Maharashtra Political News Headlines 16 August 2024 : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट

| Updated on: Aug 16, 2024 | 10:39 PM

TV9 Marathi, Maharashtra Political News Live 16 August 2024 : आज 16 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News Headlines 16 August 2024 : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट
Maharashtra Live News

राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे कुठे साखर तर कुठे पेढे वाटून जल्लोष करण्यात येत आहे. लाभार्थी महिलांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे या योजनेच्या प्रसिद्धीसाठीही राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण, धर्मवीर आनंद दिघे महारोजगार योजना संदर्भात महिला बाल विकास विभागाची बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत. पुणे शहरात आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी ससून रुग्णालय परिसरातील जलवाहिनी फुटल्याने आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Aug 2024 08:27 PM (IST)

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे आणि ठाण्यासाठी नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली.  स्वारगेट ते कात्रज पर्यंत नवा मेट्रो मार्ग बनवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या मार्गावर तीन स्टेशन असणार आहेत. तसेच ठाण्यामधील रिंग मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यात 29 किलोमीटरच्या मार्गावर 22 स्टेशन्स असणार आहेत. यासाठी 12200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • 16 Aug 2024 06:58 PM (IST)

    याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणीची शक्यता

    राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा, अशी याचिका भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेतून गृहमंत्रालयाला राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात सुनावणीची शक्यता आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मते राहुल गांधी यांनी इग्लंडचं नागरिकत्व स्वीकारले होते त्यामुळं त्यांचे नागरिकत्व रद्द करावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • 16 Aug 2024 06:43 PM (IST)

    पत्रिकेत नाव टाकण्यासंदर्भात शरद पवारांना जिल्हा प्रशासनाकडून विचारणा

    शरद पवार यांनी राज्य सरकारचा पुण्यात होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेत नाव टाकण्यास परवानगी नाकारली आहे. पत्रिकेत माझं नाव टाकू नका, अशी पवारांनी जिल्हा प्रशासनाला सांगितलं. पत्रिकेत नाव टाकण्यासंदर्भात शरद पवारांना जिल्हा प्रशासनाकडून विचारणा करण्यात आली होती. मात्र शरद पवारांनी पत्रिकेत नाव टाकू नये अशा सूचना दिल्या.

  • 16 Aug 2024 06:24 PM (IST)

    गुन्हे शाखेला चोरट्यांना अटक करण्यात यश

    खारघर येथील ज्वेलर्सला लुटणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात यश आलं आहे. गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. चोरट्याने ज्वेलर्समधील अकरा लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. चोरट्यानी बाहेर पडताना फायरिंग देखील केली होती. तांत्रिक तपासाद्वारे राजस्थान गुजरात महाड माथेरान या परिसरात पथके देखील पाठवण्यात आली होती. गुप्त बातमी मार्फत तसेच तांत्रिक तपास आधारे गुन्हे शाखेने या चार आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. चोरट्याकडून काही मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.

  • 16 Aug 2024 05:52 PM (IST)

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार?

    झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तुरुंगात गेल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन मुख्यमंत्री झाले.

  • 16 Aug 2024 05:40 PM (IST)

    संतांच्या केसाला धक्का लागणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामुळे या भूमीत संतांचा सन्मान केला जाईल. संतांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. रामगिरी महाराजांच्या समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. ‘संत पंरपरा मोठी आहे. संतांच्या आशीर्वादाने राज्य कारभार सुरु आहे. या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिम्मत कोणी करणार नाही.’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

  • 16 Aug 2024 05:33 PM (IST)

    ही देना बँक आहे घेना बँक नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावरून लाडकी बहीण योजनेचा कौतुक पाढा वाचला. तसेच इतर घोषणांबाबतही सांगितलं. तसेच लाडकी योजनेतून पैसे पटापट काढा नाही तर सरकार परत घेईल या विरोधकांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हे सरकार देना बँक आहे घेना बँक नाही. तुमच्या आशीर्वादाने ही योजना कायम सुरु राहील, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

  • 16 Aug 2024 05:25 PM (IST)

    अडचणीतील कुटुंबांना रामगिरी महाराजांनी दिशा दाखवली- मुख्यमंत्री

    नाशिकच्या सिन्नरमधील पंचालेमध्ये हरिनाम सप्ताह सुरु आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचं कौतुक केलं. तसेच अडचणीत असलेल्या कुटुंबांना दिशा दाखवल्याचं सांगितलं. दरम्यान, रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्याविरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

  • 16 Aug 2024 05:12 PM (IST)

    रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

    रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आहे. रामगिरी महाराजांवर आज दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

  • 16 Aug 2024 04:45 PM (IST)

    नाशिक शहरात तणावाची स्थिती, पोलिसांकडून लाठीचार्ज

    नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक शहर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच सकल हिंदू समाजाची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाली होती. यावेळी भद्रकाली परिसरात दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावरुन दोन गटात वाद झाला. पोलिसांकडून  लाठीचार्ज करण्यात येत आहे.

  • 16 Aug 2024 04:27 PM (IST)

    पुण्यातील विश्रांतवाडी भागातून ड्रग्स ची तस्करी करणाऱ्यांना अटक

    पुण्यातील विश्रांतवाडी भागातून ड्रग्स ची तस्करी करणाऱ्या चार जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलीय. मात्र आता पुढे जात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्स चे सेवन करणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यात ड्रग्स चे सेवन करणारे ते ‘११९’ जण आता रडारवर आले आहेत यातील ७० पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी बोलवून घेऊन त्यांना पोलिसी खाकितील दम भरून त्यांना चांगलीच समज दिली आहे.

  • 16 Aug 2024 04:15 PM (IST)

    17 ऑगस्ट रोजी संपूर्ण धुळे जिल्हा कडकडीत बंद

    बांगलादेश येथे हिंदू अल्पसंख्यांक यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच् विरोधात धुळे जिल्ह्यातील संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने धुळे बंदची हाक देण्यात आली आहे. बांगलादेश मध्ये घडत असलेल्या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी 17 ऑगस्ट शनिवार रोजी संपूर्ण धुळे जिल्हात बंद पाळण्यात येणार आहे. शहरातील महाराणा प्रताप स्मारकाजवळ एकत्र येत जिल्हाधिकारी यांना देण्यात निवेदन येणार आहे.

  • 16 Aug 2024 02:58 PM (IST)

    देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस?,RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा

    देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस असल्याचा दावा RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत केला आहे.. एवढेच नाही तर या 22 अधिकाऱ्यांची नावे असणारी एक डॉक्युमेंट UPSC FILES नावाने सोशल मीडियावर फिरत असून ती यादी देखिल विजय कुंभार यांनी समोर आणली आहे, याबाबत UPSC आयोगाला पत्र लिहून , या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी या अधिकाऱ्यांना ज्यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.

  • 16 Aug 2024 02:50 PM (IST)

    काँग्रेसचे 100 दिवसांचे संविधान बचाओ अभियान

    काँग्रेसने 100 दिवसांचे संविधान बचाओ अभियान सुरु केले आहे. संविधान साकारून 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 26 नोव्हेंबर पर्यंत मोहीम चालणार आहे. संविधानाचे रक्षक म्हणून नोंदणी करण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात मोहीम राबवली जाणार आहेत. मोहिमेचे सांगता दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर होणार आहे.

  • 16 Aug 2024 02:40 PM (IST)

    बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला बॅट चिन्ह

    बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला बॅट चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाने प्रहार जनशक्ती पक्षाला बॅट हे चिन्ह दिले. यापूर्वी बच्चू कडू च्या प्रहार पक्षाने अनेकदा कप बशी चिन्हावर लढवली निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत प्रहारला शिट्टीचिन्ह मिळालं होतं. यानंतर आता प्रहार पक्षाला पुढच्या निवडणुका बॅट चिन्हावर लढवाव्या लागतील.

  • 16 Aug 2024 02:30 PM (IST)

    प्रथमच भाजप-शिवसेनेचा वेगळा कार्यक्रम

    अंधेरी पूर्व विधानसभेत प्रथमच भाजप आणि शिवसेनेचे वेग वेगळे कार्यक्रम होणार आहेत. आणि भाजप आणि शिवसेना आपली अपली ताकद दाखवणार आहेत.

  • 16 Aug 2024 02:20 PM (IST)

    ऋषभ शेट्टीला सर्वोत्त अभिनेत्याचा पुरस्कार

    70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कांतारा चित्रपटातील भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्तम अभिनेत्याचा मान मिळाला.

  • 16 Aug 2024 02:12 PM (IST)

    सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही

    राज्याची निवडणूक दोन महिन्यावर आहे. कोणी तरी म्हणालं तीन महिन्यांनी. तीन महिन्यांनी नाही. आपल्याकडे त्याही पेक्षा कमी दिवस आहे. या कमी दिवसात तिन्ही पक्षाने आणि आपल्या मित्रपक्षांनी सामान्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे. महाराष्ट्राचे चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही, असे शरद पवार म्हणाले.

  • 16 Aug 2024 02:00 PM (IST)

    स्वातंत्र्य दिनी विरोधी पक्ष नेत्याचा अवमान?

    स्वातंत्र्य दिनी केंद्र सरकारने विरोधी पक्ष नेत्याचा अवमान केला का? या पदाची प्रतिष्ठा राखण्यात केंद्र सरकार कमी पडत असल्याचा घणाघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

  • 16 Aug 2024 12:55 PM (IST)

    अजित पवार यांनी केले अत्यंत मोठे भाष्य

    पुढचं लाईटबिल येणार नाही आणि मागच लाईटबिल भरायचं नाही, समाजात आपल्याला कुणाला नाराज ठेवायचं नाही

  • 16 Aug 2024 12:41 PM (IST)

    आवाज निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, दादा परत या ना, आपल्या राष्ट्रवादीत

    ळेगाव दाभाडेच्या महिला मेळाव्यात झळकलेत बॅनर्स. बॅनर्सच्या माध्यमातून अजित पवारांना कार्यकर्त्यांचे आवाहन

  • 16 Aug 2024 12:18 PM (IST)

    परभणीच्या मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली

    धैर्यशील जाधव परभणीचे नवीन मनपा आयुक्त झाले आहेत.

  • 16 Aug 2024 12:08 PM (IST)

    देवस्थानच्या जमिनी बिल्डरच्या ताब्यात गेल्या- जयंत पाटील

    नुकताच जयंत पाटील यांनी मोठे विधान केले असून ते म्हणाले की, देवस्थानच्या जमिनी बिल्डरच्या ताब्यात गेल्या आहेत.

  • 16 Aug 2024 11:16 AM (IST)

    Maharashtra News : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं धरण भरलं

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्वाचं धरण 82 टक्के भरलं. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 30 सेंटिमीटरने उघडले. सध्या धरणावर विहंगम दुश्य. पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात. वर्धा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

  • 16 Aug 2024 11:14 AM (IST)

    Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शनिवारी वर्ध्याच्या दौऱ्यावर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शनिवारी सहकार नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त समारोपीय सोहळ्याला उपस्थित राहणार. भाजप नेते नितीन गडकरी राहणार कार्यक्रमाला उपस्थित. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शेकापचे नेते जयंत पाटील राहणार उपस्थित. शनिवारी दुपारी 2 वाजता यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाच आयोजन.

  • 16 Aug 2024 10:43 AM (IST)

    आमच्या सोबत आले तर त्यांच्यासोबत लढू नाहीतर… अर्जुन खोतकर यांचा रावसाहेब दानवेंना इशारा

    आमच्या सोबत आले तर त्यांच्यासोबत लढू नाही आले तर त्यांच्या शिवाय निवडणूक लढू आम्ही लढणारे लोक आहोत, असा सूचक इशारा अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांना दिला आहे.

    ते जर आम्हाला अडचणीत आणणार असतील तर जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी पण तीन जागा लढवत असतात. जे आमच्या सोबत होईल ते त्यांच्यासोबत होईल असंही त्यांनी सुनावलं.

  • 16 Aug 2024 10:34 AM (IST)

    इंडियन मेडिकल असोसिएशन (ima) च्या डॉक्टर्सचा उद्या पासून २४ तासांचा संप

    इंडियन मेडिकल असोसिएशन (ima) च्या डॉक्टर्स चा उद्या पासून २४ तासांचा संप. कलकत्तामध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात देशभरात हा संप पुकारण्यात आलाय. उद्या सकाळी ६ वाजता संप चालू होणार आणि १८ ऑगस्ट ला सकाळी ६ वाजता  संपणार. OPD आणि मॉडर्न मेडिसिनच्या कुठल्याही सेवा चालू नसणार. फक्त अतिदक्षता सेवा सुरू राहतील.

  • 16 Aug 2024 10:15 AM (IST)

    महायुतीकडे तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुठे आहे ? प्रियांका चतुर्वेदी यांचा सवाल

    महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये असं म्हणणाऱ्या महायुतीकडे तरी कुठे चेहरा आहे. एकनाथ शिंदे अजित दादा आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. आधी त्यांनी स्वतःच्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी सुनावलं.

    झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या सगळ्या राज्यांची निवडणूक एकत्र होणार होती . मात्र महाराष्ट्र आणि झारखंडची होऊ नये यासाठी चर्चा सुरू झालेली आहे, असे त्या  म्हणाल्या.

  • 16 Aug 2024 10:04 AM (IST)

    पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना वाहिली श्रद्धांजली

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ सदैव अटल’ येथे जाऊन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी माजी पंतप्रधानांना ‘सदैव अटल’ येथे आदरांजली वाहिली.

  • 16 Aug 2024 09:56 AM (IST)

    Maharashtra News: महाविकास आघाडी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार

    महाविकास आघाडी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार… मविआच्या मोळाव्याचं यजमानपद शिनसेनेकडे… आजच्या मेळाव्याचं उद्धाटनपर भाषण ठाकरेंचे… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 16 Aug 2024 09:45 AM (IST)

    Maharashtra News: श्रावणी पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात सुमारे तीन लाख भाविक दाखल

    श्रावणी पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात सुमारे तीन लाख भाविक दाखल… चंद्रभागास्नानासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे… पहाटे पासूनच श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या पदस्पर्शदर्शनासाठी भाविकांनी श्री विट्ठल मंदिरात गर्दी केली होती तर दर्शनाची रांग गोपाळपूर रोड पर्यंत गेली आहे… मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गेला फुलून ….

  • 16 Aug 2024 09:30 AM (IST)

    Maharashtra News: भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटेल यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश

    भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटेल यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश… नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत आज पक्षप्रवेश… शिशुपाल पटेल यांच्याकडून 2004 च्या लोकसभेच प्रफुल पटेलांचा पराभव…

  • 16 Aug 2024 09:20 AM (IST)

    Maharashtra News: पाकिस्तानातून आलेल्या ५४ हिंदूंसाठी भारताच्या कुशीत नवा संसार

    पाकिस्तानातून आलेल्या ५४ हिंदूंसाठी भारताच्या कुशीत नवा संसार… पाकिस्तानातून आलेल्या ५४ सिंधी भाषिकांना मिळालं भारतीय नागरिकत्व… स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकत्वाची प्रतीक्षा संपली!

  • 16 Aug 2024 09:16 AM (IST)

    Maharashtra News: अंबरनाथच्या हेरंब मंदिर चोरी प्रकरणी तिघांना बेड्या

    अंबरनाथच्या हेरंब मंदिर चोरी प्रकरणी तिघांना बेड्या… उल्हासनगर क्राईम ब्रँचची कारवाई… चोरट्यांकडून गणपती बाप्पाचे चोरलेले दागिने हस्तगत… आरोपींना न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी…

  • 16 Aug 2024 08:44 AM (IST)

    Marathi News: विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा तिढा सातव्या दिवशीही कायम आहे.या आंदोलनकर्त्यांची शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर आमदार जैस्वाल यांनी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांचीही भेट घेतली.

  • 16 Aug 2024 08:32 AM (IST)

    Marathi News: हिंगोलीत पावसाला सुरुवात

    हिंगोली जिल्ह्यात आज सकाळ पासूनच रिम-झिम पावसाला सुरुवात झाली मागच्या आठवडा भराच्या विश्रांती नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने सोयाबीन, कापसा सह इतर पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • 16 Aug 2024 08:15 AM (IST)

    Marathi News: पुण्यात उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा

    पुणे शहरात आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी ससून रुग्णालय परिसरातील जलवाहिनी फुटल्याने आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पुणे शहरातील अनेक भागात आज पाणी येणार नाही. उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

    या भागांतील पाणी पुरवठा आज राहणार बंद

    पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, स्वारगेट,ससून सर्वोपचार रुग्णालय, गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबाग

Published On - Aug 16,2024 8:13 AM

Follow us
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.