Maharashtra News Live : सोलापुरात ‘तो’ उमेदवार निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता

| Updated on: Apr 26, 2024 | 12:20 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 22 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News Live : सोलापुरात 'तो' उमेदवार निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. सर्वत्र उमेदवार, नेत्यांच्या प्रचार फेऱ्या, सभा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत न्यायालय आज निर्णय देणार आहे. इन्सुलिनचा डोस द्यायचा की नाही? याबाबतचा निर्णय न्यायालय देणार. राऊज अवेन्यू न्यायालय आज देणार निर्णय. तिहार जेलमध्ये केजरीवाल यांना इन्सुलिनचा डोस द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Apr 2024 06:52 PM (IST)

    पाटण्यात भरदिवसा 7 लाखांची लूट

    बिहारची राजधानी पाटणा येथे भरदिवसा बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याकडून सुमारे सात लाख रुपये लुटले आहेत. चौक शिकारपू ओव्हर ब्रिजवर बँकेत पैसे जमा करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यावर चोरट्यांनी बंदुकीच्या धाकावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • 22 Apr 2024 06:35 PM (IST)

    अकाली दलाने 5 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली

    शिरोमणी अकाली दलाने लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाने पुन्हा एकदा हरसिमरत बादल यांना भटिंडामधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

  • 22 Apr 2024 06:25 PM (IST)

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा धक्का

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. राऊस एव्हेन्यूच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी तिहार तुरुंगाला अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन द्यायचे की नाही हे ठरवण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • 22 Apr 2024 06:10 PM (IST)

    आज देशात पहिलं कमळ फुललं, बिनविरोध विजयावर मुकेश दलाल म्हणाले..

    सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्यावर भाजपचे मुकेश दलाल म्हणाले की, आम्ही विकसित भारतासाठी मते मागत होतो, पंतप्रधान मोदींच्या कामासाठी आम्ही मते मागत होतो. आज देशात पहिले कमळ फुलले आहे. काँग्रेसचा फॉर्म नाकारण्यात आला आणि उर्वरित उमेदवारांनी पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेच्या समर्थनार्थ त्यांचे फॉर्म मागे घेतले.

  • 22 Apr 2024 03:11 PM (IST)

    सांगलीत अखेर विशाल पाटील यांची बंडखोरी कायम

    विशाल पाटील यांनी ठेवला आपला अपक्ष अर्ज. विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश. काँग्रेस नेत्यांची शिष्टाई ठरली अयशस्वी

  • 22 Apr 2024 02:57 PM (IST)

    माळी समाजाला उमेदवार न देणाऱ्या पक्षाच्या विरोधात माळी समाज मतदान करणार

    सातत्याने माळी समाजाच मतदान घेऊन माळी समाजाचा नेत्याला उमेदवारी नाकारून माळी समाज्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

  • 22 Apr 2024 02:00 PM (IST)

    सोलापूरमध्ये घडामोडींना वेग

    वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.  सोलापूर लोकसभेचे वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.  अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.  राहुल गायकवाड हे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आहेत.

  • 22 Apr 2024 01:45 PM (IST)

    वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख पोलीस ठाण्याकडे रवाना

    काल झालेल्या राड्यानंतर वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे शेकडो कार्यकर्त्यांसोबत कांदिवली पोलीस ठाण्याकडे रवाना झालेत.  काही वेळात पोलीस ठाण्यात पोलिसांना जाब विचारणार आहेत.  काल भाजप कार्यालयासमोर पियुष गोयल यांच्याविरोधात काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी निदर्शने केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी दोन्ही नेते रवाना झालेत.

  • 22 Apr 2024 01:30 PM (IST)

    ससून रुग्णालयामधील वाद समोर

    ससून रुग्णालयामधील अधिक्षकपदाचा वाद समोर आला आहे.  ⁠डॉ. अजय तावरे आणि डॉ. यल्लापा जाधव या दोघांनीही अधिक्षकपदावर दावा केला आहे. ⁠दोघेही अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून आहे.  ⁠दोघांकडून ही स्वतः अधिक्षक असल्याचा दावा करण्यात येत आहे.  ⁠डॉ. तावरे यांच्याकडील अधिक्षकपदाचा पदभार शुक्रवारी काढून घेण्यात आला आहे. ⁠राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्तांनी काढले आहेत.  तावरे यांचा पदभार काढण्याचे आदेश देण्यात आलेत.

  • 22 Apr 2024 01:17 PM (IST)

    शरद पवारांची अमरावतीत सभा… 

    शरद पवारांची अमरावतीत सभा…  अमरावतीकरांना संबोधित करताना पवारांनी मोदींवर निशाणा साधलाय. नेहरूंचं योगदान देशाच्या इतिहासातून पुसून काढू शकत नाही. पण आजचे पंतप्रधान हे नेहरूंवर टीका करतात. त्यांचा चुका शोधतात. पण दहा वर्षात मी काय केलं हे सांगत नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला, आणि देशाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांवर टीका केली पाहिजे, याचा अर्थ आजच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे, असं पवार म्हणालेत.

  • 22 Apr 2024 12:50 PM (IST)

    चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात

    चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली आहे. क्रांती चौकातून संस्थान गणपतीपर्यंत ही प्रचार रॅली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चंद्रकांत खैरे यांचं आज शक्तिप्रदर्शन आहे. या प्रचार रॅलीत आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.

  • 22 Apr 2024 12:40 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाने 14 वर्षांच्या बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी दिली

    नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने 14 वर्षांच्या बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. सायन येथील वैद्यकीय टीमने स्पष्टपणे असे मत नोंदवले आहे की गर्भधारणा चालू राहिल्याने अल्पवयीन व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सायन रुग्णालयाच्या डीनला अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याची विनंती करण्यात आली आहे.

  • 22 Apr 2024 12:30 PM (IST)

    उद्यानात खेळत असताना विजेच्या तारांच्या संपर्कात येऊन 9 वर्षीय मुलाचा मृत्यू

    गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील महाराजा रिट्रीट सोसायटीच्या उद्यानात खेळत असताना विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

  • 22 Apr 2024 12:20 PM (IST)

    भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला

    अहमदनगर- भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मुहूर्त वेळ पाहून जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरला आहे. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुन्हा अर्ज भरणार आहेत. थोड्याच वेळात नगर शहरातून रॅलीला सुरुवात होणार आहे.

  • 22 Apr 2024 12:10 PM (IST)

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा झटका

    नवी दिल्ली- दिल्ली हायकोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा झटका दिला आहे. हायकोर्टाने जामिनाची याचिका फेटाळली आहे. याचीकाकर्ते ‘वुई द पीपल ऑफ इंडिया’ यांनाच 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम तिहार जेलमध्येच असणार आहे.

  • 22 Apr 2024 11:54 AM (IST)

    Live Update | भाजप उमेदवार माधवी लता यांच्या विरोधात एफआयआर दाखल

    भाजप उमेदवार माधवी लता यांच्या विरोधात एफआयआर दाखल… तेलंगणा पोलिसांकडून गुन्हा दाखल… 17 एप्रिलला रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत माधवी लता यांनी धनुष्यबाण हातात घेऊन तो चालवण्याचा इशारा केला होता… मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप माधवी लता यांच्यावर…

  • 22 Apr 2024 11:40 AM (IST)

    Live Update | उष्णतेच्या लाटांचा अंदाज लक्षात घेता निवडणूक आयोगाची बैठक

    देशातल्या काही भागांमध्ये तापमान वाढ आणि उष्णतेच्या लाटांचा अंदाज लक्षात घेता निवडणूक आयोगाची बैठक… उष्णतेच्या लाटांमुळे होणारा धोका कमी करण्याच्या उपायांवर होणार चर्चा… निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध विभागांसोबत आज बैठक करणार… देशातल्या अनेक राज्यातील अधिकारी बैठकीत सहभागी होणार

  • 22 Apr 2024 11:25 AM (IST)

    Live Update | अभिनेत्री राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा झटका

    अभिनेत्री राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा झटका… चार आठवड्यात मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सरेंडर करण्याचे आदेश… राखी सावंतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली… राखी सावंतचा पती आदिल याचा अश्लील व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी राखी सावंत हिच्यावर गुन्हा दाखल… जामिनासाठी राखी सावंतने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती पण सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली…

  • 22 Apr 2024 11:09 AM (IST)

    Live Update | सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं प्रकरण, गुन्हे शाखेची एक टीम गुजरातमध्ये दाखल

    सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं प्रकरण… मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक टीम गुजरातमध्ये दाखल… ओरोपींनी गुन्हात वापरलेल्या पिस्तुलचा शोध घेणार… आरोपींनी गुन्हात वापरलेली पिस्तुल गुजरात येथे फेकल्याची माहिती मिळत आहे…

  • 22 Apr 2024 10:47 AM (IST)

    अमरावती – बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे आज ठाकरे गटात प्रवेश करणार

    अमरावती – बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या प्रचार सभेत करणार पक्षप्रवेश.

    महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत.  अभिजीत ढेपे यांच्या प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटाला बळ मिळणार.

  • 22 Apr 2024 10:32 AM (IST)

    पिंपरी- चिंचवड : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

    पिंपरी- चिंचवड : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.  आकुर्डी मधील खंडोबा माळ चौक ते पीएमआरडी कार्यालय पर्यंत रॅली सुरू होईल.

  • 22 Apr 2024 10:16 AM (IST)

    घर घर मोदी चालतं, पण हर हर महादेव, जय भवानी का चालत नाही ?

    घर घर मोदी चालतं, पण हर हर महादेव, जय भवानी का चालत नाही ? संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे.

    शिवसेनेच्या मशाल गीतातून जय भवानी शब्द काढून टाकण्याची सूचन आल्यावर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं.

  • 22 Apr 2024 09:54 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांनी घेतली माजी खासदारांची भेट

    बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रविवारी मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. या दौऱ्यात ताथवडे येथेही त्यांनी भेट दिली. सुनेत्रा पवार ताथवडे येथे येणार म्हणून माजी खासदार नानासाहेब नवले हेही त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली.

  • 22 Apr 2024 09:39 AM (IST)

    नागपुरात हलक्या पावसाच्या सरी

    नागपूरच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मग अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. परंतु 24 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस असणार आहे, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

  • 22 Apr 2024 09:22 AM (IST)

    राहुल गांधी यांची सोलापुरात सभा

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा होणार आहे. 24 एप्रिल रोजी ही सभा सोलापुरातील मरीआई चौकातील एक्झिबिशन मैदानावर होंणार आहे.

  • 22 Apr 2024 09:04 AM (IST)

    खासदार सदाशिव लोखंडे आज अर्ज भरणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री विखे पाटील, मंत्री दादा भुसे, नीलम गोऱ्हे आज शिर्डीत येणार आहेत. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात येणार आहे.

  • 22 Apr 2024 08:58 AM (IST)

    Maharashtra News : राहुल गांधी येणार सोलापूरमध्ये

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोलापुरात होणार जाहीर सभा. काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची सभा. 24 एप्रिल रोजी राहुल गांधींची सोलापूर शहरात होणार सभा. सोलापुरातील मरीआई चौकातील एक्झिबिशन मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे.

  • 22 Apr 2024 08:42 AM (IST)

    Maharashtra News : रोहिणी खडसे नाराज

    जळगावच्या जामनेर येथील मेळाव्यात पाच मिनिटात भाषण संपविण्यास सांगताच रोहिणी खडसे नाराज झाल्या. शरद पवार यांच्या उपस्थितीत जामनेर येथे पार पडला कार्यकर्ता मेळावा. पुरुष बोलू शकतात मग महिला का बोलू शकत नाही? या शब्दात रोहिणी खडसे यांनी व्यासपीठावरच भाषण सुरू असताना भाषणात नाराजी व्यक्त केली.

  • 22 Apr 2024 08:19 AM (IST)

    Maharashtra News : तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी मंदिर 22 तास खुले राहणार

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदीर आजपासून 25 एप्रिल दरम्यान रात्री 1 वाजता खुले होणार. चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेचे मंदिर रात्री 11 वाजता बंद होऊन रात्री 1 वाजता उघडणार. म्हणजे दर्शनासाठी मंदिर 22 तास खुले राहणार. चैत्र पौर्णिमेच्या काळात व मंगळवार, शुक्रवारी, रविवारी व्हीआयपी दर्शन बंद असणार. मुख्य महाद्वार ऐवजी भक्तांना तात्काळ दर्शनासाठी बिडकर पायऱ्या मार्गे मंदिरात सोडले जाणार.

  • 22 Apr 2024 08:17 AM (IST)

    Maharashtra News : ‘मी कुणाला ना पाडा म्हणालोय, ना कुणाला निवडून आणा म्हणालोय’

    “निवडणुकीत मी कुणाला ना पाडा म्हणालोय, ना कुणाला निवडून आणा म्हणालोय. तुम्हाला पाडायचं आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, एवढी ताकद यावेळी मराठ्यांनी दाखवावी हे मी मराठ्यांना सांगितल आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Published On - Apr 22,2024 8:15 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.