Maharashtra Political News live : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आला रेड्यावर

| Updated on: Apr 19, 2024 | 7:07 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 18 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आला रेड्यावर

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या १९ एप्रिल रोजी होत आहे. राज्यातील पाच जागांवर मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित ठरलेल्या बारामती लोकसभा मतदार संघासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार आहे. महायुतीची आज पत्रकार परिषद होणार असून त्यात वाद असलेल्या जागांवरील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याला अवकाळी वादळी पावसाने झोडपले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राज्य महासचिव उत्कर्षा रूपवते यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Apr 2024 05:52 PM (IST)

    जम्मू-काश्मीरचे खुल्या तुरुंगात रूपांतर झाले आहे – मेहबुबा मुफ्ती

    पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या उमेदवारीवरून सांगितले की, ही निवडणूक वीज, पाणी, रस्त्यांसाठी नाही, ही निवडणूक आमची अस्मिता, आमची जमीन आणि 2019 नंतर जम्मू-काश्मीरमधील आमच्या तरुणांच्या नोकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात आहे. आता उभे राहण्याची वेळ आली आहे. वर जम्मू-काश्मीरचे खुल्या कारागृहात रूपांतर झाले आहे. आम्हाला बंधपत्रित मजूर बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • 18 Apr 2024 05:35 PM (IST)

    विरोधक मोदींच्या हमीबद्दल बोलतात, न्याय पत्रिकेवर नाही – प्रमोद सावंत

    गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, लोक देशभरात 400 हून अधिक घोषणा देत आहेत. विरोधकही चारशेचा आकडा पार करणार नाही, तर चारशेच्या जवळपास पोहोचणार असल्याचे सांगू लागले आहेत. ते स्वतःच्या न्याय पत्रिकेवर बोलत नाहीत तर मोदींच्या हमींवर बोलतात.

  • 18 Apr 2024 05:25 PM (IST)

    DRDO च्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्रूझ क्षेपणास्त्राची ओडिशामध्ये यशस्वी चाचणी

    DRDO ने इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR), चांदीपूर येथून ओडिशाच्या किनाऱ्यावरील स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र (ITCM) चे यशस्वी उड्डाण केले. चाचणी दरम्यान सर्व उपप्रणाली अपेक्षेप्रमाणे कार्य करतात. चाचणी यशस्वी मानली जाते.

  • 18 Apr 2024 05:10 PM (IST)

    इराणने ओलिस ठेवलेल्या 17 भारतीयांपैकी एक मायदेशी परतला

    इस्रायली जहाजातून इराणी सैनिकांनी ओलीस ठेवलेल्या 17 भारतीयांपैकी एक मायदेशी परतला आहे. उर्वरित 16 जणांच्या सुटकेबाबत भारत सरकार इराणच्या संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी या लोकांच्या सुटकेबाबत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली होती.

  • 18 Apr 2024 04:00 PM (IST)

    Live Updates : संजय काका पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

    भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सांगली मधून रॅली द्वारे शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीमध्ये भाजपा आणि महायुतीचे नेते देखील सहभागी झाले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय काका पाटील यांना खांद्यावर उचलून घेतले,यावेळी हजारो कार्यकर्ते या बाईक रॅलीत सहभागी झाले होते.

  • 18 Apr 2024 03:51 PM (IST)

    Live Updates : सरकारचीच भाकरी फिरण्याची आली आहे वेळ

    रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे. बारामतीची जनता ही शरद पवारांच्या पाठीशी आहे. सरकारचीच आता भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचं त्या म्हणाल्या.

  • 18 Apr 2024 03:41 PM (IST)

    Live Updates : उमेदवारी अर्जात त्रुटी

    धाराशिवमधील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्जात अनेक त्रुटी असल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बजावली त्रुटीची नोटीस बजावली.

  • 18 Apr 2024 03:33 PM (IST)

    Live Updates : ओमराजेंनी नाही जोडला एबी फॉर्म

    धाराशिवमधील महाविकास आघाडी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज अर्ज सादर करताना ab फॉर्म दिला नाही, उद्या शिवसेना पक्षाचा ab फॉर्म सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज शपथपत्र व इतर कागदपत्रे सादर करण्यात आली.

  • 18 Apr 2024 03:22 PM (IST)

    Live Updates : मोदींना वाटते ही भीती- पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

    पुण्यात झालेल्या सभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी सांगत आहेत की देशाची अर्थव्यवस्था पाचवी क्रमांक झाली आहे याचा मला अभिमान आहे. मात्र मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असती हे आयएम चे रिपोर्ट असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपाच्या जाहीरनामावर मोदींचे 42 फोटो आहेत.अनेक ठिकाणी मोदी आपला फोटो वापरत आहेत.मोदींना भीती आहे की आपला फोटो नसला तर लोक आपल्याला विसरतील, असा टोला त्यांनी लगावला.

  • 18 Apr 2024 03:13 PM (IST)

    Live Updates : बेरोजगारीवरुन शरद पवारांचा मोदींवर निशाणा

    दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पण गेल्या दहा वर्षांत नोकऱ्या कमी झाल्याचा घणाघात शरद पवार यांनी केला. सध्या देशातील तरुणाईचा जो आकडा आहे, त्यातील 86 टक्के मुलं ही बेरोजगार आहेत, असे ते म्हणाले.

  • 18 Apr 2024 03:01 PM (IST)

    Live Updates : अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आला रेड्यावर

    माढा लोकसभेसाठी रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आला. मराठा समाजाचे राज्य समन्वयक राम गायकवाड यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • 18 Apr 2024 02:56 PM (IST)

    बारामती लोकसभेच्या लढतीबाबत महत्वाची बातमी

    अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी डमी अर्ज भरला. खबरदारी म्हणून अजित पवारांनी भरला डमी उमेदवारी अर्ज भरला आहे. छाननी पूर्ण झाल्यावर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर होईल.  तेव्हा अजित पवार आपला डमी अर्ज मागे घेणार आहेत.

  • 18 Apr 2024 02:46 PM (IST)

    मुंबई युवक काँग्रेसच्या पोस्टरने लक्ष वेधलं

    मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरीतील गोखले पुलावर पोस्टर लावून बीएमसी आणि सरकारचा निषेध केला आहे. युवक काँग्रेसने लावलेल्या पोस्टरवर हा माझा विकास… असं लिहिलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोटो लावण्यात आली आहेत.

  • 18 Apr 2024 02:33 PM (IST)

    अमोल कोल्हे यांचा अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

    महाराष्ट्र आणि देशाचे ठरलंय स्वाभिमानाची मशाल पेटवायची आणि तुतारी वाजवायची. मला प्रश्न पडलाय की ग्रामपंचायत की लोकसभा निवडणूक आहे. नटसम्राट ,कार्यसम्राट परवडतो. परंतु पलटूराम किंवा खोकेराम परवडत नाहीत. निधी हा जनतेच्या पैशातून दिला जातो. ही बाब लक्षात ठेवली पाहिजे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका आहे.

  • 18 Apr 2024 02:15 PM (IST)

    आदित्य ठाकरे उद्या शिर्डी दौऱ्यावर

    महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या राहाता शहरात उद्या महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन होणार आहे.  आदित्य ठाकरेंसह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख उपस्थित राहणार आहेत.  उद्या दुपारी 12 वाजता करणार उमेदवारी अर्ज दाखल आहेत.  राहाता शहरात आदित्य ठाकरे यांचा रोड शो आणि प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 18 Apr 2024 01:57 PM (IST)

    वैभव नाईक यांचा नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल

    वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे हे त्यांच्या दोन मुलांसाठी भांडत होते. अखेर त्यांच्यासाठी त्यांनी ऊमेदवारी घेतली. त्यामुळे विनायक राऊत यांचा विजय निश्चित झाला आहे. खरंतर राणे पहिल्या बाकावर ते नेते, पण किरण सामंत सारख्या व्यक्तीमुळे राणेंची ऊमेदवारी १३ व्या यादीत जाहीर त्यामुळे ते १३ व्या बाकावरचे नेते झालेत. केवळ आपल्या दोन मुलांचं राजकीय करीअर सेट करण्यासाठी राणेंनी ऊमेदवारी घेतली पण त्यांची गुंडगिरी आत्ता चालणार नाही.  कोकणातील जनता राणेंना हरवणार आहे, असं वैभव नाईक म्हणालेत.

  • 18 Apr 2024 01:55 PM (IST)

    अमरावतीत मविआचा मेळावा

    अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांला भेटीसाठी आठ आठ दिवस वेटींग वर ठेवलं जातं. महाराष्ट्रचा मुख्यमंत्री एवढा लाचार आहे रोज उठतो आनी दिल्लीला जातो. राज्यात मविआचे जागावाटप झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

  • 18 Apr 2024 01:51 PM (IST)

    सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

    सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या आहेत.  सुनेत्रा पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, राहुल कुल, विजय शिवतारे, प्रफुल पटेल उपस्थित आहेत. पार्थ आणि जय पवार देखील दाखल यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहेत.

  • 18 Apr 2024 01:48 PM (IST)

    मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग; सध्याची परिस्थिती काय?

    मुंबईच्या पवई भागातील जयभीमनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली  आहे. अग्निशमन दलाच्या दहापेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  आगीवरती अग्निशमन दलाने नियंत्रण देखील मिळवले आहे.  आगीत दहा ते बारा झोपड्या जळून पूर्णतः खाक झाल्या आहेत.  आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  ही आग घरातील असलेल्या देव मंदिरातील दिव्यामुळे लागली असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 18 Apr 2024 12:56 PM (IST)

    सक्षणा सलगर यांचा या मोठ्या नेत्यावर निशाणा

    शरद पवार यांना मुलगा नाही म्हणून सुप्रिया सुळे यांची थट्टा केली जातेय. महाराष्ट्राची जनता चुकले की ठोकते. चंद्रकांत पाटील यांनी महिलांच्या मतदारसंघात डल्ला मारलाय. जनतेने ठरवलंय गद्दाराना गाडायचे आहे, असे सक्षणा सलगर यांनी म्हटले.

  • 18 Apr 2024 12:42 PM (IST)

    अजित दादा यांनी महिलांची माफी मागावी- रोहिणी खडसे

    मनुवादी विचार अजित दादांनी लवकर आत्मसात केले. अजित पवार यांच्यावर संगतचा असर लवकर झालाय. शरद पवार यांनी महिलांना कायम आदर दिलाय.

  • 18 Apr 2024 12:16 PM (IST)

    जळगावातील केमिकल कंपनीच्या भीषण आगीत मयताची संख्या झाली तीनवर

    जळगावच्या एमआयडीसी मधील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागली होती भीषण आग.

  • 18 Apr 2024 12:08 PM (IST)

    भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या पोलीस सुरक्षेतेत वाढ

    सोशल मीडियावर आलेल्या धमकीनंतर नाशिक पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त. मध्यरात्रीच्या सुमारास गोंधळ घालणाऱ्या जमाविरुद्ध आवाज उठवल्याने आमदार देवयानी फरांदे यांना आली होती धमकी.

  • 18 Apr 2024 11:50 AM (IST)

    काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार

    सोलापूर- काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रणिती शिंदे आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरायला निघाल्या आहेत. रोड शो करत प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

  • 18 Apr 2024 11:40 AM (IST)

    ईव्हीएमबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

    नवी दिल्ली- ईव्हीएमबाबत सुप्रीम कोर्टात जस्टिस संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किँवा 100 टक्के VVPAT मिळावेत, असं वकिल प्रशांत भूषण म्हणाले. त्यावर देशात 98 कोटी मतदार असल्याचं कोर्टाने म्हटलंय. वारंवार एकाच प्रकारच्या मागण्या करू नका, असं कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे.

  • 18 Apr 2024 11:30 AM (IST)

    सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक

    अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी पुण्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. सचिन पोटे आणि तुषार काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आलेली पिस्तुल या दोघांच्या गाडीतून जप्त केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

  • 18 Apr 2024 11:20 AM (IST)

    मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीत बदल

    मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत पुलालगत उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर गार्डर उभारले जाणार आहे. या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी नाशिक येथून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर आज रात्री ११.५९ ते १९ एप्रिल पहाटे ४ वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू केले आहेत.

    नाशिक, भिवंडी इथून ठाणे, मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना खारेगाव टोल नाका इथं बंदी असेल. इथली वाहने टोल नाका इथून डावं वळण घेऊन गॅमन रोड, रेतीबंदर मार्गे वाहतूक करतील.

  • 18 Apr 2024 11:12 AM (IST)

    नारायण राणेंना भाजपची उमेदवारी जाहीर

    नारायण राणेंना भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या उमेदवारांची 13वी यादी जाहीर झाली आहे.

  • 18 Apr 2024 10:48 AM (IST)

    भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

    भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहे. होळकर यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर लवकरच शरद पवार गटात जाणार आहेत.

  • 18 Apr 2024 10:32 AM (IST)

    पुणे – सुप्रिया सुळे आज भरणार अर्ज, आंबेडकर चौकात दाखल

    आगामी लोकभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. आज सुप्रिया सुळे पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्या आंबेडकर चौकात दाखल झाल्या आहेत. त्या निमित्नाने मोठे शक्तीप्रदर्श करण्यात येण्याची शक्यता आहे.

  • 18 Apr 2024 10:12 AM (IST)

    विजयकुमार गावित हे काम करण्यासाठी टक्केवारी घेतात – के.सी. पाडवींचा गंभीर आरोप

    विजयकुमार गावित हे काम करण्यासाठी टक्केवारी घेतात असा गंभीर आरोप के.सी. पाडवींनी केला आहे. मात्र पाडवींनी हे आरोप सिद्ध करून दाखवावेत असं प्रत्युत्तर गावित यांनी दिलं आहे.

  • 18 Apr 2024 10:07 AM (IST)

    माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे – सुप्रिया सुळे

    माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे. मी आत्तापर्यंत लोकसभेत जे बोलले ती भाषणं ऐका. मी फक्त जनतेच्या हितासाठी बोलत आले, यापुढं ही बोलत राहीन, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानते. काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे, ते आज खरं बोलले. सातत्याने चंद्रकांत पाटील म्हणतात की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे. शरद पवार आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे. भाजपच्या पोटात होतं ते ओठांवर आलं.

  • 18 Apr 2024 09:53 AM (IST)

    Maharashtra News : एकनाथ शिंदे आज पुणे-सातारा दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पुणे सातारा दौऱ्यावर. पुण्यात महायुतीच्या जाहीर सभेत राहणार उपस्थित. त्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघातील महायुती उमेदवाराचे भरणार नामनिर्देश पत्र. संध्याकाळी साताऱ्यात महायुतीच्या उमेदवारांकरिता प्रचार रॅलीत व जाहीर सभेत राहणार उपस्थित.

  • 18 Apr 2024 09:49 AM (IST)

    Maharashtra News : उद्या फुटणार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ

    उद्या फुटणार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ. काटेवाडी मधील कन्हेरी मारुतीचे दर्शन घेऊन प्रचाराला होणार सुरुवात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार हा जाहीर कार्यक्रम. पवार कुटुंबातील अनेक सदस्य उद्या काटेवाडीत येणार.

  • 18 Apr 2024 09:23 AM (IST)

    Maharashtra news : हेमंत गोडसे अयोध्येत

    नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना, हेमंत गोडसे मात्र अयोध्येत. हेमंत गोडसे यांनी आयोध्यमध्ये जाऊन घेतले राम लल्लाचे दर्शन. काल हेमंत गोडसे यांनी काळाराम मंदिरात जाऊन रामरायाचे दर्शन घेतल्यानंतर आयोध्याकडे झाले होते रवाना. आज महायुतीकडून होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत नाशिकची जागा कुणाकडे जाणार याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • 18 Apr 2024 09:12 AM (IST)

    Maharashtra News : पुण्यात सिंहगड रोडवर गोळीबार

    पुण्यात सिंहगड रोड भुमकर चौकात गोळीबार. गणेश गायकवाड यांच्यावर झाला गोळीबार. पहाटे अडीच वाजता झाला गोळीबार. काडे पेटी मागितल्याच्या कारणातून झाला वाद.

  • 18 Apr 2024 08:54 AM (IST)

    राज्यातील पहिली चारा छावणी सुरू

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राज्यातील पहिली चारा छावणी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी गावात पहिली चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी ही चारा छावणी सुरू केली आहे. चारा छावणी सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 500 जनावरे छावणीत दाखल झाले. 10 हजार जनावरांची क्षमता चारा छावणीत आहे.

  • 18 Apr 2024 08:41 AM (IST)

    अजित पवार, सुनेत्रा पवार दगडूशेठ गणपतीच्या चरणी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याकडून पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाला आरती करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी गणपतीची आरती करत गणपतीबाप्पाला साकडे घातले.

  • 18 Apr 2024 08:22 AM (IST)

    चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी जादा बसेस

    साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात होणार या यात्रेत नाशिक जिल्ह्यासह धुळे नंदुरबार सह उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक एक येत असतात. गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मालेगाव बस आगारातून दहा विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दहा वर्षे सोडण्यात आले असून भाविकांची गर्दी लक्षात घेता अजूनही बस संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती व व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे आहे.

  • 18 Apr 2024 08:05 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

    पुणे जिल्ह्याला अवकाळी वादळी पावसाने झोडपले आहे. या पावसाचा मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका सर्वात जास्त बसला आहे.वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. मुळशीच्या कोळवण येथील अनेक पॉली हाऊसचे वादळी पावसाने प्लास्टिक अच्छादन फाटले आहे. शेतकऱ्यांनी त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Published On - Apr 18,2024 8:03 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.