शिरसाट यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “दिशा सालियानची प्रथमदर्शनी हत्या झाली आहे.  या प्रकरणात अनेकजण आहेत हे आता सिद्ध झालं आहे. दरम्यान पोलीस तपासात जो कुणी आरोपी आढळेल त्याला शिक्षा ही होणारच आहे” असं विधान शिरसाटांनी केलं आहे.

  • 20 Mar 2025 11:55 AM (IST)

    दिशा सालियान प्रकरणात सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्डिंग तपासा- नरेश म्हस्के

    “दिशाच्या वडिलांनी उद्धव ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले आहेत. दिशा सालियान प्रकरणात सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्डिंग तपासा. सरकारने दिशा सालियानच्या केसची फेरतपासणी करावी,” अशी मागणी नरेश म्हस्केंनी केली.

  • 20 Mar 2025 11:52 AM (IST)

    शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला जातोय- अंबादास दानवे

    “दिशा सालियान प्रकरणात राजकारण शिजवलं जातंय. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला जातोय,” अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.

  • 20 Mar 2025 11:40 AM (IST)

    राजकीय ताकद वापरून दाबणं खूप चुकीचं- अंजली दमानिया

    “प्रत्येक प्रकरणात फक्त न्याय झाला पाहिजे. राजकीय ताकद वापरून दाबणं खूप चुकीचं आहे. त्या मुलीला न्याय मिळेल की नाही हे येणारा काळच सांगेल,” अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिशा सालियान प्रकरणी दिली आहे.

  • 20 Mar 2025 11:30 AM (IST)

    दिशा सालियान प्रकरणातील एसआयटीचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित

    दिशा सालियान प्रकरणातील एसआयटीचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. तपास अधिकाऱ्यांचीच बदली झाल्याने प्रकरणात पुढे काहीही झालं नाही. एसआयटीतल्या सर्व अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. एसआयटीकडून राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर होणार होता.

  • 20 Mar 2025 11:20 AM (IST)

    सतीश उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    सतीश उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यातत आली आहे. बॅटने मारहाण केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस उद्या न्यायालयाकडे अर्ज करून सतीश भोसलेच्या अटकेची मागणी करू शकतात.

  • 20 Mar 2025 11:10 AM (IST)

    श्रीएकनाथ षष्ठीनिमित्त पैठणमध्ये लाखो भाविक दाखल

    पैठण इथं आज श्रीएकनाथ षष्ठीनिमित्त लाखो भाविक एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनाला दाखल झाले आहेत. हा दिवस श्रीएकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून ओळखला जातो. राज्यासह देशभरातून पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित आहेत. पैठण इथली नाथषष्ठीची वारी ही वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असते.

  • 20 Mar 2025 10:58 AM (IST)

    या गावात भरते चिमण्यांची शाळा

    शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील शिक्षकाने चिमणी संवर्धनाचा ध्यास घेतला आहे.गेल्या दहा वर्षापासून श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो.श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिरमध्ये गेले अनेक वर्षापासून चिमणी संवर्धनाचा उपक्रम राबवला जात असल्याने येथे विद्यार्थ्यांच्या बरोबर चिमण्यांची शाळा भरल्याने चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो.

  • 20 Mar 2025 10:50 AM (IST)

    खेडकर कुटुंबियांचे नॉन क्रिमिलिअर रद्द होणार ?

    वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खेडकर कुटुंबियांचे नॉन क्रिमिलिअर रद्द होऊ शकते. खेडकर कुटुंबाच्या नावावर तब्बल १२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. १२ कोटींची मालमत्ता असल्यानं नॉन क्रिमिलिअर रद्द का करू नये ? अशी नोटीस विभागीय आयुक्तांनी बजावली आहे.

  • 20 Mar 2025 10:40 AM (IST)

    जिल्ह्याधिकाऱ्यांसह महसूल अधिकार्‍यांची रंगपंचमी

    धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार उपजिल्हाधिकारी शोभा जाधव आणि तहसीलदार डॉक्टर मृनाल जाधव यांनी बंजारा समाज बांधवा बरोबर रंगपंचमी साजरी केलीय. धाराशिवच्या जागीरदार वाडी तांडा येथे बंजारा समाज बंधवा सोबत तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी चांगलाच ठेका धरत मनसोक्त डान्स केला.

  • 20 Mar 2025 10:25 AM (IST)

    दिशा सालियनच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण

    दिशा सालियन कुटुंब राहत असलेल्या दादरमधील इमारतीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिशा सालियनचे आई वडील दुसर्‍या मजल्यावर राहतात, प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारू नये म्हणून त्यांनी पोलीस बोलवले अशी माहिती देण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्यांना पोलीस संरक्षण दिल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. सध्या सालियन कुटुंब राहत असलेल्या इमारती बाहेर शांतता आहे.

  • 20 Mar 2025 10:15 AM (IST)

    आदित्य ठाकरे यांनी चौकशीसाठी हजर राहावे – मंत्री नितेश राणे

    आरोप खोटे असतील तर आदित्य ठाकरेंनी चौकशीला सामोरे जावे अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

  • 20 Mar 2025 10:05 AM (IST)

    अंबाजोगाई येथील मारहाण प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल

    अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीर वाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघेजण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांकडून दखल घेतली आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • 20 Mar 2025 10:01 AM (IST)

    दिशा सालियन प्रकरण – केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करावी – नितेश राणे

    दिशा सालियन प्रकरण – केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

  • 20 Mar 2025 10:00 AM (IST)

    राज्यात जिवंत साताबारा मोहीम

    ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर आता महसूल खात्याने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणार आहे. राज्यातील सातबारा अद्ययावत होणार आहे.

  • 20 Mar 2025 09:56 AM (IST)

    नाशिक – दोन भावांच्या खुनाप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    नाशिक – दोन भावांच्या खुनाप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  हल्लेखोरांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.  दोघा भावांच्या खुनाच्या घटनेने उडाली खळबळ होती.

  • 20 Mar 2025 09:35 AM (IST)

    औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी दिशा सालियन प्रकरण पुन्हा शिजतंय – संजय राऊतांचा आरोप

    औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण काहींनी उकरून काढलं, पण ते सरकारवर उलटलं. औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी दिशा सालियन प्रकरण पुन्हा शिजतंय असा आरोप संजय राऊत यांनी केला

  • 20 Mar 2025 09:32 AM (IST)

    दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढलं – संजय राऊत

    दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढलं. दिशाच्या कुटुंबावर आता दबाव असल्याचं वाटतंय – संजय राऊत.

  • 20 Mar 2025 09:26 AM (IST)

    औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी ठोकले लोखंडी पत्रे, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

    औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी लोखंडी पत्रे ठोकले. कबरीपर्यंत कोणीही पोहचू नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरातत्व विभागाकडून खबरजारी घेण्यात आली आहे.  औरंगजेब कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 20 Mar 2025 09:06 AM (IST)

    अमळनेर येथील एका बालिकेवर अत्याचार करणाऱ्या वृद्धास 5 वर्षाचा सश्रम कारावास आणि दंड

    जळगावच्या अमळनेर येथील एका बालिकेवर अत्याचार करणाऱ्या वृद्धास 5 वर्षाचा सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. लोटन पंडित पाटील (61), असे शिक्षा झालेल्या आरोपी वृद्धाचे नाव आहे

    अत्याचाराची ही घटना 9 जानेवारी 2024 रोजी अमळनेर तालुक्यातील एका गावात घडली होती.

  • 20 Mar 2025 09:00 AM (IST)

    कोंढवा येथे पार्किंग वरून वाद

    कोंढवा येथे पार्किंग वरून वाद. एका तरुणाकडून बेदम मारहाण. कारमधून हत्यार काढत करण्यात आला हल्ला. तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. जखमी तरुणावर उपचार सुरू.

  • 20 Mar 2025 08:57 AM (IST)

    कृष्णा साळे मारहाण प्रकरण तिघांविरोधात गुन्हा दाखल

    अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीर वाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघेजण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, त्याची दखल पोलिसांनी घेतली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माऊली माने, कुणाल घाडगे, शुभम घाडगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 20 Mar 2025 08:44 AM (IST)

    सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग

    नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग. धडगाव तालुक्यातील एकूण 15 ते 20 किलोमीटर पर्यंत डोंगरांवर आग. गेल्या तीन दिवसांपासून डोंगरांवर आग भडकत असल्याची माहिती. पर्वताला लागलेल्या आगीत अनेक जंगली प्राणी होरपळून मेल्याची माहिती. डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक.

  • 20 Mar 2025 08:38 AM (IST)

    पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर टोल संदर्भात एक चांगला निर्णय

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 2030 पर्यंत टोलवाढ होणार नाही. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारित असलेल्या टोल नाक्यांवरील रकमेत यंदा टोलवाढ झाली आहे. मात्र, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हा ‘एमएसआरडीसी’च्या अखत्यारित आहे. तेथील टोलवाढीचे सूत्र 1 एप्रिल 2005 रोजीच निश्चित करण्यात आले आहे. या रस्त्यावर अखेरची टोलवाढ 1 एप्रिल 2023 मध्ये झाली आहे. आता 30 एप्रिल 2030 पर्यंत या रस्त्यावर कोणतीही टोलवाढ होणार नाही, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आजपासून सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण. सकाळी दहा वाजल्यापासून होणार उपोषणाला सुरुवात. सतीश उर्फ खोक्या भोसलेवर मकोका लावण्याची मागणी. सतीश उर्फ खोक्या भोसलेवर हरणाची शिकार केल्याचा आरोप, चौकशी करण्याची मागणी. बीड मधील वन्यजीवप्रेमी आजपासून करणार उपोषण. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे धाराशिव जिल्ह्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य व 12 सरपंच अपात्र. ग्रामपंचायत सदस्यांवर जिल्हाधिकारी यांनी केलेली आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरन पूजार यांच्याकडून ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार अपात्रतेची कारवाई. 9 जुलै 2024 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांवर कारवाईचे ग्रामविकास विभागाचे आदेश. जिल्ह्यातील आठ ही तालुक्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरले तर यामध्ये आरक्षित जागेवर निवडून आलेल्या 12 सरपंचाचाही समावेश.

Published On - Mar 20,2025 8:36 AM

Follow us
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.