Maharashtra Political News LIVE : मान्सून पूर्व पाऊसामुळे सिंधुदुर्गात वातावरणीय बदल
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शनिवारी थांबला. आता सोमवारी मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. मध्य रेल्वेचे मुंबईत सुरू असलेल्या ट्रक विस्ताराचा कामाचा परिणाम नागपूर – मुंबई धावणाऱ्या 14 रेल्वे गाड्यांवर होणार आहे. काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. नवी मुंबईत मॉरिशस देशातील नागरिकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मान्सून आज अंदमानमध्ये पोहचणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने मान्सूनची तयारी चालवली आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
नांदेडमध्ये एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली आहे. मध्यरात्री ही चोरीची घटना घडली. बारड भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे. रात्री चोरट्यांनी ही एटीएम मशिन चोरून नेली. घटनास्थळी मोठी दोरी आणि एक पोतं पोलीसांना आढळलं. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फोडलाय . त्यामुळे नेमकी चोरी झाली कशी आणि चोरटे कोण याचा तपास लावणे अवघड झाले आहे. एटीएम मशिनमध्ये रक्कम किती होती? याची अधिकृत माहिती मिळाली नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत. -
पालघरमध्ये मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात
पालघरमध्ये देखील उद्या लोकसभेचं मतदान पार पडणार आहे. यासाठी 21 लाख 48 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत . जिल्ह्यात 2270 मतदान केंद्र उभारण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून 13 हजार अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात असणार आहेत . सध्या पालघर मधील सहा विधानसभांमध्ये सहा ठिकाणी मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचारी यांना मतपेट्या आणि व्हीव्हीपॅट्सचं वाटप करण्यात येतंय. हे अधिकारी आणि कर्मचारी या मतपेट्या घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत.
-
-
शेतकऱ्यांसाठी खरीप पीक मेळाव्याचं आयोजन
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठकडून शेतकऱ्यांसाठी खरीप पीक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. सोयाबीन, तूर आणि मूग बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना ता रांगेत उभे राहावे लागले. सुविधांचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला. परभणी जिल्हासह मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांची यावेळी चांगलीच गैरसोयी झालेली पाहायला मिळाली. बियाणे विक्री आणखी दोन दिवस वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. -
आंबोली घाटात ढगांची चादर
सिंधुदुर्गात मान्सून पूर्व पाऊस कोसळत असून निसर्ग देखील आपली कुस बदलत आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळख असलेल्या आंबोली घाटात ढगांची चादर अंथरली असल्याचा भास होतोय. हे नयनरम्य दृश्य पाहून घाटातून ये जा करणारे पर्यटक, नागरिकांना भुरळ घालत आहे. आंबोली घाटातील दर ढगांनी भरून गेली असल्याचं दृश्य पाहून पर्यटक भारावून जात आहेत. जणू घाटातील दरीत ढग तरंगत असल्याचा भास होत आहे. घाटात ढगांची चादर पसरल्याची सुंदर दृश्य निसर्ग प्रेमींना निसर्गाचा अविष्कार अनुभवता येत आहे.
-
मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत भाविकांची गर्दी
वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत भाविकांनी अलोट गर्दी केली. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता जवळपास एक लाख भाविक पंढरीत दाखल असून श्री विठ्ठलाच्या मुख दर्शनाची रांग मंदिरापासून तीन किलोमीटरपर्यंत लांब गेली आहे. मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा वाळवंट ,भाविकांनी फुलून गेला आहे.
-
-
पंढरपूर- श्री विठ्ठल मंदिर परिसरात मंत्री रावसाहेब दानवे यांचा ताफा आल्याने भाविकांची नाराजी
पंढरपूर- श्री विठ्ठल मंदिर परिसरात मंत्री रावसाहेब दानवे यांचा ताफा आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. मोहिनी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात विठ्ठल दर्शनाकरता भाविकांची प्रचंड गर्दी आहे. गर्दीत मंत्र्यांच्या गाड्या आल्याने भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. रावसाहेब दानवेंसोबत सेल्फी घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली. परिसरात मंत्री दानवे यांच्या वाहनांमुळे भाविकांना मोठी अडचण झाली.
-
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही. भाजप मुख्यालय परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल दुपारी बारा वाजता आमदारांसह भाजप मुख्यालयाकडे जाणार आहेत. आप पक्षाच्या कार्यालयात केजरीवाल यांचं भाषण होणार. भाषणानंतर केजरीवाल भाजप मुख्यालयाकडे जाणार आहेत.
-
पुण्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव इथं पहाटेच्या सुमारास गॅस कंटेनरचा भीषण स्फोट
पुण्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव इथं पहाटेच्या सुमारास गॅस कंटेनरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये परिसरात असलेल्या एका हॉटेलसह सुमारे 30 ते 40 घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांच्या भिंतींना तडे गेले असून काही घरांचं छत तुटलं आहे. स्फोट झाल्यानंतर नागरिकांनी घरातून पळ काढला, म्हणून त्यांचा जीव वाचला आहे.
-
अनधिकृत होर्डिंग प्रकरणात आता दोन लाभार्थींची नावं पुढे आली- किरीट सोमय्या
“अनधिकृत होर्डिंग प्रकरणात आता दोन लाभार्थींची नावं पुढे आली आहेत. दोन जणांची नावं भावेश भिंडेनं घेतली आहेत. हे दोन लाभार्थी कोण आहेत ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माहीत आहे. घाटकोपर होर्डिंग/पेट्रोल पंपचे कॉन्ट्रॅक्ट ठाकरे सरकारने दिले होते. आता लक्ष विचलित करण्यासाठी मिहीर कोटेचाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे,” असं किरीट सोमय्या म्हणाले.
-
मुंबईकरांची काहिली
मुंबईमध्ये रविवार आणि सोमवारी उष्ण, तसंच दमट वातावरण असेल. त्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात प्रचंड उकाडा सोसावा लागेल. राज्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज आहे.
-
Live Update : तलावात मासे मृत झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली….
गोंदिया येथील तलावात मासे मृत झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात…..
-
Live Update | धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग…
धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग… उद्या धुळे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान… ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर थोड्याच वेळात होणार रवाना… धुळे लोकसभा साठी 1969 मतदान केंद्र… धुळे लोकसभा साठी 20 लाख 16 हजार 861 मतदार..
-
Live Update | मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता
उद्या आणि परवा दोन दिवस शहराच तापमान 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार, हवामान विभागाचा अंदाज… तर ठाणे आणि जिल्ह्यात देखील तापमानात होणार वाढ… शनिवारी मुंबईत 35 अंश सेल्सियस तापमानाची नोंद… मुंबईमध्ये सोमवारी काही ठिकाणी 38 अंशांपर्यंत तापमान चढू शकेल, तर ठाणे जिल्ह्यात 40 ते 41 अंशांपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता
-
Live Update | शनिवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू,
कारची मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक… कल्याणीनगर येथील पब मधून बाहेर पडताना 3.15 च्या सुमारास या तरुण,तरुणीचा अपघात झाला… मयत तरूण, तरुणी अपघातानंतर रस्त्यावरच पडून असल्याचा व्हीडीओ समोर… पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता रात्री उशिरापर्यंत पब्स पुन्हा सुरु असल्याचे दिसून येते.
-
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी पोलीस, राज्य राखीव दल तैनात
ठाणे जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर आहे. राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर शहरावर पाणीटंचाईचे ढग गडद
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्यांना जायकवाडी मध्ये जेमतेम ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. हर्सुल तलावाच्या पाण्यावर जुन्या शहरातील किमान १४ पेक्षा अधिक वॉर्डाची तहान भागत होती. शनिवारी तलावाने तळ गाठला. तलावात फक्त अडीच फुट पाणी आहे. २४ तासांत जेमतेम ३ एमएलडी पाणीही मिळत नाही. दोन-चार दिवसांत हे पाणीही बंद होईल. जुन्या शहरातील नागरिकांना जायकवाडीचे पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे शहराला पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवणार आहे.
-
गॅस चोरी करताना भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस कंटेनरमधून गॅस चोरी करताना भीषण स्फोट झाल्याची धक्कादाय घटना पुण्याच्या खेड तालुक्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावर घडली. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली.
-
कुलसचिव पदासाठी निवडणूक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत.विद्यापीठ प्रशासनाने अर्जाची छाननी करून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 36 उमेदवारांपैकी 7 उमेदवार अपात्र असल्याचे यादीत स्पष्ट झाले. त्यावरील आक्षेप येत्या 24 मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
-
Lok Sabha Election 2024 : नाशिक जिल्ह्यातील 40 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
नाशिकमध्ये उद्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. ईव्हीएम मशीन मतदान केंद्रांवर रवाना करण्यास सुरुवात झाली आहे. दिंडोरीत एकूण 1922 मतदान केंद्र तर नाशिक मध्ये 1910 मतदान केंद्र आहेत. नाशिक आणि दिंडोरी मिळून 40 लाख मतदार बजावणार मतदानाचा अधिकार बजावतील.
-
चांदीची मुसंडी, सोन्याचा कहर
देशाची सुवर्णपेठ जळगावमध्ये चांदीने कहर केला. सोन्याने पण नवीन विक्रम नावावर नोंदवला. खरेदीसाठी आलेल्या ग्राहाकांना नवीन भावाने घोम फोडला आहे. चांदीने 90 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर सोने सर्वकालीन उच्चांकावर पोहचले आहे.
-
पिंपरी चिंचवडमध्ये अपघातांची मालिका
पिंपरी चिंचवड शहरात बेशिस्त वाहन चालकाची संख्या वाढत आहे. नेक अपघात जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने वाहने चालवण्याने होत आहे,त्यात दुचाकी धारकांची संख्या लक्षणीय आहे. जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांत 61 चालकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 95 हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या अपघाताचे सर्वात जास्त प्रमाण खराळवाडी,पिंपरी भाजी मंडई वरील ब्रिज,चिंचवड या ठिकाणाचा समावेश या आहे.
-
Marathi News : पुणे-जळगाव विमानसेवा सुरू होणार
पुणे-जळगाव विमानसेवा सुरू लवकरच होणार आहे. जळगाव ते पुणे विमानसेवेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. आता २४ आणि २६ मे दोनच दिवस प्रायोगिक तत्त्वावर विमान सेवा चालणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यानंतरत नियमित होणार आहे. जळगावहून पुण्याला सव्वा तासात पोहोचणार आहे.
-
Marathi News : एसटी महामंडळाला दंड
पुणे महापालिकेने एसटी महामंडळाला दंड ठोठावला आहे. स्वारगेट परिसरात लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगमुळे हा दंड केला आहे. स्वारगेट बस स्थानकातील तीन अनधिकृत होर्डिंग महापालिकेने काढले आहे.
-
Marathi News : मुंबईत मतदान साहित्याचे वाटप
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे. या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्य वाटपाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मशीन वाटपाला देखील थोड्याच वेळात सुरुवात होईल. मतदानाच्या प्रक्रियेत असणारे सर्व अधिकारी केंद्रावर जमण्यास सुरुवात झाली आहे.
-
Marathi News : मुंबई-नागपूर रेल्वे गाड्यांवर परिणाम
मुंबई, नागपूर रेल्वे गाड्यांवर 17 मे ते 2 जूनपर्यंत परिणाम होणार आहे. दुरुस्तीचे काम चालणार असल्यामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. 31 मे रोजी नागपूर दुरांतो आणि 1 जूनला मुंबईवरून येणारी दुरांतो, तसेच हावडा वरून व्हाया नागपूर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या सुद्धा रद्द होणार आहे. 31 मे आणि 1 जूनला नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबई ऐवजी नाशिकपर्यंत धावणार आहे.
Published On - May 19,2024 8:14 AM