“बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांचा मी मान सन्मान करणारच. ते माझे शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली. दरम्यान काँग्रेस नेते राहूल गांधी यांची आज पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघासाठी राहुल गांधी घेणार सभा. नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर ही सभा होत आहे. आजच्या सभेत राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे. माजी काँग्रेस नेते संजय निरुपम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
एका अज्ञात इसमाने मुलुंड-नवी मुंबई बसमध्ये बॉम्ब असल्याचा नवी मुंबई कंट्रोल रूमला फोन करुन सांगितलं. यानंतर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. पोलिसांना मुलुंडवरून बस नवी मुंबईत येत असताना फोन आला. पोलिसांनी बसचा पाठलाग करून नेरूळमध्ये बस थांबवून बसची तपासणी सुरू केली आहे. प्रवाशांना बाहेर काढून बसची पोलीस तपासणी करत आहेत. बस प्रवाशांनी भरलेली होती. फोन कुणी आणि कुठून केला याचाही तपास सुरू आहे.
रायबरेली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी अर्ज दाखल केला. यानंतर ते म्हणाले की, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रायबरेलीची फसवणूक केली. 10 वर्षे रायबरेलीच्या जनतेला ना सोनिया गांधी, ना प्रियंका गांधी, ना किशोरीलाल शर्मा भेटले. आता रायबरेली त्यांना चांगलाच धडा शिकवेल.
गुरुग्राम (हरयाणा) मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांनी काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुडा यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
रायबरेलीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “प्रथम त्यांनी अमेठी सोडली आणि वायनाडला पोहोचलो, आता मला वायनाडच्या पराभवाची भीती वाटत आहे आणि अमेठीमध्ये पराभव दिसत आहे, म्हणून आता ते रायबरेलीत गेले. पण राहुल गांधी तिथेही पराभूत होतील. लोक त्यांना रायबरेलीतूनही हाकलण्यासाठी काम करतील आणि पुन्हा एकदा राहुल गांधींचा पराभव होईल.”
जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फर्निचर कारखान्यात आग लागली. सहा तासांत आग आटोक्यात आणण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि टँकरने आग आटोक्यात आणल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतिगीर महाराज निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी शिवसेनेचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. खरे हिंदुत्व कोणाकडे हे जनतेला माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला.
धाराशीवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा दिलासा मिळाला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी त्यांना क्लीन चीट दिली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार यांच्या रॅलीत पैसे वाटप केल्याचा कथित व्हिडिओ समोर आला होता. उबाठा गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तक्रार दाखल केली होती.
मी नाते जोडते.. मलाही अरेला कारे करायला येतं, उत्तर देता येतं , पण .. रोहितला त्याच्या आईची पात्रता काढली म्हणून राग आला, कुणालाही काहीही बोला पण आईविषयी काहीही बोलायचं नाही, ते सहन केलं जाणारं नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
गिरीश महाजन हे नाराज कोल्हे कुटुंबाच्या भेटीला आले आहेत. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मनधरणीसाठी गिरीश महाजन यांनी कोपरगाव येथील कोल्हेंच्या निवासस्थानी आले आहेत. माजी आ. स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे यांची बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे समजते.
पन्नास कोटी मालमत्ता असलेल्या 17 लाख कुटुंबीयांनी भारतीय नागरिकत्व सोडून परदेशी गेले. उद्धव ठाकरेंनी हा प्रश्न उपस्थित का केला नाही. हिंदूंचे प्रतिनिधी म्हणता, हिंदूंचे संरक्षण करणार म्हणतात, मग यावर का बोलले नाही, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. ठाकरेंचा पुन्हा बीजेपी बरोबर घरोबा करण्याचे प्रयत्न चालले आहे हा संशय व्यक्त केला जातोय, असे आंबेडकर म्हणाले.
मी खूप उत्साही आहे, चांगली भावना आहे. 20 वर्षानंतर स्वगृही परततोय. आता शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची आहे, महाराष्ट्राची सेवा करायची आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
ग्रामंचायत इमारती पासून तर बीड जिल्हा परिषद इमारती पर्यंत चा मी विकास केला आहे. मी जाती पातीचे राजकारण केले असते तर मी इथपर्यंत पोहचले नसते असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
शरद पवारांनी सुनेबद्दल बोलणं हे काही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला प्रचार नाहीय. एकीकडे शरद पवारांसारखे जेष्ठ राजकीय नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही, शिवाय संजय राऊतांनी अमरावतीच्या उमेदवाराबद्दल बोलणं यावरून प्रचाराची पातळी समजते, असे विनोद तावडे यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पक्षप्रवेश. संजय निरुपम आपल्या निवासस्थानाहून बोरिवली वेस्ट येथील अण्णाभाऊ साठे मैदान येथे निघाले.
चोपडा येथील सकाळी साडेदहा वाजेची सभा आता दुपारी दीड वाजता सुरू होणार. भुसावळ आणि पुढील सभांचे ही वेळापत्रक कोलमडले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड मतदार संघामध्ये विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे या दोघा बहिण भावाची प्रमुख उपस्थिती आहे. योगेश क्षीरसागर यांनी विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन केलेल आहे.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात पवार कुटुंबातील महिला एकवटल्या आहेत. प्रतिभा पवार यांच्यासह शर्मिला पवार, सुनंदा पवार, रेवती सुळे या महिला मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्या आहेत. याशिवाय रोहित पवार, सक्षणा सलगर, विद्या चव्हाण यांचीही महिला मेळाव्याला उपस्थिती आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार यामिनी जाधव यांच्या नामांकन रॅलीला सुरूवात झाली आहे. यामिनी जाधव यांच्या नामांकन रॅलीमध्ये भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा उपस्थित आहेत. मुंबईच्या जीपीओ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही नामांकन रॅली काढण्यात आली.
रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी हे घाबरून जाणाऱ्यांपैकी नाहीत. ते वायनाडमधून लढतात आणि जिंकतात. गांधी घराण्यातील कोणीतरी उत्तर प्रदेशातून लढावं अशी इच्छा होती, मग ते अमेठी असो वा रायबरेली. सोनिया गांधी यांनी राहुल गांधींना रायबरेलीतून लढण्याची सूचना केली आणि इंदिरा गांधींच्या काळापासून नेहरू परिवार रायबरेलीतून लढत राहिला. अमेठी कोणीही जिंकू शकतो.”
शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालं. यामध्ये हेलिकॉप्टरचा पायलट किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या अपघातानंतर सुषमा अंधारे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्या हेलिकॉप्टरमध्ये चढल्या नव्हत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
“मोदी किती खोटारडे आहेत हे लपलेलं नाही. त्यांच्यासारखा नटसम्राट कोणी नाही. ते केव्हा काय बोलतील सांगता येत नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. सत्तेत येणार नसल्याची मोदींना भीत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार जळगाव दौऱ्यावर… दौऱ्या दरम्यान भुसावळ मुक्ताईनगर चोपडा या ठिकाणी सभा मेळावे पार पडणार… लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर, शरद पवार, जयंत पाटील यांच्या वेगवेगळ्या सभा होणार… सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे… महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी सभेचा आढावा घेतला आहे…
अनेक दिवसांपासून येथे काम करीत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर भिगवण येथील बस स्थानकाचे काम करणार आहे. मुळशीचे पाणी पुण्याला आणायचे आहे. सोलर ऊर्जेवर अनेक योजना चालविणार आहोत… असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करत होते, ही चांगली गोष्ट आहे. माणसं जपायला शिकलं पाहिजे… विचारपूस करून कौटुंबिक जिव्हाळा मोदींनी दाखवला… संजय राऊत यांच्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर…
धुळे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस… वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान भरणार आज अर्ज… मोठा शक्ती प्रदर्शन करत अर्ज करणार दाखल…
सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकारणी काँग्रेस समर्थकावर गुन्हा दाखल… काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…. उमेदवार राम सातपुते आणि भाजप विरोधात मिम्स वायरल करून जनमाणसात प्रतिमा मलीन केल्याने गुन्हा दाखल… भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
शिंदे गटाचे ३ तर भाजपचे २ उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नरेश म्हस्के हे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. तसेच रवींद्र वायकर आणि यामिनी जाधवही अर्ज भरणार.
तर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कपिल पाटील आणि उज्वल निकम हे अर्ज भरणार आहेत.
विठ्ठल सहकारी कारखान्याचे अभिजित पाटील यांना दिलासा. १४१ कोटी रुपये थकवल्याप्रकरणी गोडाऊनला सील लावण्यात आले होते, ते सील आज काढण्यात येणार आहे
नरेंद्र मोदी स्वत: अडचणीत आहेत. नरेंद्र मोदी यांचं प्रेम खोटं, नक्राश्रू आहेत. त्यांच एवढं प्रेम असतं तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली नसती, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या उमेदवार आहेत. येथून वंचितकडून जामील अहमद जुबेर खान यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, वंचिकडून हा उमेदवार बदलण्यात आला आहे. आता डॉ. मोहम्मद शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रवींद्र वायकर जोगेश्वरीच्या इच्छापूर्ती गणेश मंदिरात पूजा करणार आहेत.
बच्चू कडू यांच्या प्रहार शिक्षक संघटनेचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांना पाठिब्यांच पत्र दिले आहे. बच्चू कडू यांच्या संघटनेने महायुतीला हा धक्का दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम आज शुक्रवार ३ मे, २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. संजय निरुपम गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते.
नाराज गणेश नाईकांना आवरण्यासाठी फडणवीस आणि मुख्यमंत्री यांच्यात काल रात्री फोनवर चर्चा. गणेश नाईक यांना पक्षश्रेष्ठींनी तंबी दिल्याची माहीती. दोन दिवसांत फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आणि नाईक महायुतीच्या विजयासाठी कामाला लागणार. प्रदेश कार्यालयातील राजीनाम्याचे पडसाद. बावनकुळेंकडूनही गणेश नाईक यांना तंबी. आज नाईक कुटुंब म्हस्केंचा अर्ज भरण्यासाठी येणार असल्याची माहीती. काल नाराजांच्या बैठका घेणारे आमदार संजय केळकरच नरेश म्हस्केंच्या उमेदवारी अर्जावरील प्रस्तावक असतील अशी माहीती. भाजपचं नाराजीनाट्य ठरलं पेल्यातलं वादळ. आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बैठका.
“संविधान संपवण्याचा भाजपचा गेम प्लॅन आहे. मात्र आम्ही तो संपवू देणार नाही. संविधानाबाबतचे विधान अंगलट आलेले आहे. अर्थमंत्र्यांचे पती म्हणाले की, पुन्हा हे सरकार सत्तेवर आले, तर संविधान बदलणार आहोत. मोदींचा गेम प्लॅन सगळ्यांना माहिती आहे, ते 400 नव्हे, 300 नव्हे आणि 200 च्या वर ते जाणार नाहीत” वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगच्या नोटीसा. खर्च कमी दाखवला. खर्चात तफावत आढळून आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे. सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या तपासणीत निवडणूक खर्चात 9 लाख 10 हजाराची तफावत आढळून आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १ लाख ३ हजार रुपयाची तफावत आढळली. 48 तासात खुलासा करावा, अन्यथा उमेदवारांच्या खर्चात तफावत समाविष्ट केली जाईल. नोटीसीवर आक्षेप असल्यास जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.
लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस, मागावला खुलासा. शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केली महायुती राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची तक्रार. ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना 2 व्हिडिओ व्हाट्स अप वर पाठवत केली तक्रार. लोकसभा निवडणुकीत पैसे वाटप करीत असल्याचा एक व्हिडिओ देत केली अर्चना पाटील यांची तक्रार.