Maharashtra Breaking News LIVE 10 February 2025 : नाना पटोले यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गटातील अनेक माजी आमदार, कार्यकर्ते हे सध्या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. आतापर्यंत अनेक जिल्ह्यातील नेत्यांनी मशाल सोडून हाती शिवधनुष्य घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळतील. लेटेस्ट अपडेटसाठी वाचत रहा हा ब्लॉग.
LIVE NEWS & UPDATES
-
एआय एक्शन समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी फ्रान्सला रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी एआय एक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषविण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्पाला भेट देण्यासाठी मार्सेलला देखील भेट देतील. फ्रान्सहून ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील.
-
संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी रशीद इंजिनिअरला दोन दिवसांचा कस्टडी पॅरोल
बारामुल्लाचे खासदार रशीद इंजिनिअर यांना संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने दोन दिवसांचा कोठडी पॅरोल मंजूर केला आहे. रशीद इंजिनिअरला 11 आणि 13 फेब्रुवारीसाठी कस्टडी पॅरोल मिळाला आहे. उच्च न्यायालयाने एक अट घातली आहे की त्याला कोठडीच्या पॅरोल दरम्यान माध्यमांशी बोलण्यास मनाई असेल. मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरणार नाही.
-
-
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची कोणतीही योजना नाही- गौरव गोगोई
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. यांच्यावर हल्लाबोल केला. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यावर ते म्हणाले, “विरोधी पक्ष वारंवार मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत, परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे आजही भाजपकडे मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची कोणतीही योजना नाही कारण त्यांच्याकडे अविश्वास प्रस्तावासाठी संख्याबळ नाही, म्हणून ते मुख्यमंत्री बदलू इच्छितात. आम्हाला मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य हवे आहे जेणेकरून तेथे विकास होऊ शकेल.”
-
धर्म-राजकारण वेगळे असावे- पंकजा मुंडे
राजकारणात काम करणाऱ्यांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणारे राजकारणात येऊ नये, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. भगवान गडावर पोहचल्यानंतर त्या बोलत होते.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात पिझ्झा
पिंपरी-चिंचवडमध्ये समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वस्तीगृहातील खोलीत पिझ्झचा बॉक्स आढळून आला. यामुळे वस्तीगृहातील चार विद्यार्थिनींना एक महिन्यासाठी वस्तीगृहातील प्रवेश रद्द करण्यात आला.
-
-
निलेश लंके यांनी घेतली भूपेंद्र यादव यांची भेट
केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी जायकवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या सौर उर्जा प्रकल्पास विरोध दर्शवला. हा प्रकल्प झाला तर दीड ते दोन लाख रोजगार जाईल, तसेच येथे पक्षी अभयारण्य आहे, त्यालाही धोका होईल, असे लंके यांनी म्हटले.
-
नाना पटोले नवी दिल्लीत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
-
नालासोपाऱ्यातील अनधिकृत 20 इमारती भुईसपाट; आता उरलेल्या 21 इमारतींवर कारवाई सुरु
नालासोपाऱ्यातील ‘त्या’ 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरूच राहणार आहे. नालासोपारा पूर्व विजय लक्ष्मी नगर येथील डम्पिंग आणि मलनिस्सारणसाठी 35 एकरचा भूखंड राखीव आहे. मुंबई हायकोर्टच्या आदेशानुसार 23 जानेवारी पासून वसई विरार महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. 20 इमारती पालिकेने आतापर्यंत भुईसपाट केल्या आहेत. आजपासून पुन्हा शिल्लक 21 इमारतींवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.
-
राहुल सोलापूरकरांच्या विरोधात सोलापुरात ठाकरे गट आक्रमक
राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात येत आहे.
-
बॅनरबाजी करत वसंत मोरेंनी मनसेला डिवचलं
वसंत मोरे यांनी कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करून मनसेलाच डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. वसंत मोरे यांची शिवसेनेच्या महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुख पदी निवड झाल्यानंतर त्यांनी मनसे कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावले आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बिनसल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर वंचित आणि मग शिवसेनेत गेलेल्या वसंत मोरे यांनी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
-
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत – विजय हिंगणे, भीम शक्ती संघटना
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीम शक्ती संघटनेचे विजय हिंगणे यांनी केली.
राहुल सोलापूरकर वर जर गुन्हा दाखल केला नाही तर उद्या आम्ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
-
कल्याण अल्पवयीन मुलीचे अपहरण अत्याचार आणि हत्या प्रकरण – साक्षी गवळी आरोपी विशाल गवळीविरोधात देणार साक्ष
कल्याण कोळसेवाडी मुलीचे अपहरण अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला कल्याण न्यायालयात हजर करणार असून ती आज विशाल गवळी विरोधात साक्ष देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अपहरण व अत्याचार आणि हत्याप्रकरणी विशाल गवळी याच्यासह साक्षी गवळी ही आरोपी असून दोघेही न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्या दिवशी नेमकं काय घडलं, विशालने कशाप्रकारे तिच्यावर दबाव आणला, या सर्व गोष्टीचा जबाब साक्षी गवळी देणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
-
राज ठाकरेंची भेट का घेतली , मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?
ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज घरी जाऊन भेट घेतली, गप्पा मारल्या , असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भेटीबद्दल सांगितलं.
-
नाशिक – सिटी लिंक बस खड्ड्यात आदळल्याने प्रवाशाचा मृत्यू
नाशिकमध्ये सिटी लिंक बस खड्ड्यात आदळून मार लागल्याने प्रवाशाचा मृत्यू. नाशिकरोड पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी लिंक बसने प्रवास करत असताना बस खड्ड्यात आदळल्याने संतोष माळी यांना पोटात झाली होती दुखापत. त्यांची पत्नी माया माळी यांच्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
-
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
चंद्रपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही भेट अगदी सहज झालेली भेट आहे, यामध्ये युती महायुतीची चर्चा यापेक्षा संवाद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून अनिश्चित आहे, त्यामुळे इतक्या लवकर कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चर्चा करेल असं वाटत नाही आणि अशा चर्चा उघडपणे होत नाही, त्यामुळे ही फक्त मैत्रीपूर्ण भेट आहे असं माझं मत आहे.”
-
सुरेश धस यांच्या वक्तव्यावर सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची संतप्त प्रतिक्रिया
परभणी- सुरेश धस यांच्या पोलिसांना माफ करून द्या या विधानावर सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “धस यांचं बोलणं पूर्णपणे चुकीचं आहे. यांना जनतेने यासाठीच मिळून दिलं का यांचे गुन्हे माफ करा, त्यांचे गुन्हे माफ करा. सुरेश धस यांनी चुकीचं बोलणं बंद केलं पाहिजे. आम्ही ही गोष्ट खपवून घेणार नाही. सुरेश धस यांचा स्वतःचा मुलगा राहिला असता तर त्यांनी पोलिसांना माफ केलं असतं का,” असा सवाल सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी केला.
-
नवी दिल्ली- शिवसेना पक्षाची आज दिल्लीत बैठक
नवी दिल्ली- शिवसेना पक्षाची आज दिल्लीत बैठक होणार आहे. शिवसेनेच्या सर्व राज्य प्रमुखांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी राज्य प्रमुखांची बैठक होणार आहे.
-
नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर तरुणीवर प्राणघातक हल्ला
नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. नात्यातीलच तरुणाने चाकूने तरुणीवर हल्ला केला. वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तरुणीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
-
नांदेड शहर गोळीबाराने हादरलं
नांदेड शहर गोळीबाराने हादरलं. गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड शहरातील शहीदपुरा भागातील ही घटना आहे. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तीन ते चार जणांनी गोळीबार केल्याची माहिती आहे.
-
Maharashtra News: सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करत नशेत बेभान झालेल्यांकडून भर रस्त्यावर उन्माद
मद्यधुंद तरुणाईची पोलिसांशी हुज्जत , नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीतील प्रकार… मद्यधुंद अवस्थेत गंगापूर रोड परिसरात गोंधळ घालणाऱ्या तरुणाईला विचारणा केली असता घातली पोलिसांशी हुज्जत… गंगापूर रोडच्या प्रसाद सर्कल परिसरात आरडा ओरड करत गोंधळ घालत असल्याची पोलिसांच्या गस्तीपथकाला मिळाली होती माहिती… मद्याच्या नशेत बेभान झालेल्या युवतीसह एका युवकाने मुजोरगिरी करत पोलिसांसोबत वाद घातल्याचा व्हिडिओ व्हायरल… धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत तरुणाईचा गोंधळ…
-
Maharashtra News: भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार?
भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसेची मदत घेणार… महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला काही जाहा सोजडण्याची शक्यता… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी…
-
Maharashtra News: ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी वाहनधारकांना करावा लागत आहे वाहतूक कोंडीचा सामना
ठाण्यातील आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी… 2 ते 3 किलोमिटर वाहांच्या लांबच लाब रांगा… कामावर जाण्यासाठी चाकरमाण्यांना वाहतूक कोंडीचा बसत आहे फटका… सिग्नल यंत्रणा आणि टोल नाक्यामुळे वाहतूक कोंडी… वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाची नाचक्की…
-
Maharashtra News: मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर
मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर… मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 15 मिनिटांपासून चर्चा… गेल्या 15 मिनिटांपासून मुख्यमंत्री ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी…
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
-
उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी एकत्र यावं, पुण्यात बॅनरबाजी
उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं या बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.
-
गोपीनाथ मुंडे यांनी भाजप उभी केली : पकंजा मुंडे
गोपीनाथ मुंडे यांनी भाजप उभी केली, असं पंकजा मुंडे यांनी नाशिकमधील एका जाहीर कार्यक्रमात म्हटलंय. मुंडेवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहिल. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा भाजप उभाच आहे.
-
राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर सलग सातव्या दिवशीही पोलीस बंदोबस्त तैनात आहे. राहुल सोलापूरकर यांच्या बद्दलच्या आमदार जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर सोलापूरकर यांच्या घरासमोर पोलीस सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. राहुल सोलापूरकर यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलं.
-
खेडच्या आवाशीमध्ये ठाकरे गटाला खिंडार, सरपंचांसह सर्व सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश
खेड तालुक्यामधील आवाशी ग्रामपंचायत सरपंचांसह सर्व सदस्यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे खेड तालुक्यात ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने मोठ्या संख्येने शिवसेना पक्षप्रवेश ही भेट असल्याची प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली
-
उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांचा राजन साळवींना घरचा आहेर
रत्नागिरी- उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांचा उद्धव ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांना घरचा आहेर दिला आहे. विधानसभेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साळवी यांनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली, असा मोठा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी केला.
ज्यांना गद्दार बोलले त्यांच्यासोबत साळवी जातील असं वाटत नाही; राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. राजन साळवी यांना पाच वेळा एबी फॉर्म दिला आणि तीन वेळा आमदार म्हणून पक्षाने निवडून आणलं. राजन साळवी कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्यासोबत कोणीही कार्यकर्ता जाणार नाही. भाजप आणि त्यानंतर शिंदे शिवसेना अशा राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे राजन साळवी यांची फरफट होत असल्याचा दावा विलास चाळके यांनी केला आहे.
-
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत रेल्वेमंत्री सकारात्मक
नाशिक : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत रेल्वेमंत्री सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. जीएमआरटी-रेल्वे तंत्रज्ञांची संयुक्त बैठक घेणार आहेत गेल्या कित्येक वर्षापासूनच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे राबविणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नाशिक-पुणे रेल्वेचा जुना प्रस्ताव पुन्हा गतिमान होण्याची चिन्हे दिसत आहेत. जीएमआरटी या महाकाय दुर्बिणीच्या प्रकल्पाने जागा देण्यास केला होता विरोध
-
शासनाकडे ४८८ कोटींची थकबाकी, पुणे जिल्हा परिषदेला आर्थिक फटका
पुणे : राज्य सरकारकडे पुणे जिल्ह्यातील सदनिका, जमीन व अन्य प्रकारच्या मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारातील मुद्रांक शुल्क जमा झाले आहे. त्यापैकी अनुदानाची रक्कम अजूनही पुणे जिल्हा परिषदेला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारकडून पुणे जिल्हा परिषदेला एकूण ४८८ कोटी तीन लाख रुपये येणेबाकी आहे. ही रक्कम राज्य सरकारकडे थकित आहे, तसेच समाविष्ट गावांमुळे पुणे जिल्हा परिषदेला आर्थिक फटका बसला असून, ८० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क कमी झाले आहे.
Published On - Feb 10,2025 8:24 AM





