
शिवसेना ठाकरे गटाला आज मोठे खिंडार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे मुंबईतील महत्वाचे माजी नगरसेवक, वरिष्ठ पदाधिकारी तसेच काही मुख्य नेते शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर हा सोहळा होणार आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख व लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष करंदीकर भाजपमध्ये, पोंभुर्ले सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपात प्रवेश केला. त्याचप्रमाणे गावातील सोसायटीचे पदाधिकारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आज पश्चिम रेल्वेवर माहिम ते वांद्रेदरम्यान सुरू असणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. विरारहून चर्चेगेटकडे जाणाऱ्या सकाळच्या सर्व लोकल अंधेरीपर्यंत सुरू आहे. सध्या अंधेरीपर्यंत सुटणाऱ्या सर्व धिम्या लोकल या १० ते १५ मिनिटाने उशिराने धावत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलं असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी जे म्हटले आहे ते भारतासाठी नाही. काही देशांच्या ईव्हीएम इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत ते ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते असे म्हटले. भारताचे ईव्हीएम कोणीही हॅक करू शकत नाही. कारण भारतातील ईव्हीएम इंटरनेटशी जोडलेले नाहीत असे भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसच्या लोकांना हे समजत नाहीये. जेव्हा निवडणूक आयोगाने ईव्हीएम कसे हॅक करायचे ते दाखवण्यास सांगितले तेव्हा कोणीही का गेले नाही? असेही ते म्हणाले.
अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी जे म्हटले आहे ते भारतासाठी नाही. काही देशांच्या ईव्हीएम इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत ते ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते असे म्हटले. भारताचे ईव्हीएम कोणीही हॅक करू शकत नाही. कारण भारतातील ईव्हीएम इंटरनेटशी जोडलेले नाहीत असे भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. इटियाडोह धरणाच्या कालव्यात एक शेतकरी वाहून गेला होता. शेतात औषधी फवारणीनंतर तो कालव्यात हात -पाय धुण्यासाठी उतरला आणि याचदरम्यान ही घटना घडली. त्याचा मृतदे आढळून आला आहे.
काय महिती आहे का? संजय राऊत यांच्या वरून खालून धूर निघतोय हे जळणारं लाकूड आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंडळीवर ते जळत आहे. वरून धूर निघतोय खालून धूर निघतोय तिथे जागा मिळते तिथून धूर निघतोय, अशी जळजळीत टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जोगलादेवी बंधार्यात पाणी सोडण्यासाठी शेतकर्यांचं कालव्यावर धरणे आंदोलन सुरू आहे. आसपासच्या 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले आहे.
नांदेडमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकर्यांनी एल्गार केला आहे. शेतकर्यांनी बैठक घेऊन जमीन सीमांकनाला विरोध केला. 15 तारखेला महामार्ग प्रशासनाच्या वतीने मालेगाव तालुक्यात पोलीस बंदोबस्तात जमिनीचे सीमांकन.केले जाणार आहे. त्याला तीव्र विरोध करणार असल्याचे बैठकीत ठरले.
अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारत बांधकामाबाबत उच्च न्यायालयाने तोडक कारवाईचे आदेश ठाणे महानगरपालिकेला दिलेले आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने अशा बेकायदेशीर इमारत धारकांना नोटीसा बजावून कारवाईला सुरूवात केली. ठाण्यातील सावरकर नगर लोकमान्य टिळक प्रभाग समिती अंतर्गत तळ अधिक 7 मजली इमारत ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
आजवर मुंबई महापालिका आणि बेस्टला विकणाऱ्या आदु ठाकरेंनी मुंबईबद्दल न बोललेलं बरं, नाही तर त्यांची लखतर वेशीवर टांगायला आम्हाला वेळ लागणार नाही अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
विशाल गवळीने आत्महत्या केली मात्र त्याच्या गुंड भावांची दहशत सुरूच आहे. विशाल गवळी कुटुंब राहत असलेल्या परिसरात रामनवमी आणि साई भंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना आकाश गवळीने धमकी दिली. कोणीही मंडपचे काम घेऊ नका नाहीतर कोणाला सोडणार नाही, अशी धमकी त्याने दिली
सध्या संजय राऊत हे सत्ता गेल्यानंतर बेताल वक्तव्य करत आहेत भारतीय जनता पार्टी 25 वर्षांपूर्वी पूर्वीपेक्षा जास्त जी युती ठेवली तोच भारतीय जनता पार्टीचा विचार आहे तुमचे विचार सत्तेसाठी बदलले आहेत धोका त्यांनी दिला असा निशाणा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी साधला.
महिलेच्या तक्रारी नंतर मुबई नका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल… संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख याला मुंबई नाका पोलिसांनी केली अटक… संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून शहरातून होता तडीपार… महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक रॉबरी सह नाशिकमध्ये घडलेल्या आरोपी दंगलीतील आरोपी… बसमधून उतरलेल्या महिलेची वाट अडवत केला विनयभंग… बस चालक आणि वाहकाला मारहाण करत बसवरही केली दगडफेक…
नंदुरबार जिल्ह्यातील समस्या कधी थांबणार असा प्रश्न आता वारंवार विचारला जाऊ लागला आहे… नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरण यातना….. आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळतंय का सरकार… बांबूच्या झोळीतून रुग्णांना करावी लागते जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट… रेंगीता आट्या चौधरी या 18 वर्षीय तरुणीचं नाव असून रस्ता नसल्याने तिला उपचारासाठी जीवघेणा प्रवास करावा लागला आहे… गेल्या 2 महिन्यापासून बांबू झोळीतून जीवघेणा प्रवासाची ही तिसरी घटना….
आर्वीमध्ये उभारण्यात आलेल्या नविन प्रशासकीय इमारतीचा करणार फडणवीस लोकार्पण… तसेच आर्वी मतदार संघातील 720 कोटीरुपयांच्या विकास कामांचेही करणार लोकपर्ण आणि भूमिपूजन…. फडवणीसांचे तत्कालीन स्वीय सहायक आमदार सुमित वानखडे आणि भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार दादाराव केचे यांच्या मतदारसंघात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर आहेत. आर्वीमध्ये उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे. तसंच आर्वी मतदार संघातील 720 कोटीरुपयांच्या विकास कामांचंही लोकपर्ण आणि भूमिपूजन करणार आहेत.
विशाल गवळीचे वकील संजय धनके तळोजा कारागृहात दाखल झाले आहेत. विशाल गवळी याने आज पहाटे साडेचार वाजता आत्महत्या केली. विशालचे कुटुंबीय तळोजा कारागृहात दाखल झाले आहेत. विशाल हा कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी आहे.
बदनापूर तालुक्यातील अकोला गावात आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तीन दिवसांपूर्वी अकोला गावात आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे गोठे आणि चारा जळून खाक झालं होतं. तालुका प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार गावकऱ्यांचं 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झालंय.
14 मे रोजी भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. सरन्यायाधीश म्हणून गवईंना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त होणार आहेत.
पुणे- खाजगी रुग्णालयाबाबत ५ लाख रुग्णांचे अनुभव गोळा करण्याचा संकल्प आहे. पुण्यातील ‘पेशंट्स राईटस नाऊ फोरमने आवाहन केलंय. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत माहिती सादर करणार आहे. ऑनलाइन माहिती भरण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी ए.टी.एम. कार्ड, मोबाईल व रोख रक्कम असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
रायगडावर महायुतीमधील दुफळी दिसून आली. महायुती एकोपा दाखवू शकली नाही. छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे आम्हाला चांगले माहीत आहे. परंतु त्याविषयी अमित शाह यांनी शिकवण्याची गरज आहे. त्यांनी भाषणात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, असे शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी आज ‘मराठी की पाठशाळा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नका चला मराठी भाषा बोलू या आशयाचे बॅनर शिवसेना भवन समोर लावलेले चर्चेचा विषय बनले आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी आता महाराष्ट्रातच कार्यशाळा घ्यावी लागत असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात सह्याद्री अतिथिगृहावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्री वाद आणि निधी वाटप या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
नाशिक : शिक्षणमंत्री लवकरच मनपा शिक्षण विभागाचा आढावा घेणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे बुधवारी महापालिका शिक्षण विभागातील कामकाजाचा आढावा घेणार आहेत. शिक्षणमंत्री शिक्षक भरती, तसेच शिक्षक समायोजन याबाबतही मनपाला जाब विचारणार आहेत. १०० दिवसांचा कृती आराखड्याअंतर्गत मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयीन सुधारणांबाबत विशेष मोहीम राबवली जाणार
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर शरद पवार यांनी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना फोनवर संपर्क करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.
पुणे : पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांची महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेकडून (एमएमसी) चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी सोमवारपर्यंत डॉ. घैसास यांना स्पष्टीकरण देण्याबाबत परिषदेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे डॉ. घैसास यांच्यासमोरील अडचणींमध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे : शहरात विविध भागांतून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असताना महापालिकेकडून मोफत पाण्याचे टँकर पुरविण्यात येत आहेत. मात्र, अनेक भागांत टँकर आणि त्यामुळे पाणी पोहोचतच नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे टँकरवर देखरेख ठेवण्यासाठी टँकरच्या फेऱ्यांच्या नोंदपुस्तकात संबंधित भागातील सहायक आयुक्तांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांवर टँकरच्या फेऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने पाणीचोरीला आता चाप बसणार आहे.