Maharashtra Breaking News LIVE 2 April 2025 :वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 2 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेतील तंत्रज्ञान भागीदारीवर भर दिला आहे. आधुनिक संशोधनाचा सेमीकंडक्टर उद्याोग हा कणा असून, पुणे हे संशोधन आणि शिक्षणाचे केंद्र असल्याने ते द्विपक्षीय सेमीकंडक्टर भागीदारीत महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असा सूर अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या वतीने आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आला. ठाण्यातील पाचपाखाडी चंदनवाडी परिसरात पहाटे तीन वाजता सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या चार दुचाकी व एक चार चाकी वाहनाला अचानक आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यात आली असून मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळील पुलावर लोखंडी एन्गल तुटून उघडा पडल्याने अनेक गाड्यांचे टायर फुटले आणि अपघात झाले. अनेक गाड्यांचे यामधे नुकसान झाले असून प्रवाशांनी मदत मागूनही मिळाली नसल्याने संताप व्यक्त केलाय.
वफ्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर
LIVE NEWS & UPDATES
-
मी कामाचा माणूस आहे, टाइम पास करायला मला आवडत नाही- अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर आहेत. तेथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, ‘अल्पसंख्यांक भागातील विकास करणे हे महत्वाचे आहे. मी आज याबाबत बैठक घेणार आहे. मी कामाचा माणूस आहे. फालतू गप्पा मारायला, टाइम पास करायला मला आवडत नाही.’
-
महिला न्यायाधिशासमोर होणार नाही दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी
बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियानच्या मृत्यूबाबत वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. आता सालियन यांचे वकील अॅड. निलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा सालियान मृत्यू प्रकरणी यापुढची सुनावणी महिला न्यायाधिशासमोर होणार नाही.
-
-
शिंदेंच्या शिवसेनेचा राज ठाकरेंना डिवचणारा बॅनर
शिंदेंच्या शिवसेनेचा राज ठाकरेंना डिवचणारा बॅनर लावण्यात आला आहे. दादरमधील शिवजी पार्कमध्ये हा बॅनर लावण्यात आला होता. मात्र आता मनसे कार्यकर्त्यांनी तो बॅनर उतरवला आहे. पण आता हा बॅनर वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच बॅनर लावण्याआधी कोणाची परवानगी घेतली होती असा सवाल आता मनसेकडून विचारण्यात येत आहे.
-
“दादागिरी खपवून घेतली जाणार नाही”; बीडमधले नेते ,कार्यकर्ते, प्रशासनाला अजित पवारांचा सज्जड दम
बीडमधले नेते , कार्यकर्ते, प्रशासनाला अजित पवारांनी सज्जड दमच दिला आहे. अजितदाद म्हणाले की, “बीड जिल्ह्यात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. राख आणि वाळूच्या गँगना सुतासारखं सरळ करणार. रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट काढून पैसे खाणाऱ्यांना मातीत घालणार” असं म्हणत अजितदादांनी थेट दमच दिला आहे. तसेच पक्षात कार्यकर्त्यांना घेण्याआधी त्यांचे रेकॉर्ड तपासा असही अजित पवार म्हणालेत.
-
पहिल्यांदा वक्फ विधेयक आलं तेव्हा आक्षेप नव्हता, आता आम्ही बदल करतोय तर आक्षेप का? : रिजिजू
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ विधेयक सादर केलं आहे. पण आता त्यांनी या विधेयकावर आक्षेप घेणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले की, “वक्फ सुधारणा विधेयकावर 25 राज्यांमधून सूचना मागवल्या आहेत. पहिल्यांदा वक्फव विधेयक आलं तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. याधाही वक्फ कायद्यात संशोधन झालं आहे. मग आम्ही विधेयकामध्ये बदल करतोय तर आक्षेप का घेतले जात आहेत?” असा प्रश्न रिजिजू यांनी विचारला आहे. तसेच विरोधकही या बदलाला समर्थन करतील असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला आहे.
-
-
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर; अल्पसंख्याक मंत्री रिजिजू यांनी सादर केलं विधेयक
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मंत्री रिजिजू यांनी विधेयक सादर केलं आहे. विधेयकावर 97 लाख सूचना आल्या असल्याचंही अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे. तसेच “कायद्याच्या जाणकारांकडूनही आम्ही सूचना मागवल्या आहेत. वक्फ विधेयक आलं तेव्हा कुणीही आक्षेप घेतला नाही, आणि आता आम्ही विधेयकामध्ये बदल करतोय तर आक्षेप घेतले जात आहेत.” असंही रिजिजू यांनी म्हटलं आहे.
-
आज येणारं विधेयक हे संविधानाच्या विरोधात- राहुल गांधी
नवी दिल्ली- “आज येणारं विधेयक हे संविधानाच्या विरोधात आहे. आपण सभागृहात चर्चेदरम्यान आमचे विचार मांडू विरोध करू आणि विरोधातच मतदान करू. याबाबत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र राहिलं पाहिजे,” असं राहुल गांधी म्हणाले.
-
कुणाल कामराचा शो रेकॉर्ड करणाऱ्या कॅमेरामनचा जबाब नोंदवला
कॉमेडियन कुणाल कामराचा शो रेकॉर्ड करणाऱ्या कॅमेरामनचा जबाब नोंदवला. खार पोलिसांनी कॅमेरामन आणि स्टाफचा जबाब नोंदवला आहे. प्रेक्षकांना नोटीस पाठवली नसून साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले, असं स्पष्टीकरण खार पोलिसांकडून प्रेक्षकांच्या चौकशीबाबत देण्यात आलं.
-
पक्षात कार्यकर्त्यांना घेताना त्यांचे रेकॉर्ड तपासा- अजित पवार
बीड- “पक्षात कार्यकर्त्यांना घेताना त्यांचे रेकॉर्ड तपासा. आपल्या अवतीभवती चुकीची लोकं नसावीत. चुकीच्या लोकांना सोबत घेतलं तर आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
-
नवी दिल्ली- चंद्राबाबू नायडू यांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा
नवी दिल्ली- चंद्राबाबू नायडू यांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा आहे. मात्र एका अटीवर त्यांनी हा पाठिंबा दिला आहे. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लीम व्यक्तीची नेमणूक नको अशी चंद्राबाबूंची भाजपकडे अट आहे. विधेयक मांडल्यानंतरच चंद्राबाबूंची अट मान्य केली की नाही याबाबत स्पष्टता येणार आहे.
-
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचा सस्पेन्स वाढला
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचा सस्पेन्स वाढला आहे. वक्फ विधेयकाबाबत आम्ही सभागृहातच आमची भूमिका स्पष्ट करू, असं राऊत म्हणाले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना विरोधात की बाजूने मतदान करणार याची उत्सुकता वाढली आहे. इंडिया आघाडीच्या बाजूनेच शिवसेना मतदान करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
नवी दिल्ली- वक्फ विधेयकाबाबत काँग्रेसची बैठक सुरू
नवी दिल्ली- वक्फ विधेयकाबाबत काँग्रेसची बैठक सुरू आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस खासदारांची बैठक सुरू आहे.
-
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री किरण रिजीजू मांडणार वक्फ सुधारणा विधेयक
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू मांडणार वक्फ सुधारणा विधेयक. भाजपकडून जगदंबिका पाल, रवी शंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे, सुधांशु त्रिवेदी, मेधा कुलकर्णी, भागवत कराड विधेयकावर बोलणार आहेत.
-
क्फविरोधात बांग देणारे मूर्ख – संजय राऊतांनी साधला निशाणा
भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आम्ही हिंदुत्वाचे मूळ शिलेदार. वक्फविरोधात बांग देणारे मूर्ख – संजय राऊतांनी साधला निशाणा
-
वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध ? संजय राऊतांचा सवाल
वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, आम्हाला हिंदुत्व शिकवण्यची गरज नाही. या विधेयकाला RSS चाही पूर्ण पाठिंबा नाही – संजय राऊत
-
बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी
बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षक संघटनेकडून अजित पवारांच्या ताब्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली.
आत्महत्या केलेल्या नागरगोजे नामक शिक्षकाच्या घटने संदर्भात घोषणाबाजी करत न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
-
वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रामध्ये अलर्ट
वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रामध्ये अलर्ट. अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोन द्वारे लक्ष ठेवलं जाणार. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
-
नवी दिल्ली – बजरंग सोनावणे आज लोकसभेत अनुपस्थित राहण्याची शक्यता
बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे आज लोकसभेत अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी बजरंग सोनावणे अनुपस्थित राहण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीसाठी सोनावणे बीडला गेल्याची माहिती समोर आली आहे.
-
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर ठाकरेंची शिवसेना INDIA आघाडी सोबत विरोधात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
मालमत्ता करात ठाणे पालिका मालामाल
आर्थिक वर्षात तब्बल 810 कोटीचा मालमत्ता कर वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 702 कोटींची वसुली झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 108 कोटींची अधिकची वसुली केली आहे. या उद्दिष्टाच्या 95 टक्के एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेला यश मिळाले आहे.
-
अजित पवार बीडमध्ये, धनंजय मुंडे अनुपस्थित
उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल. पोलीस मुख्यालयावर हेलिकॉप्टरच लँडिंग. आज दिवसभर अजित पवार यांचे विविध कार्यक्रम. अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे उपस्थित नाहीत. तब्येत खराब असल्याने धनंजय मुंडे अनुपस्थित.
-
माढ्याच्या माजी आमदाराच्या पुतण्याची रेल्वेखाली आत्महत्या
माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या पुतण्याची रेल्वेखाली आत्महत्या. मुलाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक पित्याची रेल्वेखाली आत्महत्या. बाळासाहेब पितांबर पाटील असं आत्महत्या केलेल्या त्या मुख्याध्यापक पित्याचे नाव आहे.
-
बुलढाण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, 4 जणांचा मृत्यू , तर 25 जखमी
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, या घटनेत 25 जण जखमी झाले असून सहा लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. जयपूर लांडे फाटा समोर हा विचित्र अपघात झाला आहे. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून चार चाकी वाहनाने आधी धडक दिली, त्यानंतर खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. सकाळी पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Published On - Apr 02,2025 8:12 AM





