Maharashtra News LIVE : देशातील 89 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान

| Updated on: Apr 26, 2024 | 12:19 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 25 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News LIVE :  देशातील 89 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर येथील शरद पवार यांच्या धाराशिव येथील प्रचार सभेला गैरहजर. चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात भाजपात प्रवेश केला. मधुकरराव चव्हाण गैरहजर असल्याने पुन्हा चर्चेला उधाण. परभणीत मध्यरात्री हाय वोल्टेज ड्रामा घडला. महादेव जानकर गाडीमध्ये नसताना, त्यांची चार चाकी अडवत खासदार संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केल्याचा जानकारांचा आरोप आहे. मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान नवा मोंढा पोलीस ठाण्यात महादेव जानकर यांनी तक्रार नोंदवली. रात्री उशिरा महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. 12 ते 16 युवकांनी गोंधळ घातल्याचा जानकरांचा आरोप आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Apr 2024 04:52 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाने वकिलांसाठी व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा सुरू

    सर्वोच्च न्यायालयाने वकिलांसाठी व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा सुरू केली आहे. व्हॉट्सॲपवर फाइल करणे, सूची करणे आणि कारण सूची त्वरित उपलब्ध होईल.

  • 25 Apr 2024 04:35 PM (IST)

    काँग्रेससाठी कुटुंबच सर्वस्व आहे: पंतप्रधान मोदी

    मध्य प्रदेशातील मुरैना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजपसाठी देशापेक्षा मोठे काहीही नाही. पण, काँग्रेससाठी त्यांचे कुटुंबच सर्वस्व आहे.

  • 25 Apr 2024 04:25 PM (IST)

    निवडणूक आयोगाने भाजप-काँग्रेसला नोटीस पाठवली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस पाठवली आहे. दोन्ही पक्षांकडून 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे.

  • 25 Apr 2024 04:10 PM (IST)

    तेलंगणात टीआरएस आणि काँग्रेसने भ्रष्टाचार केला – अमित शाह

    तेलंगणातील सिद्धीपेटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, येथे टीआरएस आणि काँग्रेस या दोघांनी भ्रष्टाचार केला आहे. इतक्या कमी वेळात काँग्रेसने तेलंगणाला दिल्लीचे एटीएम बनवले आहे. टीआरएस आणि काँग्रेस दोन्ही एकत्र आहेत.

  • 25 Apr 2024 12:58 PM (IST)

    अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी मुंबईकडे जाणार

    शिंदे- फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांना नाशिकच्या जागे संदर्भात भेटणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा

  • 25 Apr 2024 12:49 PM (IST)

    परभणी लोकसभेच्या मतदानासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण

    निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे, जिल्ह्यात 21 लाख 23 हजार मतदार 2290 केंद्रावरती उद्या करणार मतदान. जिल्हाभरात 12600 कर्मचारी नियुक्त, पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात,

  • 25 Apr 2024 12:25 PM (IST)

    काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या समर्थकांचा मेळावा

    काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या समर्थकांचा शिंदखेडा येथे मेळावा. शामसनेर यांना काँग्रेसने धुळे लोकसभेची उमेदवारी नाकारली. मोठ्या संख्येने शिंदखेडा तालुक्यातील समर्थक उपस्थित

  • 25 Apr 2024 12:12 PM (IST)

    माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला

    जत तालुक्यातील जिरग्याळ येथे तीन अज्ञातांकडून करण्यात आली दगडफेक. काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौऱ्यादरम्यान सायंकाळी काल जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर घडला प्रकार.

  • 25 Apr 2024 11:50 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत अमित शहांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

    शरद पवार यांनी ते कृषीमंत्री असताना झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल माफी मागावी, असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. अमित शहांनी आधी हे सांगावं की गेल्या दहा वर्षांत त्यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी काय काम केलं?”

  • 25 Apr 2024 11:50 AM (IST)

    सुप्रीम कोर्टातील वकीलांसाठी आनंदाची बातमी

    नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टातील वकीलांसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे केस संदर्भातील माहिती वकिलांना व्हॉटसअप मेसेज द्वारे पाठवली जाणार आहे. प्रकाराची तारीख, मेंशनिग या गोष्टी व्हॉटसअप वर पाठवल्या जाणार आहेत. CJI धनंजय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली.

  • 25 Apr 2024 11:40 AM (IST)

    अँटॉप हिल परिसरात 5 आणि 7 वर्षे वयोगटातील दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह कारमध्ये सापडले

    मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 5 आणि 7 वर्षे वयोगटातील दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह कारमध्ये सापडले आहेत. मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. मुलांनी खेळत असताना स्वत:ला कारमध्ये कोंडून घेतलं आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

  • 25 Apr 2024 11:30 AM (IST)

    मोदींच्या वक्तव्यावर काय म्हणाले शरद पवार?

    “लोकांची अपेक्षा आहे की देशाचा पंतप्रधान हा जाती-धर्माची भाषा वगैरे विचारात न घेता सर्वांसाठी असावा. एका भाषणात त्यांनी देशातील अल्पसंख्यांकांबद्दल वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही लोकांमध्ये त्यांचा अँगल घेऊ आणि हे समजवण्याचा प्रयत्न करू की त्यांच्या दृष्टिकोनामुळे देशाच्या एकात्मतेला धक्का पोहोचू शकतो आणि त्याचा निषेध केला पाहिजे”, असं मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले.

  • 25 Apr 2024 11:20 AM (IST)

    पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांत पुढील वर्षापासून बदल

    शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी, पहिली आणि दुसरी या वर्गांसाठी प्रस्तावित नवीन अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पहिली-दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्याची सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केली आहे.

  • 25 Apr 2024 11:10 AM (IST)

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक

    यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज एमएमआरडीए हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचं काम हाती घेणार आहे. त्यासाठी आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद असणार आहे.

  • 25 Apr 2024 11:00 AM (IST)

    महादेव जानकारांवर गंभीर आरोप

    परभणी लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांच्याकडून मोठ्याप्रमाणावर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप माहाविकास आघाडीचे परभणी उमेदवार संजय जाधव यांनी केला आहे.महादेव जानकर यांची काल मध्यरात्री गाडी अडवण्याची घटना घडली होती, त्या घटनेशी माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा काडीमात्र संबंध नाही, खासदार संजय जाधव यांचा खुलासा पण त्यांनी केला आहे.

  • 25 Apr 2024 10:55 AM (IST)

    शरद पवार यांची पंतप्रधानांवर टीका

    देशाचे पंतप्रधान हे एका जातीचे, धर्माचे नसतात, जातीय ऐक्याला तडा जाण्याचा प्रयत्न होतोय अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधानांवर केली. याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशात सर्वात जास्त भष्ट्राचार इलेट्रोल बॉण्डमध्ये दिसून येतोय, असे ते म्हणाले.

  • 25 Apr 2024 10:42 AM (IST)

    मंगळसूत्रावरुन राऊत यांनी मोदींना डिवचले

    सौभाग्याचं लेणं हे लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जो माणूस घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नही त्यांनी इतरांची उठाठेव करु नये, अशी जहरी टीका त्यांनी केली. 4 जूननंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे गट पूर्णपणे संपलेला असेल, त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही, अजित पवार आणि एकनाथ शिंदे संपलेले असतील, असे ते म्हणाले.

  • 25 Apr 2024 10:32 AM (IST)

    पुण्यात महायुतीच शक्तिप्रदर्शन

    मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात महायुतीची प्रचार रॅली होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे उदय सामंत हे रॅलीला उपस्थित राहणार आहेत.

  • 25 Apr 2024 10:21 AM (IST)

    राहुल गांधी यांचा दोन्ही ठिकाणी विजय

    परंपरागत मतदार संघ आहे. प्रामाणिक नेता म्हणून जनता राहुल गांधी यांच्याकडे बघत आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवतील आणि ते विजयी होतील असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ज्याचा जाहीरनाम्यात कुठलाही उल्लेख नसताना मंगळसूत्रापर्यंत पातळी घसरली याचा अर्थ नरेंद्र मोदी यांचा पतन ठरलं आहे. भाजपला पुन्हा या देशाच्या गादीवर बसू द्यायचं नाही आता जनतेने ठरवल्याची टीका त्यांनी केली,

  • 25 Apr 2024 10:10 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर

    जळगावात देवेंद्र फडणवीस यांच्या रोडशोची भाजपच्या वतीने जयत तयारी सुरू आहे. रावेर लोकसभेचे उमेदवार रक्षा खडसे व जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.

  • 25 Apr 2024 10:00 AM (IST)

    मतदानाचा टक्का वाढणार का? उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान

    देशातील 13 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 89 जागांवर उद्या मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात केरळ राज्यातील सर्वच 20 लोकसभा जागांवर मतदान होईल. कर्नाटकमधील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, पश्चिम बंगालमधील 3 तर त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

  • 25 Apr 2024 09:59 AM (IST)

    पुण्यात शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जाहीरमाना प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असं नाव देण्यात आलं आहे.

  • 25 Apr 2024 09:47 AM (IST)

    नारायण राणे यांच्यासाठी अमित शहा यांची रत्नागिरीत सभा

    नारायण राणे यांच्यासाठी अमित शहा यांची रत्नागिरीत सभा. येत्या ३ मे रोजी अमित शाहा रत्नागिरीत सभा होणार.  रत्नागिरीची सभा झाल्यानंतर ३ मे रोजी सांगली लोकसभा येथेही घेणार सभा.

  • 25 Apr 2024 09:31 AM (IST)

    महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज दाखल करणार उमेदवारी अर्ज 

    महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुरलीधर मोहोळ यांनी आई-वडिलांचे आशीर्वादही घेतले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी प्रकाश जावडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

  • 25 Apr 2024 09:28 AM (IST)

     बेस्ट कडून ७०० कोटींच्या एसी डबल डेकर बसचं कॉन्ट्रॅक्ट रद्द 

    बेस्ट कडून ७०० कोटींच्या एसी डबल डेकर बसचं कॉन्ट्रॅक्ट रद्द. वर्षभरात एकही डबल डेकर बस तयार न केल्याने हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं.  बेस्टकडे सध्या 3040 बसेस आहेत, आणखी 3000 बसेसची बेस्टला गरज आहे. पण बसेस नसल्याने प्रवाश्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत

  • 25 Apr 2024 09:15 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा थोड्याच वेळात होणार प्रकाशित

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा थोड्याच वेळात होणार प्रकाशित. आज पक्षाचं प्रचारगीतही लाँच करण्यात येणार आहे. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार कार्यक्रम.

  • 25 Apr 2024 09:05 AM (IST)

    भाजपच्या रक्षा खडसे ह्या एकनाथ खडसेंच्या भेटीला, घेतला आशीर्वाद

    भाजपच्या रक्षा खडसे ह्या एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी आल्या. रावेर भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.

  • 25 Apr 2024 08:58 AM (IST)

    Maharashtra News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे. 26 मे ला होणार होती सुनावणी. मात्र आता 14 मे ही टेंटेटिव तारीख देण्यात आली आहे. 14 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरणाची सुनावणी 14 मे ला होण्याची शक्यता.

  • 25 Apr 2024 08:45 AM (IST)

    Maharashtra News : सायन कोळीवाडा परिसरात मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट

    सायन कोळीवाडा परिसरात मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर स्फोट झाल्याची माहिती. सायन कोळीवाडामधील जय महाराष्ट्र नगर परिसरातील रात्री बाराच्या सुमाराची घटना. एकाचा मृत्यू तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश.

  • 25 Apr 2024 08:15 AM (IST)

    Maharashtra News : धाराशिवमध्ये कोणी घेतली शरद पवार यांची गुप्तभेट?

    धाराशिव येथील साखर कारखानदार अरविंद गोरे यांनी घेतली शरद पवार यांची तुळजापूर येथे भेट. दोघांमध्ये गुप्त चर्चा. शरद पवार यांनी धाराशिव जिल्ह्यात सुरु केली जुन्या सहकाऱ्यांची जमवा जमव. गोरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे चेअरमन.

  • 25 Apr 2024 08:12 AM (IST)

    Maharashtra News : महाराष्ट्रातल्या ‘या’ तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा

    27 ते 29 एप्रिल या तीन दिवसात तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये चक्रीय वात विरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 एप्रिल या दोन दिवसात तापमानात वाढ होण्याची हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी माहिती दिली आहे. मुंबईसाठी दुसऱ्यांदा हा इशारा देण्यात आला असून याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता. मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा दिला आहे.

Published On - Apr 25,2024 8:10 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.