Maharashtra Political News Headlines 19 August 2024 : जळगावात तब्बल 15 दिवसानंतर पावसाचं जोरदार पुनरागमन

| Updated on: Aug 19, 2024 | 9:46 PM

TV9 Marathi, Maharashtra Political News Live 19 August 2024 : आज 19 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News Headlines 19 August 2024 : जळगावात तब्बल 15 दिवसानंतर पावसाचं जोरदार पुनरागमन

पुण्यात रविवारी जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात शिरले पाणी शिरले होते. आता रेल्वे स्टेशन परिसरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब आणि हरियाणा राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. कोलकत्ता डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहे. विदर्भात शिंदे सेनेला 12 जागा हव्या आहेत. नागपुरातील 2 जागांसाठी शिंदे सेना आग्रही आहे. जळगावात संतप्त ग्रामस्थांनी गाड्यांची तोडफोड करत तिसऱ्या रेल्वे लाईन चे काम बंद पाडले आहे. गोंदियामध्ये दगडाने ठेचून बापानेच मुलाची हत्या केली आहे. आज रक्षाबंधनाच्या निमित्तने सैनीक नारिशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 4000 पेक्षा जास्त राख्या ह्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Aug 2024 09:06 PM (IST)

    भर पावसात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार उतरले रस्त्यावर

    पुणे :  वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भर पावसात शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांनी दीड तास रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीतून नागरिकांचा मार्ग मोकळा केला. पुणे जिल्ह्याच्या तळेगाव ढमढेरे येथे आठवडे बाजार व पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. आमदार अशोक पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे दिड तास न्हावरे ते शिक्रापूर मार्ग, कासारी फाटा ते तळेगाव ढमढेरे, राहू ते तळेगाव ढमढेरे रोडवरील झालेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना रस्ता मोकळा करून दिला.

  • 19 Aug 2024 07:42 PM (IST)

    पुणे पोर्शे कार प्रकरणी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल यांना उद्या जामीन मिळणार?

    पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपींच्या जामीनावर उद्या निकाल आहे. अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या निकाल आहे. विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड येरवडा कारागृहात आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावर दोन्ही सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

  • 19 Aug 2024 06:52 PM (IST)

    महागाईने लोक मरत आहेत : राहुल गांधी

    विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज टॅक्सी चालवली आहे. त्याने X वर पोस्ट करून त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. कमी उत्पन्न आणि महागाईमुळे लोकांचा श्वास सुटत असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले.

  • 19 Aug 2024 06:37 PM (IST)

    फैय्याद अहमद यांची AIMIM मुंबई अध्यक्षपदावरून हकालपट्टी

    AIMIM फयाद अहमद यांची मुंबई अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता रईस लष्करिया यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. फय्याद अहमद यांना हटवल्यानंतर फैय्याद अहमद यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. महाराष्ट्र एमआयएमचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासमोर जलीलच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

  • 19 Aug 2024 06:25 PM (IST)

    साबरमती एक्स्प्रेस अपघातप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

    कानपूरमधील गोविंदपुरी स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांनी अज्ञात लोकांविरुद्ध कथित तोडफोड केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अहमदाबाद-जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेनचे 20 डबे शनिवारी सकाळी कानपूरमधील गोविंदपुरी स्टेशनजवळ रुळावर ठेवलेल्या एका वस्तूला इंजिन आदळल्याने रुळावरून घसरले.

  • 19 Aug 2024 06:10 PM (IST)

    जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला

    जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर हल्ला केला. या घटनेशी संबंधित संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

  • 19 Aug 2024 05:41 PM (IST)

    विजांच्या कडकडाटासह शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार

    जळगावात तब्बल पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे. पंधरा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची प्रतिक्षा होती. जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं जोरदार पुनरागमन झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विजांच्या कडकडाटासह जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

  • 19 Aug 2024 05:08 PM (IST)

    पावसामुळे पुणे नगर महामार्गावर वाहतूक कोंडी

    पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिक रक्षाबंधनाला निघाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याने सर्वांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • 19 Aug 2024 04:33 PM (IST)

    ठाणे आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी बांधण्यासाठी महिलांची रांग

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यान्हा शेकडो महिलांनी रांग लावत राखी बांधण्यास सुरुवात केली. हातात राखी आणि ओवाळणीचा ताट घेऊन महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी केली. राखी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांचाही सहभागी पाहायला मिळाला. एका महिलेने हट्ट केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेला राखी बांधली.

  • 19 Aug 2024 04:31 PM (IST)

    आम्ही विरोधकांवर टीका करत नाहीत पण ते आम्हाला शिव्या देतात- अजित पवार

    आम्ही विरोधकांवर टीका करत नाहीत पण ते आम्हाला शिव्या देत असल्याचं अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेमधील आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे.

  • 19 Aug 2024 04:16 PM (IST)

    जनसन्मान यात्रेत अजित पवार आणि झिशान सिद्दीकी एकत्र

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकी यांनी हजेरी लावली आहे. माझ्यावर मोठा अन्याय झाला, प्रत्येकवेळी मी लढलो असून जनतेला विचारून मी पुढचा निर्णय घेणार अलल्याचं झिशान सिद्दीकी म्हणाले.

  • 19 Aug 2024 04:15 PM (IST)

    राजधानी दिल्लीत नव्या महाराष्ट्र सदनात रक्षाबंधन सण साजरा

    नव्या महाराष्ट्र सदनात रक्षाबंधन सण साजरा केला गेला.  राजधानी दिल्लीत युपीएससी करणाऱ्या मराठी विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या.  महाराष्ट्र सदनाची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षारक्षकांना राखी बांधून लाडू भरवले.  अस्मिता ढमाले, शिवानी सिंग, सृष्टी चव्हाण या तिघींनी सुरक्षारक्षकांना राख्या बांधल्या. घरापासून दूर असलेल्या जवानांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.

  • 19 Aug 2024 03:42 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात

    सलग दुसऱ्या दिवशी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते . अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झालीये. अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पाऊस पडल्याने पिकांची चिंता मिटली, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

  • 19 Aug 2024 03:30 PM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं राष्ट्रपतींना पत्र

    महाराष्ट्र शक्ती फौजदारी (महाराष्ट्र सुधारणा) कायदा 2020 कायद्याला मंजुरी देण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने महाराष्ट्र विधानसभेत कायदा मंजूर केला होता. रक्षाबंधनच्या निमित्ताने राज्यातील आणि देशातील महिलांना दिलेली ही सर्वात योग्य भेट असेल, अशा भावना चतुर्वेदी यांनी पत्रातून भावना व्यक्त केल्या.

  • 19 Aug 2024 03:25 PM (IST)

    एक घटक पक्ष म्हणून आम्हाला वाटतं महायुतीचं सरकार यावं – महादेव जानकर

    पंकजाताईंकडे मागील १३ वर्षांपासून आम्ही हा सण साजरा करतोय.  मला लोकसभेत एक जागा महायुतीने दिली.  एक घटक पक्ष म्हणून आम्हाला वाटतं महायुतीचं सरकार यावं.  पुन्हा लाडली बहीण योजना सुरु ठेवण्यासाठी महायुतीला मतदान करावं असं वाटतं असं महादेव जानकर म्हणाले.

    ताईंचं आणि धनंजय मुंडे यांचं पुन्हा १२ वर्षांनी रक्षाबंधन झालं.  बहीण भावात वितुष्ट येऊ नये, तसंच सुप्रिया सुळे आणि अजित दादांमधील देखील वितुष्ट दूर व्हावं असंही त्यांनी नमूद केलं.

  • 19 Aug 2024 03:11 PM (IST)

    नाशिक – सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमस्थळी मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी

    नाशिक मधील सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमस्थळी मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आंदोलकांकडून सुप्रिया सुळे यांना आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यात आलं.

  • 19 Aug 2024 03:09 PM (IST)

    आमच्याकडे देना बँक, विरोधकांकडे केवळ लेना बँक – मुख्यमंत्री शिंदे

    आमच्याकडे देना बँक, विरोधकांकडे केवळ लेना बँक असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

  • 19 Aug 2024 03:07 PM (IST)

    बहिणींना गॅस दिल्याने विरोधक गॅसवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    बहिणींना गॅस दिल्याने विरोधक गॅसवर आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  विरोधकांकडून योजनांचा अपप्रचार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • 19 Aug 2024 02:51 PM (IST)

    आमदार कृपाल तुमाने यांचे मोठे विधान

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी बैठका घेतल्या, विधानसभेला प्रभारी आणि निरीक्षक नेमले. पक्ष वाढीसाठी आणि उमेदवार देण्यासाठी चर्चा झाली आणि मतदार संघाचा आढावा घेण्याच काम सुरू आहे, असे आमदार कृपाल तुमाने यांनी म्हटले.

  • 19 Aug 2024 02:47 PM (IST)

    सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात कॉलेज विद्यार्थ्यांची हेळसांड

    भर पावसात सुप्रिया सुळेंच्या स्वागताला उभ केल कॉलेज विद्यार्थ्यांना. सुप्रिया सुळे अद्याप कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या नाहीत. विद्यार्थी भिजले पावसात, सुप्रिया सुळे मात्र गाडीत

  • 19 Aug 2024 02:26 PM (IST)

    लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणातील हलगर्जीपणा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भोवला

    बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली. नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून किरण बालवडकर यांनी पदभार स्वीकारला

  • 19 Aug 2024 02:04 PM (IST)

    आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रात 2 मुले बुडाले असल्याची प्राथमिक माहिती

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे आणि आळंदी नगर परिषदेचे बचाव पथक कार्यरत असून शोध कार्य सुरू आहे. आळंदी मध्ये वेदपाठ शाळेत शिक्षण घेणारी दोन मुले बुडाली असल्याची प्राथमिक माहिती…

  • 19 Aug 2024 02:00 PM (IST)

    आळंदी इंद्रायणी नदीपात्रात 2 मुलं बुडाली, बचाव कार्य सुरु

    – आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रात 2 मुलं बुडाल्याची प्राथमिक माहिती

    – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे आणि आळंदी नगर परिषदेचे बचाव पथक कार्यरत असून शोध कार्य सुरू आहे

    – आळंदी मध्ये वेदपाठ शाळेत शिक्षण घेणारी दोन मुले बुडाली असल्याची प्राथमिक माहिती

  • 19 Aug 2024 01:55 PM (IST)

    अमोल मिटकरींचे आक्षेपार्ह वक्तव्य, कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संतांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य तसेच धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल मिटकरींच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवत हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अकोल्यात वर्ग धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने भारतीय न्याय संहिता 302 प्रमाणे गुन्हा दाखल

  • 19 Aug 2024 01:53 PM (IST)

    इगतपुरी तालुक्यात पावसाचे पुनरागमन, बळीराजा सुखावला

    इगतपुरी तालुक्यात पावसाचे पुनरागमन

    गेल्या आठ दिवसांपासून दिली होती उघडीप

    नागरिक उकाड्याने होत होते हैराण

    उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

    पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाही सुखावला

  • 19 Aug 2024 01:24 PM (IST)

    सरकार लाडकी बहीण ही योजना पुढेही सुरु ठेवणार – अमृता फडणवीस

    लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोट्यवधी बहिणी लाभल्या आहेत. तर मलाही तेवढ्याच नणंद लाभल्या आहेत. आमचा नवीन नणंद भावजय चा नातं सुरू झालाय, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.

    देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शकपणावर, प्रामाणिकपणावर, त्यांनी याआधी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार सारख्या चांगल्या योजनांवर ही विरोधकांनी टीका केली होती.. त्यामुळे ते आताही टीका करत आहेत. सरकारने चांगले हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना पुढेही सुरु राहील आणि त्यात आवश्यक वाढ करतील अशी अपेक्षा आहे, असेही अमृता फडणवीसांनी म्हटले

  • 19 Aug 2024 01:22 PM (IST)

    नाशिकमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीचे हाल

    लासलगाव (नाशिक) – रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचे हाल

    – ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध होत नसल्याने लासलगाव बस स्थानकावर महिलांची गर्दी

    – जास्तीत जास्त एसटी बस उपलब्ध करून देण्याची महिलेची मागणी

  • 19 Aug 2024 12:57 PM (IST)

    मुंबईत ज्या बहिणी आहेत, त्यांच्याकडून राखी बांधून घेणार – अजित पवार

    मुंबईत ज्या बहिणी आहेत, त्यांच्याकडून राखी बांधून घेणार. सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर तिच्याकडूनही राखी बांधून घेईन – अजित पवार

  • 19 Aug 2024 12:52 PM (IST)

    कर्जत खालापूर मतदार संघात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात रंगलं वॉर

    कर्जत खालापूर मतदार संघात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात वॉर ( युद्ध) रंगलं आहे.

    शिंदे गट आमदार महेंद्र थोरवे यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    आमदार महेंद्र थोरवे हे स्वतःच विश्वासघातकी.  विश्वासघात कोणी आणि कोण करतंय हे दुनियेला माहीत आहे अशी टीका अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी केली होती.

    तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विश्वास घात करणारी पार्टी, जिल्ह्याचे नेतृत्व देखील विश्वासघातकी आहे असे म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुधाकर घारे यांना प्रत्युत्तर दिले.

  • 19 Aug 2024 12:32 PM (IST)

    रक्षाबंधन निमित्त सोन्या-चांदीच्या राखी खरेदी करण्यासाठी जळगावच्या सराफ बाजारात भगिनींची गर्दी

    रक्षाबंधन निमित्त सोन्या-चांदीच्या राखी खरेदी करण्यासाठी देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात भगिनींची गर्दी झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात दुकानांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सोन्या-चांदीच्या राख्या उपलब्ध आहेत.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्या चांदीच्या भावात काहीशी घसरण झाल्याने महिलांनी सोन्या-चांदीच्या राख्यांना प्राधान्य दिले.

  • 19 Aug 2024 12:21 PM (IST)

    राजधानी दिल्लीत आरोग्य मंत्रालयासमोर आंदोलन

    राजधानी दिल्लीत आरोग्य मंत्रालयासमोर आंदोलन.  कोलकातामधील घटनेचा निषेध करण्यासाठी न्याय मिळावा ही मागणी करत डॉक्टर्स कडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. विविध संघटनांचे निवासी डॉक्टर्स आंदोलनात सहभागी झाले आहेत.

  • 19 Aug 2024 12:17 PM (IST)

    माजी मंत्री सुनील केदार आमदार अभिजित वंजारी हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले

    नागपूर- माजी मंत्री सुनील केदार आमदार अभिजित वंजारी हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीसाठी पोहचले. शासकीय बंगला परिसरात भरलेल्या पाण्याची केली पाहणी.

  • 19 Aug 2024 12:06 PM (IST)

    “जैसी करनी वैसी भरनी म्हणत नितेश राणेंचा, अनिल देशमुख आणि संजय राऊतांवर प्रहार

    नितेश राणेंचा, अनिल देशमुख आणि संजय राऊतांवर प्रहार, गौतम भटकर सोबतचे फोटो शेअर करत राणेंनी टीका केली आहे.

    गौतम भटकर हा नागपुरातील कुख्यात गुंड व संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या.भटकरवर मोक्कासह खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, अशा गुन्हेगारांसह भोजन केले तर जेलमध्येच जावे लागणार असे म्हणत नितेश राणेंनी राऊत व देशमुखांवर निशाणा साधला.  “जैसी करनी वैसी भरनी” म्हणत राणेंनी राऊत व देशमुखांना डिवचले.

  • 19 Aug 2024 11:50 AM (IST)

    विधानसभा निवडणुकांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

    “मागची निवडणूक झाल्यावर सरकार लवकर स्थापन झाले नाही. त्यामुळे कार्यकाळ उशिरा आहे, सरकार उशिरा स्थापन झाले होते. त्यामुळे त्यानुसार निवडणुका होतील,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

  • 19 Aug 2024 11:40 AM (IST)

    कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार, हत्येप्रकरणी राजधानी दिल्लीत आज पुन्हा डॉक्टर रस्त्यावर

    नवी दिल्ली- कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी राजधानी दिल्लीत आज पुन्हा डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. आरोग्य मंत्रालयासमोर डॉक्टर्स ओपीडी लावणार आहेत. निर्माण भवनमध्ये आरोग्य मंत्रालय असून सरकारचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स पुन्हा रस्त्यावर आले आहेत. पोलीस परवानगी देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 19 Aug 2024 11:30 AM (IST)

    नागपूर – जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या बंगल्याच्या परिसरात साचलं पाणी

    नागपूर – जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या बंगल्याच्या परिसरात पाणी साचलं आहे. फक्त अर्धा तास पाऊस पडला, मात्र ड्रेनेज लाइन बरोबर नसल्याने पाणी शिरलं आहे. सिमेंट रोडचं काम बरोबर न झाल्याने पाणी आवारात आल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी केला.

  • 19 Aug 2024 11:20 AM (IST)

    भाजपचं शासन निवडणुका घ्यायला घाबरतंय- अनिल देशमुख

    “भाजपचं शासन निवडणुका घ्यायला घाबरत आहे. सरकारच्या दबावाखाली निवडून आयोगाने हा निर्णय घेतला. नगर पालिका, महानगरपालिका निवडणुका झाल्या नाहीत. लोकसभेत जो फटका बसला, तसा फटका विधानसभेतही बसेल या भीतीने निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे. आमची मागणी आहे की ऑक्टोबरमध्ये निवडणुका घ्या,” अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.

  • 19 Aug 2024 11:10 AM (IST)

    नाशिक- नाफेडच्या व्हायरल यादीतून कांदा घोटाळा उघडकीस?

    नाशिक- नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तब्बल ६ हजार शेतकऱ्यांच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल यादीमध्ये यावर्षीच्या १८ मे ते २० जुलै पर्यंतच्या कांदा खरेदीची माहिती आहे. कांदा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदीपुढे शून्य आणि केवळ ७/१२ अशी नोंद आहे. तर वजन केलेल्या ठिकाणी डमी अशी नोंद आहे. एकाच घरातील अनेक सदस्यांच्या नावावर कांदा खरेदी असल्याचं पहायला मिळतंय.

  • 19 Aug 2024 10:47 AM (IST)

    Maharashtra News: रक्षाबंधनाच्या दिवशीही लाडक्या बहिणींचे हाल सुरू

    रक्षाबंधनाच्या दिवशीही लाडक्या बहिणींचे हाल सुरू… लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची तुफान गर्दी… सकाळी 6 वाजल्यापासून महिला बँकेबाहेर थांबून… पैसे काढण्यासाठी लागली महिलांची लांबच लांब रांग… छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौकातील प्रकार…

  • 19 Aug 2024 10:30 AM (IST)

    Maharashtra News: प्रसाद लाड यांनी चित्रा वाघ यांच्या घरी जाऊन केलं रक्षाबंधन

    भाजप आमदार प्रसाद लाड यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या राहत्या घरी जाऊन केलं रक्षाबंधन… चित्रा वाघ यांनी राखी बांधून प्रसाद लाड यांना पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.. तर चित्रा वाघ यांना भेटवस्तू देत प्रसाद लाड यांनीही दिले शुभआशिर्वाद…

  • 19 Aug 2024 10:19 AM (IST)

    Maharashtra News: देशातील संविधान धोक्यात आहे – संजय राऊत

    देशातील संविधान धोक्यात आहे… राज्यात डिसेंबरमध्ये निडणुका होणार असतील तर ती सरकारची सोय… सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती… हरियाणा, काश्मीरसोबत महाराष्ट्राची निवडणूक घ्यायला हवी होती… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 19 Aug 2024 10:08 AM (IST)

    Maharashtra News: पुण्यातील इच्छुकांची नावे बुधवारी मनोज जरांगे पाटलांना देणार

    पुण्यातील इच्छुकांची नावे बुधवारी मनोज जरांगे पाटलांना देणार… अखंड मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय… पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटील उमेदवार देणार… 29 तारखेच्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार… पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून मराठा समाजातून इच्छुकांची नावं मागवली जाणार…

  • 19 Aug 2024 09:57 AM (IST)

    राष्ट्रवादी जम्मू काश्मीरमध्ये उमेदवार देणार

    अरुणाचल प्रदेश विधानसभेनंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. जम्मू काश्मीर मध्ये जवळपास 25 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. 10 ते 15 उमेदवारांची नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. पुढील महिन्यात जम्मू काश्मीरमधे 3 टप्प्यात निवडणूक होत असून 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

  • 19 Aug 2024 09:45 AM (IST)

    नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई

    नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ATS ने मोठी कारवाई केली आहे. तीन संशयतांना ATS पथकाने ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेले तीन संशयित बांगलादेशी असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकचा पाथर्डी फाटा परिसरात ATS विभागाच सर्च ऑपरेशन सुरू आहे.

  • 19 Aug 2024 09:45 AM (IST)

    रत्नागिरीकरांसाठी महत्वाची बातमी

    रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरील प्रशासकीय राजवटीमुळे जिल्ह्यात 60 कोटींचा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समितींना सरकारकडून निधी नाही. 15 व्या वित्त आयोगातन देण्यात येणारा निधी रोखला आहे. 2022 सालापासूनचे पंचायत समितीचे विकास आराखडे रखडले आहेत. गावांमधला पाणी पुरवठा, विद्युत पंप बसवणे, गावात सिमेंट क्राॅक्रीटचे रस्ते तयार करणे अशा कामांना ब्रेक लागला आहे.

  • 19 Aug 2024 09:30 AM (IST)

    आशिष शेलार राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल

    आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आशिष शेलार गेलेत. या भेटी मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

  • 19 Aug 2024 09:15 AM (IST)

    अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी भोंदू बाबाला रंगेहात पकडलं

    सोलापुरातील मोहोळमध्ये एका भोंदू बाबाला अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं आहे. भोंदूबाबाकडून अंधश्रद्धा पसरवत नागरिकांची फसवणूक होत असतानाच व्हीडीओ समोर आलाय. सुभाष शिवमूर्ती बिराजदार असे या भोंदू बाबा चे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहोळ तालुक्यात गुप्तधन काढून देतो, तुमच्यावरील आरिष्ट्य दूर करतो असा बनाव करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबास मोहोळ पोलिसांनी अटक केली. मोहोळ तालुका अंनिसच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.मोहोळ तालुक्यातील एकुरके, डिकसळ परिसरातील लोकांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली होती.या भोंदूबाबावर पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

  • 19 Aug 2024 08:56 AM (IST)

    Marathi News: माजी पोलीस आयुक्त निवडणूक मैदानात

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नाशिकमध्ये मोठी घोषणा केली. राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी नाशिकमधून चार उमेदवारांची घोषणा केली. ते स्वत: मुंबईतून निवडणूक लढणार आहे.

  • 19 Aug 2024 08:41 AM (IST)

    Marathi News: झारखंडचे माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत किमान तीन आमदारही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. चंपाई यांनी सोशल मीडिया X वर एका पोस्टद्वारे पक्ष नेतृत्वावर त्यांचा अपमान केल्याचा आणि नवीन पर्याय स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.

  • 19 Aug 2024 08:22 AM (IST)

    Marathi News: खासदार सुप्रिया सुळे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    खासदार सुप्रिया सुळे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचा आयोजन केले आहे. आता सुप्रिया सुळे दिंडोरीकडे रवाना होणार आहे. तसेच नाशिक शहरात देखील संध्याकाळच्या सुमारास सुप्रिया सुळे मेळावा घेणार आहे.

  • 19 Aug 2024 08:11 AM (IST)

    Marathi News: रक्षाबंधनानिमित्त महिलांना साडी भेट

    राखी पौर्णिमेनिमित्त बार्शीतील सर्वधर्मीय 500 महिलांना साडी भेट देण्यात आली.भाजपाचे नूतन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते हा साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.बार्शी शहरातील धनंजय धावारे मित्र मंडळाच्या वतीने सर्वधर्मीय महिलांना साडी भेट देण्यात आली.

Published On - Aug 19,2024 8:09 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.