Maharashtra Political News live : सर्वात मोठी बातमी, मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पहिला निर्णय काय?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्र घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात 72 जणांचा समावेश करण्यात आला. त्यात 30 कॅबिनेट मंत्री आहेत. मोदी 3.0 च्या पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. आता शपथविधीनंतर खातेवाटपाकडे लक्ष लागले आहे. खातेवाटप आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबईत मान्सून चांगलाच स्थिरावला आहे. मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरु आहे. आज आणि उद्या पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. टी 20 विश्वचषकात पाकिस्तानवर भारताने विजय मिळवल्यानंतर त्याचा जल्लोष देशांत सुरु आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी द्या, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत ठराव
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी द्यावी, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत करण्यात आला. कार्यकारिणीचा आज झालेला ठराव प्रदेशकडे पाठवला जाणार आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
-
मोदी 3.0 सरकारचा पहिला निर्णय, पीएम आवास योजना अंतर्गत 3 कोटी घरे बांधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटचा काल शपथविधी पार पडल्यानंतर आज या नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत पीएम आवास योजने अंतर्गत अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला. पीएम आवास योजना अंतर्गत 3 कोटी नागरिकांना घरे बांधून देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत झाला.
-
-
12 जूनला आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये शपथविधी
आंध्र प्रदेश आणि ओडिशामधील नव्या सरकारचा शपथविधी 12 जून रोजी होणार आहे. चंद्राबाबू नायडू बुधवारी सकाळी 11 वाजता आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर ओडिशामध्ये संध्याकाळी 4.45 वाजता शपथविधी होणार आहे. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या दोन्ही शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.
-
सोनिया गांधी यांनी शेख हसीना यांची भेट घेतली
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची दिल्लीत भेट घेतली आहे. रविवारी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हसीना हजर होत्या.
-
शिंदे आणि अजित गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, उद्धव गटाचा दावा
शिंदे गटाचे 20 हून अधिक आमदार आणि 3 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या (यूबीटी) गटाचे आनंद दुबे यांनी केला आहे. ते कधीही येऊ शकतात. त्याचबरोबर जे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत ते शरद पवारांच्या संपर्कात आहेत. त्यांची 30 हून अधिक संख्या आहेत.
-
-
NEET प्रवेश परीक्षेविरोधात SC मध्ये आणखी एक याचिका
NEET प्रवेश परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील रहिवासी अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि इतरांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत 5 मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
-
एनडीए सरकारमध्ये नाराजीनाट्य सुरु, शिंदे गटानंतर अजित पवार गटाकडून ही खदखद व्यक्त
एनडीए सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानंतर आता अजित पवार गटाने ही अन्याय झाल्याची खदखद बोलून दाखवली आहे. सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटायच्या आतच मंत्री पदावरून नाराजीनाट्य सुरू झालेलं आहे. अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी खदखद व्यक्त केली आहे. इतर राज्यातील घटक पक्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील घटक पक्षावर अन्याय झालाय, असं म्हणत बनसोडेंनी नाराजी व्यक्त केली.
-
कल्याणी नगर अपघात प्रकरण – आरोपींना आज न्यायालयात हजर करणार
कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताताचे सॅम्पल बदल्या प्रकरणात दोघांना करण्यात आली होती अटक. थोड्याच वेळात पुणे पोलीस दोघांना न्यायालयात करणार हजर आहेत.
-
उजनी धरणाच्या पाणीपातळीत 3 टक्क्यांनी वाढ
उजनी धरणाच्या पाणीपातळीत 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आजची पाणीपातळी – 57.31 टक्के आहे. उजनी जलाशयाच्या पाणी पातळीत 3 टक्क्यांनी वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात अर्धा टीएमसी पाणी पातळीत वाढ झाली आहे.
-
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा ११ जूनपासून सुरु
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसरा बोगदा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पाहणीनंतर होणार खुला. या बोगद्याचे विहंगम दृश्य पाहा. त्यानंतर, मंगळवार दिनांक ११ जून २०२४ पासून सकाळी ७ ते रात्री ११ (एकूण १६ तास) या वेळेत वाहतुकीसाठी मार्ग उपलब्ध होणार.
🌉धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसरा बोगदा आज मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व विविध मान्यवरांच्या पाहणीनंतर होणार खुला. या बोगद्याचे विहंगम दृश्य
🚗तद्नंतर, मंगळवार दिनांक ११ जून २०२४ पासून सकाळी ७ ते रात्री ११ (एकूण १६ तास) या… pic.twitter.com/wAL2ndemSY
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 10, 2024
-
कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आज खुला होणार
कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचे आजपासून उद्घाटन होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केली पाहणी…
-
उद्धव ठाकरे यांनी आमदार-खासदारांची बोलावली बैठक
उद्धव ठाकरे यांनी सेना भवन येथे आज पक्षाच्या आमदार-खासदारांची तसंच जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे.
-
नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळले
नाशिकच्या वालदेवी नदीत दोन किलोमीटरच्या परिसरात लाखो मासे मृतावस्थेत आढळले आहेत. प्रदुषित पाणी सोडल्याने हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
-
कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांना डिवचणारा बॅनर
कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डीवचणारा बॅनर चर्चेचा ठरला आहे. या बॅनरवर सतेज पाटील यांचा फोटो असून ‘आता कशी वाजवली घंटी’ असा उल्लेख आहे.
-
बार्शी तालुक्यात मराठा समाजाचे रस्तारोको आंदोलन
ओबीसी कोट्यातून कुणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी बार्शी तालुक्यात मराठा समाजाने रस्तारोको आंदोलन केले आहे
-
संतोष बांगर यांनी भरवला जनता दरबार
आमदार संतोष बांगर यांनी जनता दरबार भरवला आहे. जनता दरबारात शासनाचे कर्मचारी अधिकारी बोलावून मागील त्याला विहीर, मागील त्याला जनावरांचा गोठा उपक्रम राबवला आहे. कळमनुरी शहरातील एका खाजगी मंगल कार्यालयात भरवला जनता दरबार भरवला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.
-
नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यात ABVP आक्रमक
नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यात ABVP आक्रमक झाली आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन करण्यात येत आहे. नीटच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची निदर्शने सुरु आहेत. निकालाची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
-
भास्कर भगरे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदर भास्कर भगरे यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आहे. काल दिंडीरी लोकसभा मतदारसंघातील काही भागात जोरदार पाऊस झाल्याने नुकसान झालं आहे. तिसगाव आणि उमराने परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत कुटुंबातील नातेवाईकांचं सांत्वन केलं. द्राक्ष पीक आणि कांदा शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे
-
पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जालान नगर परिसरात शहराला पाणीपुरवठा करणारे चौदाशे मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे रस्ता खचलाय. पाईपलाईनचे वेगाने येणारे पाणी अंडरग्राउंडमध्ये असलेल्या दुकानांमध्ये घुसलो आहे. त्यामुळे पुस्तकांचा आणि कपड्याच्या दुकानाचे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे.
-
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग ॲक्शन मोडवर
नाशिक खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश. काळाबाजार करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार
-
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा- कल्याण काळे
निवडून आल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घ्यावी या उद्देशाने आलो. माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचा आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला माझा पाठिंबा राहिल जरांगे पाटील यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार, असे कल्याण काळे खासदार जालना यांनी म्हटले आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो लिटर पाणी वाया
शहराला पाणीपुरवठा करणारी 1400 मिमीची जलवाहिनी पुन्हा फुटली; लाखो लिटर पाणी वाया. जलवाहिनी फुटल्यामुळे अख्खा डांबरी रस्ता खचला; रस्ता खचल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाखाली जलवाहिनी फुटल्याची घटना
-
सुप्रिया सुळे यांची सरकारवर जोरदार टीका
पुण्याची आण बाण शान या सरकारमुळे गेली आहे. हे यश फक्त गुलालाचे नाही जबाबदारीचे आहे. आपण पूर्ण ताकतीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
-
Live Update | पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान, बीडमध्ये तणाव
पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान… आज वडवणी शहर बंदची हाक… शिरूर कासार, परळीनंतर आज वडवणी बंद… आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीडमध्ये तणाव… कारवाईच्या मागणीसाठी पंकजा समर्थक आक्रमक… पंकजा मुंडे समर्थक उतरले रस्त्यावर… ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा… मोर्चात हजारो तरुण उपस्थित
-
Live Update | सत्तेचे विकेंद्रीकरण होत आहे – शरद पवार
गेल्या 25 वर्षात अनेक कार्यक्रम आपण हाती घेतले… आज देश एक वेगळ्या स्थितीत सुरू आहे… देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे… मात्र संसदेतील संख्या त्यांची कमी झाली… आम्ही सांगेल तेच धोरण अशी परिस्थिती होती…. सत्तेचे विकेंद्रीकरण होत आहे… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे…
-
Live Update | मराठा आरक्षणाविरोधात बोलाल तर काँग्रेसच्या जागा पाडेल – जरांगे पाटील
मराठा आरक्षणाविरोधात बोलाल तर काँग्रेसच्या जागा पाडेल… वडेट्टीवारांना पाडेन, काँग्रेसच्या जागा पाडायला लावेल… मनोज जरांगे याचा वडेट्टीवारांसह काँग्रेसला इशारा…
-
Live Update | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागली गळती…..
रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरात गळू लागले पाणी… विठ्ठल मंदिरातील नैवेद्य गेट रुक्मिणी सभागृहाच्या स्लॅबमधून पावसाचे झिरपू लागले पाणी… विठ्ठल मंदिरात दीडशे कोटीच्या विकास आराखड्याची कामे सुरू असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले… पावसाचे पाणी मंदिरात गळत असल्याने भाविकांची नाराजी
-
Live Update | मोदींच्या मंत्रिमंडळातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? संजय राऊत
मोदींच्या मंत्रिमंडळातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? असा प्रश्न संजय राऊत यांनी व्यक्त केला… गोयल हे शेअर बाजार, व्यापाऱ्यांचे मंत्री… शिंदे गटाच्या तोंडावर एक राज्यामंत्रीपद फेकून मारलं… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Live Update | शिंदे गट, अजित पवार गट मोदींचे गुलाम – संजय राऊत
शिंदे गट, अजित पवार गट मोदींचे गुलाम आहेत. केंद्रात मोदींचं नाही तर, एमडीएचं सरकार आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घ्यायची होती. एक विक्रम त्यांना प्रस्थापित करायचा होता. तसंच झालं…असं संजय राऊत म्हणाले…
-
Maharashtra News : खाजगी ट्रॅव्हल्स बसच नियंत्रण सुटल्याने अपघात
खाजगी ट्रॅव्हल्स बसच नियंत्रण सुटल्याने अपघात. अपघातात एका प्रवाशाचा मृत्य तर 11 प्रवासी जखमी. एसटी बस गोंदिया वरून कोहमारा तर खाजगी बस हैदराबादवरून लांजीकडे जात होती. गोंदिया जवळील गंनखैरा मील जवळ घडली घटना.
-
Maharashtra News : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागली गळती
रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरात गळू लागले पाणी. विठ्ठल मंदिरातील नैवेद्य गेट रुक्मिणी सभागृहाच्या स्लॅबमधून पावसाचे झिरपू लागले पाणी. विठ्ठल मंदिरात दीडशे कोटीच्या विकास आराखड्याची कामे सुरू असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पावसाचे पाणी मंदिरात गळत असल्याने भाविकातून नाराजी.
-
Maharashtra News : पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीच सत्र सुरूच
पुण्यातील हडपसर परिसरातील रामटेकडी परिसरात काल रात्री एकच्या सुमारास सात ते आठ मुलांच्या टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये रस्त्याच्या कडेला लागलेल्या दहा ते बारा गाड्यांच नुकसान झालं. ही घटना वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या परिसरात सध्या स्थानिक लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे. या संदर्भात स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
-
Maharashtra News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाण्यासाठी आज दुपारपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटं पुरेसे ठरणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी जलद गतीने प्रवास करण्यासाठी आनंदाची बातमी आहे .
-
Marathi News : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे आता शेतकरी वर्ग सुखावला असून शेत कामाला सुरुवात केलीय. पावसामुळे आता शेतीचे कामाला गतीसुद्धा येणारा आहे .
-
Marathi News : कांद्याच्या दरात वाढ
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथील आठवडे बाजारात कांदा २५ रुपये किलो दराने विकला. पण आता कांद्याने थेट ४० रुपयांवर उसळी घेतली आहे. या दरवाढीत फायदा शेतकऱ्याला की व्यापाऱ्याला, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
-
Marathi News : सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काल सायंकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा सोहळ्या दरम्यान जल्लोष करण्यात आला.
-
Marathi News : मोदी मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक
मोदी सरकार शपथ घेतल्यानंतरच अॅक्सनमोड आले आहे. नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज, सोमवारी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणार आहे. शपथविधी समारंभ पूर्ण झाल्यानंतर, पीएम मोदींनी X वर पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की, मी आणि मंत्रिमंडळातील सहकारी देशाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहोत.
Published On - Jun 10,2024 8:13 AM