Maharashtra Political News Headlines 2 Aug 2024 : मोठी बातमी! केंद्रीय कॅबिनेटची नाशिक फाटा-खेड कॉरीडोअरला मान्यता

| Updated on: Aug 03, 2024 | 8:16 AM

TV9 Marathi, Maharashtra Political News Headlines 2 Aug 2024 : आज 2 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News Headlines 2 Aug 2024 : मोठी बातमी! केंद्रीय कॅबिनेटची नाशिक फाटा-खेड कॉरीडोअरला मान्यता

पुण्यात ठाकरे गटाचा मेळावा उद्या होणार आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला पुण्यातूनच उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागले आहे. अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातीळ कळवण-सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवला मतदार संघाचा दौरा करणार आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यात छगन भुजबळ राहणार नाही. वायनाडमध्ये आज चौथ्या दिवशीही मदत कार्य सुरूच राहणार आहे. वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यंत 292 जणांचा मृत्यू झाला आहे. चिपळूण शहरात भरवस्तीत आलेल्या मगरीचे रेस्क्यु आँपरेशन वनविभागाकडून करण्यात आले. राज्यात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाची 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Aug 2024 09:40 PM (IST)

    केंद्रीय कॅबिनेटकडून नाशिक फाटा-खेड ८ पदरी कॉरीडोअरला मान्यता

    नाशिक फाटा-खेड ८ पदरी कॉरीडोअरला केंद्रीय कॅबिनेटकडून मान्यता मिळाली आहे. केंद्रीय कॅबिनेटने ७ हजार ८२७ कोटीच्या रस्त्याला मंजुरी दिली आहे. नाशिक फाटा ते खेड सध्या असलेल्या रस्त्याला 4/6 पदरी केले जाणार आहे.

  • 02 Aug 2024 08:01 PM (IST)

    धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वाईच्या गणपती मंदिरात पाणी शिरले

    सातारा : धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वाईच्या गणपती मंदिरात पाणी शिरले आहे. मंदिरातील गणपतीच्या मूर्तीला  पाणी लागले आहे. महागणपती मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहू लागले आहे. धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात पाचही वक्र दरवाजातून 7600 क्युसेक इतका विसर्ग होत आहे.

  • 02 Aug 2024 05:52 PM (IST)

    दिल्लीतील जहांगीरपुरी भागात कारखान्याची इमारत कोसळली

    दिल्लीतील जहांगीरपुरी येथे जुन्या कारखान्याची इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असताना एकाचा मृत्यू झाला आहे. गारमेंट फॅक्टरीच्या छतावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे.

  • 02 Aug 2024 05:37 PM (IST)

    आशा किरणमधील 14 जणांचा मृत्यू ही गंभीर बाब : मंत्री अतिशी

    दिल्लीतील आशा किरण येथील 14 जणांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या महसूल मंत्री आतिशी यांचे विधान समोर आले आहे.दिल्ली सरकारचा समाज कल्याण विभाग आशा किरण चालवते. ही बाब गंभीर आहे. याप्रकरणी दंडाधिकारी चौकशी जाहीर करण्यात आली आहे. तपासात कोणताही अधिकारी निष्काळजी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

  • 02 Aug 2024 05:25 PM (IST)

    काँग्रेसच्या डीएनएमध्ये शेतकरी विरोध आहेः शिवराज सिंह चौहान

    काँग्रेसच्या डीएनएमध्ये शेतकरी विरोध असल्याचा आरोप करत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी क्षेत्राचे प्राधान्यक्रम बदलले, त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

  • 02 Aug 2024 05:10 PM (IST)

    दिल्लीतील वजिराबाद येथील गोदामाला भीषण आग

    दिल्लीतील वजिराबाद ठाण्याच्या गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

  • 02 Aug 2024 04:28 PM (IST)

    पुण्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती बद्दल उद्धव ठाकरे जाणून घेणार

    शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे हे पुण्यातील पर्यावरणवादी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पुणे शहरात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती बद्दल उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. तसेच नदी सुधार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे सविस्तर माहिती घेणार. पुण्यातील जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. याआधी युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील याच नागरिकांशी संवाद साधला होता.

  • 02 Aug 2024 04:18 PM (IST)

    विरोधकांनी कितीही टीका केली तरी महायुतीची सत्ता येणार: मुख्यमंत्री

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण योजनेवरून आमचे कपटी विरोधात टीका करत आहेत. मात्र विरोधकांनी कितीही टीका केली तरी महायुतीची सत्ता येणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही काही करू शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

  • 02 Aug 2024 03:54 PM (IST)

    पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार

    मावळ पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. 1400 क्यूसेक विद्युत गृहाद्वारे तर 3200 सांडव्यावरून असा एकूण 5000 क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा 92 टक्के इतका झाला आहे. पावसाचा जोर देखील वाढल्याने पवना धरणातून दुपारी 3 वाजता 3200 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.

  • 02 Aug 2024 03:48 PM (IST)

    शिवसेना पक्ष, नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 14 ऑगस्टला सुनावणी

    शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 14 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्चात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 14 ऑगस्टला आता सुनावणी होणार आहे.

  • 02 Aug 2024 03:35 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमधील विविध पक्षातील नेत्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. भाजपचे सिल्लोड तालुका उपाध्यक्ष सुनील कळमीचे, भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कृष्णा शिरसाट, भाजप सरचिटणीस सोमिनाथ सोनवणे, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अगरवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेश पालोदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास पालोदकर, किसान सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास वराडे हे नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

  • 02 Aug 2024 03:32 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा निल्लोड फाटा येथे दाखल

    छत्रपती संभाजी नगर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा निल्लोड फाटा येथे दाखल झाला आहे. वारकरी संप्रदायकाकड़ून टाळ- मृदुंगाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

  • 02 Aug 2024 01:55 PM (IST)

    पुण्यातील हा रस्ता बंद करण्याचे आदेश

    आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचलेला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता आजपासून ५ ऑगस्टपर्यंत सदरचा रस्ता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

  • 02 Aug 2024 01:35 PM (IST)

    अमोल मिटकरी वाहनावरील हल्ला, आतापर्यंत11 जणांना अटक

    अमोल मिटकरी वाहनावरील हल्ला प्रकरणात आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी नगरसेवक राजेश काळे आणि सचिन गव्हाळे या दोघांना सिव्हील लाईन पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेतले आहे.

  • 02 Aug 2024 01:19 PM (IST)

    जळगावाच्या विद्यार्थ्याचे सुवर्णपदक

    जळगावच्या एलएच पाटील इंग्लिश स्कूलमधील १२ वीच्या देवेश भैय्या या विद्यार्थ्याने सौदी अरेबिया येथे झालेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले.

  • 02 Aug 2024 12:57 PM (IST)

    मनसैनिकांच्या जामिनावर आज सुनावणी

    अमोल मिटकरी वाहनावर हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या मनसैनिक सचिन गालट ललित यावलकर अरविंद शुक्ला मुकेश धोंडफळे रुपेश तायडे या 5 जणांच्या जामिनावर आज दुपारी सुनावणी होणार आहे.

  • 02 Aug 2024 12:25 PM (IST)

    उद्धव ठाकरे पुण्याकडे रवाना

    उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय पुण्या दौऱ्यावर आहेत, आज ते मुंबईहून पुण्याचे दिशेने निघाले असून काही वेळातच ते उर्से टोलनाका या ठिकाणी पोहोचणार आहेत, तिथं त्यांचं शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात येणार आहे.

  • 02 Aug 2024 11:58 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर नामांतर विरोधातील याचिका फेटाळली

    छत्रपती संभाजीनगर नामांतर विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. छत्रपती संभाजीनगर नामांतर विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होती.पहिल्याच सुनावणीत याचिका फेटाळण्यात आली.

  • 02 Aug 2024 11:52 AM (IST)

    आमदार आपत्रता प्रकरणात ६ ॲागस्ट रोजी सुनावणी

    शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी ६ ॲागस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट दोन्ही प्रकरणं एकाच दिवशी ऐकणार आहे.एकापाठोपाठ प्रकरणं ऐकली जाणार आहे. यापूर्वी ७ ॲागस्ट तारीख देण्यात आली होती, आता एक दिवसाअगोदर म्हणजेच ६ ॲागस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. चारही पक्षांचे म्हणणं मांडण्यास कोर्टाने सांगितले होते.

  • 02 Aug 2024 11:45 AM (IST)

    NEET UG 2024 मोठा फैसला

    NEET UG 2024 प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षेवरील मळभ दूर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की पेपरचं कोणतेही ’सिस्टीमॅटिक ब्रीच’ झाले नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले

  • 02 Aug 2024 10:58 AM (IST)

    Maharashtra News : मनोज जरांगे थोड्या वेळात पुणे कोर्टात हजर राहणार

    मनोज जरांगे थोड्या वेळात पुणे कोर्टात हजर राहणार. मनोज जारांगे पुणे कोर्टात हजर राहत नसल्याने कोर्टाने बजावलं होत अटक वॉरंट. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणात झाला होता गुन्हा दाखल. आज मनोज जरांगे हजर राहणार. पुणे कोर्टात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

  • 02 Aug 2024 10:25 AM (IST)

    Maharashtra News : पुण्याजवळच मेडिकल महाविद्यालय निघालं बोगस

    पुण्याजवळील खानापूर येथील ओरॅकल ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटच मेडिकल महाविद्यालय बोगस. आयुष मंत्रालयाकडून महाविद्यालयावर कारवाई होणार. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्र महाविद्यालयात अडकली. आयुष विभागानेमहाविद्यालय केलं सील. जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्याच नुकसान यामुळे झालं आहे. वैद्यकीय महाविद्यालयच निघालं बोगस.

  • 02 Aug 2024 10:23 AM (IST)

    Maharashtra News : कर्णबाळा दूनबळेच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना

    मनसे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळेच्या अटकेसाठी अकोला पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती. अकोला सिव्हील लाईन पोलिसांच पथक रवाना झाल्याची माहिती. कर्णबाळा हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर.

  • 02 Aug 2024 09:50 AM (IST)

    Maharashtra News: कोयना धरणातून विसर्ग वाढवला

    कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फूट सहा इंचाने उघडले… धरणातून 52,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू… धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी पाणी विसर्ग सुरू… कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 02 Aug 2024 09:47 AM (IST)

    Maharashtra News: भाजपशासित राज्यात लोकशाही राहिली नाही – संजय राऊत

    अयोध्येतील राम मंदिरात गळती, संसद भवनात गळती… ठेकादार कोण होते ते पाहिलं पाहिजे… निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही… 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील… निवडणूकीला 2 महिने शिल्लक… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 02 Aug 2024 09:44 AM (IST)

    Maharashtra News: महाराष्ट्रात जे काही सुरु आहे त्याचं कंट्रोल दिल्लीत – संजय राऊत

    राज्यात नियमबाह्य व्यक्तीला सत्तेवर बसवलंय… महाराष्ट्रात जे काही सुरु आहे त्याचं कंट्रोल दिल्लीत… भाजपशासित राज्यात लोकशाही राहिली नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 02 Aug 2024 09:30 AM (IST)

    Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर

    संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार 60 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचे मंजुरी पत्र देणार… सिल्लोडचे आमदार आणि संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन…

  • 02 Aug 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News: चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसाचा जोर कायम

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रामध्ये सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 29.65 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 86.17 टक्के भरले आहे.

  • 02 Aug 2024 08:57 AM (IST)

    Marathi News: पुण्यात पीएमपीएसएलच्या बसला आग

    कात्रज बस स्टॉप येथे पीएमपीएसएलच्या CNG बसला आग लागली आहे. त्या ठिकाणी कात्रज अग्निशमन दलाचे पथक पोहचले. त्यांनी दहा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.

  • 02 Aug 2024 08:47 AM (IST)

    Marathi News: मुंबईतील वाकोला महामार्गावर अपघात

    मुंबईतील वाकोला महामार्गावर दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघात दुचाकीस्वारचा जागीच ठार झाला. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

  • 02 Aug 2024 08:31 AM (IST)

    Marathi News: दोन हजारांच्या नोटा अजून परतल्या नाहीत

    दोन हजारांच्या ७,४०९ कोटी मूल्याच्या नोटा अजूनही परतल्या नाहीत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपये मूल्याची नोट चलनातून काढून घेण्याच्या घोषणेला एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही अजूनही ७,४०९ कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा जमा परतलेल्या नाहीत.

  • 02 Aug 2024 08:19 AM (IST)

    गुहागर विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा

    गुहागरची जागा भाजपच लढणार असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केला. लोकसभेत आमची तयारी असताना आम्ही महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे काम केले. परंतु आता ही जागा आम्हीच लढवणार आहोत, असे साठे म्हणाले.

Published On - Aug 02,2024 8:17 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.