Maharashtra Political News Headlines 7 August 2024 : मोठी बातमी! दौंड येथे एका कंपनीत वायू गळती
TV9 Marathi, Maharashtra Political News Headlines 7 August 2024 : आज 7 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. आज राज्यातील निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषीत करावा, अशी मागणी ठाकरेंकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनोज जरांगे यांची पुण्यात ११ ऑगस्ट रोजी शांतता रॅली निघणार आहे. त्यासाठी पुण्यातील मराठा समाजाच्या बांधवांकडून या रॅलीच्या तयारीला सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
दौंड तालुक्यातील भांडगाव येथे एका कंपनीत वायू गळती
दौंड तालुक्यातील भांडगाव येथे एका कंपनीत वायू गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल ट्विट केलं आहे. “दौंड तालुक्यातील भांडगाव येथे एका कंपनीत वायू गळती झाल्याचं दुर्दैवी वृत्त कळलं. यामुळे कंपनीतील कामगारांची तब्येत बिघडली असून काहींची प्रकृती गंभीर आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वायु गळतीनं प्रकृती बिघडलेल्या कामगारांवर औषधोपचार सुरू असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी प्रार्थना करतो”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
-
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांची बदली
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विनयकुमार राठोड छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. तर अबिनाश कुमार नांदेडचे पोलीस अधीक्षक तर बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून अविनाश बारगळ यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबईतल्या काही डीसीपी दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत.
-
-
बच्चू कडू यांचं दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना पत्र
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांचं दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना पत्र दिलं आहे. दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय सेवेत आलेल्या उमेदवारांच मेडिकल फेर तपासणी करा, अशी मागणी कडूंनी केली आहे. तसेच राज्यातील संशयित उमेदवारांची यादी पण दिव्यांग आयुक्तांना दिली आहे.
-
अमिता-श्रीजया चव्हाण यांच्यासमोर एक मराठा, लाख मराठाची घोषणाबाजी
अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांच्यासमोर एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. अर्धापूर तालुक्यातील देगाव येथे जाब विचारला तर, धामदरी येथे मराठा आंदोलकानी घोषणाबाजी केली .मराठा आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे माजी आमदार अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला. अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्याकडून सध्या भोकर विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरु आहे.
-
राज्यसभेच्या 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार
राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. समीकरणानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 12 पैकी 11 जागा मिळू शकतात. तेलंगणातून काँग्रेसला 1 जागा मिळू शकते.
-
-
नेपाळच्या नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 4 जणांचा मृत्यू
नेपाळमधील नुवाकोट येथील शिवपुरी येथे एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर कोसळले आहे. पोलीस अधिकारी शांती राज कोईराला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सूर्याचौर टेकडीवर आदळल्यानंतर अपघात झाला, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
-
चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरुडमधूनच निवडणूक लढवणार स्पष्ट संकेत
चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरुडमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मतदारसंघात चंद्रकांत पाटलांचे बॅनर लागले आहेत. बॅनरवर चंद्रकात पाटील यांचे कौतुक करण्यात आलं आहे. कोथरुडमध्ये माणसे जोडणारा माणूस असं त्यात उल्लेख करण्यात आला आहे. आपले चंद्रकांतदादा माणसे जोडतात माणसे घडवतात, असंही लिहिलं आहे.
-
क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी केला सभात्याग
पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगटला वगळण्याबाबत क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत निवेदन दिले. विनेशला तिच्या तयारीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या तयारीसाठी 70.45 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला. मात्र, क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्यावर विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.
-
सुटकेनंतर बांगलादेच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया म्हणाल्या की..
नजरकैदेतून सुटल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “जेव्हा मी तुरुंगात होत, तेव्हा तुम्ही लोक माझ्यासाठी लढलात. तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद आणि यासाठी मी तुमची ऋणी आहे. प्रदीर्घ आंदोलन आणि संघर्षानंतर आम्हाला फॅसिस्ट सरकारपासून स्वातंत्र्य मिळाले. मी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो.आपल्याला समृद्ध बांगलादेश घडवायचा आहे. विद्यार्थी हेच आपले भविष्य आहे, ज्यांनी स्वप्नासाठी आपले रक्त दिले आहे. आपल्याला स्वतंत्र बांगलादेश निर्माण करायचा आहे. आपल्याला समृद्ध बांगलादेश बनवायचा आहे.
-
सुप्रिया सुळे यांचं शिवराज सिंह चौहान यांना पत्र
खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहिलं आहे. रोहित पवारांनी आवाज उठवलेल्या मुद्द्यावर पत्र दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ओबीसी प्रवर्गातील लोकांसाठीची मोदी आवास योजेनला महाराष्ट्रात निधी नाही. १० लाख लाभार्थी यापासून वंचित आहेत या योजनेला निधी द्या किंवा ही योजना आपण ताब्यात घ्या, असं पत्र रोहित पवारांच्या मुद्द्यावर केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांना लिहिलं आहे.
-
कर्णबाळा दुनबळे अटक पूर्व जामीन मिळणार?
आमदार अमोल मिटकरी याच्या वाहनाचे तोडफोड प्रकरणी अपडेट समोर आली आहे. मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांच्या अटक पूर्व जामीनावर थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिवाय घटनेतील इतर आरोपीचा जामीन रद्द करावा या मागणीवर देखील सुनावणी होणार आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अकोला याच्याकडे सुनावणी होणार आहे.
-
साखर आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा
राज्यातील साखर कामगारांचा पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढणार आहेत. साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी इशारा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. थकीत पगार,पगारवाढ सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन लागू करणं.तसेच शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी या कामगारांची आहे. यावेळी कामगारांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांशी चर्चा केली.
-
खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता
खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेससह तुतारी किंवा मशाल हातात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनी सूनबाई डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
-
खडकवासला मतदारसंघावर शिंदे गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता
सध्या खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार नावाचा केक कार्यकर्त्यानी कट केला. त्यामुळे खडकवासल्यात शिंदे गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.
-
मराठा आरक्षणासाठी सोलापूरात शांतता रॅली
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आजपासून सोलापुरातून सुरुवात झाली. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव सोलापुरात दाखल झाला आहे. महामार्गाला मोठी गर्दी झाली आहे. मराठा बांधवांच्या कित्येक किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
-
पूजा खेडकर प्रकरणात याचिका निकाली
UPSC ने IAS पद रद्द केल्याचं आम्हाला कळवलं नाही, त्यांनी थेट प्रेस नोट काढून आम्हाला कळवल्याचा युक्तीवाद पूजा खेडकर यांच्या वकिलांनी केला. तर ती कुठे होती, हे माहित नसल्यामुळे पत्रक काढल्याची माहिती युपीएससीने दिली. आम्ही पुढच्या २ दिवसात तिला मेल आणि तिच्या शेवटच्या पत्यावर ही माहिती पाठवू, असे UPSC ने कळवले. नंतर कोर्टाने याचिका निकाली काढली.
-
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आज दुसऱ्या दिवशीही संप सुरूच
रत्नागिरी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आज दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल सुरु आहे. राज्यातील 228 नगरपरिषद संपामध्ये सहभागी झाल्या आहेत. पगार वाढ, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अग्निशमन यंत्रणा आणि पाणी पुरवठा सोडून सर्व विभागातील कर्मचारी संपावर आहेत.
-
फोगाट प्रकरणात मोदींचा पी. टी. उषा यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी बोलले आणि पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली. मोदींनी पी टी उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, असेही त्यांनी पीटी उषा यांना सांगितले आहे.
-
खडकवासला मतदारसंघावर शिंदे गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता
खडकवासल्यात सध्या भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने आमदार नावाचा केक कार्यकर्त्यानी केला कटिंग. खडकवासल्यात शिंदे गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता
-
कल्याण बाजार पेठ पोलिसांचा गजब कारभार
पत्नीला डोसा उशिरा दिल्याने संतप्त पतीने भर चौकात मारहाण करत केली तोडफोड. तोडफोडचा व्हिडीओ सोशल साईडवर वायरल मात्र पोलीस ठाण्यात कोणताच गुन्हा दाखल आश्चर्य व्यक्त केले जात आहे
-
मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीच्या दुसरा टप्पा
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीच्या दुसरा टप्पा आजपासून सोलापुरातून सुरुवात. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव सोलापुरात दाखल
-
नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुणेकरांची लूट आहे
पूरग्रस्तांचे अजून पंचनामे पूर्ण नाहीत, मदत नेमकी कधी मिळणार? मुख्यमंत्री येऊन गेलेत घोषणाबाजी करुन गेलेत. ठेकेदार आणि प्रशासन एकत्र काम करत आहेत
-
ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट अपात्र, लोकसभेत गोंधळ
ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर लोकसभेत गोंधळ निर्माण झाला आहे. विरोधकांकडून घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यात येत आहे. क्रीडामंत्री दुपारी 3 वाजता संसदेत निवेदन देणार आहेत.
-
निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर
निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार आहे. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी केली जाणार आहे.
-
मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर
मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत- उद्धव ठाकरे
“बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्या संदर्भात काय इशारा द्याल? बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असतील, त्या बातम्यात येत आहेत, हे खरं असेल तर अधिवेशन सुरू आहे. काल-परवा सर्वपक्षीय बैठक गृहमंत्र्यांनी बोलवली होती. जी माहिती तुमच्याकडून मिळतेय, तीच माहिती त्या बैठकीत मिळत असेल तर अर्थ नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
भारताला मोठा धक्का; कुस्तीपटू विनेश फोगट फायनल खेळू शकणार नाही
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला महिलांच्या 50 किलो वजनाच्या कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. 50 किलोपेक्षा काही ग्रॅम वजन वाढल्याने ती फायनलसाठी अपात्र ठरली आहे.
-
बांगलादेशातील स्थितीवरून उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
“संसदेत चर्चेनं आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. जनता सर्वोच्च, सत्तेत असलेल्यांनी याची जाणीव ठेवावी”, असं म्हणत बांगलादेशातील स्थितीवरून उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला आहे.
-
केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करावं – उद्धव ठाकरे
बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असतील तर सरकारने पावलं उचलली पाहिजेत. तेथील हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. शेख हसीना यांना भारतात आश्रय देताय, मग केंद्राने बांगलादेशमधील हिंदूंचं संरक्षण करावं, ती सरकारची जबाबदारी आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
-
जनतेच्या सहनशीलतेचा अंत राज्यकर्त्यांनी पाहू नये – उद्धव ठाकरे
सर्वसामान्य जनता ही सगळ्या मजबूत असते. तिच्या सहनशीलतेचा अंत राज्यकर्त्यांनी पाहू नये. तो जर पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं ते वेळोवेळी दिसतं. बांगलादेशच्या घटनेवरूही ते स्पष्ट दिसतंय, अस उद्धव ठाकरे म्हणाले.
-
लोकसभेनंतर मी प्रथमच दिल्लीत, अनेकांची भेट घेतली – उद्धव ठाकरे
लोकसभेनंतर मी दिल्लीत आलो नव्हतो, खासदारांना भेटायचं होतं. दिल्लीत माझी अनेकांसोबत भेट झाली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
पंजाब : अमृतसरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन सुरू
पंजाब : अमृतसरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडणार आहे. ओबीसींच्या मागण्यांचे 30 ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
मराठा ठोक मोर्चाचे प्रतिनिधी आज ‘वर्षा’ निवासस्थानी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
मराठा ठोक मोर्चाचे प्रतिनिधी आज मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाणार आहेत. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका जाणून घेणार. काल त्यांनी देवेंद्र फडमवीस यांची भेट घेतली होती.
-
अजित दादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिलाय – योगेश चिले यांची टीका
अजित दादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिलाय. मिटकरी घासलेट चोर म्हणून ओळखले जातील, अशी टीका मनसे नेते योगेश चिले यांनी केली आहे. मिटकरींची आमच्यावर बोलण्याची लायकी नाही, असेही ते म्हणाले.
-
जरांगेंना फोन करणार हे सांगणं म्हणजे राज ठाकरेंची पळवाट – मनोज जरांगेंची टीका
जरांगेंना फोन करणार हे सांगणं म्हणजे राज ठाकरेंची पळवाट होती, अशी जोरदार टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. राज ठाकरे फोन करणार नाहीत, ते भेटणारही नाहीत असंहील जरांगे पाटील म्हणाले.
-
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी, शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात दाखल
पक्ष बदलानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्रानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
-
9 ऑगस्ट क्रांतीदिनी संभाजीनगरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारचा आक्रोश मोर्चा
9 ऑगस्ट क्रांतीदिनी संभाजीनगरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत प्रहारची लक्षवेधी बॅनरबाजी करण्यात आली असून प्रहारकडून सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढण्यात आले. दिव्यांग शेतकरी शेतमजूर यांच्या हक्कासाठी बच्चू कडूंचा संभाजी नगरात आक्रोश मोर्चा. संपूर्ण राज्यातून लोक संभाजी नगरात 9 ऑगस्ट रोजी दाखल होतील.
-
नवी दिल्ली – सांगलीचे खासदार विशाल पाटील, उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल
सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. हे दोन्ही नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मिलिंद नार्वेकरही यावेळी उपस्थित आहेत.
-
Maharashtra News : जळगावात सततच्या पावासाचा या पिकाला फटका
जळगाव तालुक्यासह अनेक भागात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे उडीद पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. उडीद पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होवून लष्करी अळी पिकाची पाने खाऊन लागलेल्या शेंगा नष्ट करत असल्याने नुकसान होत असल्याचे चित्र. लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळे जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होवून उडीद पिकाच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शेतकऱ्यांची माहिती.
-
Maharashtra News : विनेश फोगाटच यश हा सत्याचा विजय – सुप्रिया सुळे
“विनेश फोगाटच यश हा सत्याचा विजय आहे. शेवटी त्या भारताच्या लेकीने जग गाजवलं. याचा आम्हाला अभिमान आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचे कौतुक केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करताना कधीच दडपण आले नाही. आजही शिवसेनेचा छोटा मोठा कार्यकर्ता आमच्यासाठी प्रियच” असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
Maharashtra News : संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
उद्धव ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. विधानसभा निवडणुकीसंदर्भात ते काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करतील. दरम्यान संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे.
-
Maharashtra News : अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधारा ओव्हर फ्लो
भीमा नदीला पूर आल्याने अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी गावातील अनेक शेतांमध्ये घुसले पाणी. अक्कलकोट तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला पूर. हिळ्ळी गावातील नदीपात्रालगतच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान. सध्या पूरस्थिती नियंत्रणात मात्र आणखी पाणीपातळी वाढल्यास हिळ्ळी गावात पाणी शिरण्याची शक्यता. ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना.
-
Maharashtra News: बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाचा फटका कांद्याला
बांगलादेश मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाचा फटका कांद्याला… भारत-बांगलादेश सीमेवर नाशिक मधून गेलेले कांद्याचे अनेक ट्रक अडकल्याची माहिती… 70 ते 80 ट्रक बांगलादेशच्या सीमेवर अडकल्याची माहिती… बांगलादेशमध्ये 80 हजार टन कांद्याच्या निर्यातसाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी दिली होती परवानगी… नाशिकमधून बांगलादेशमध्ये होत होता कांद्याचा मोठ्या प्रमाणात निर्यात… सीमा सुरु होण्यासाठी अजून पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता
-
Maharashtra News: विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण
विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण… अजित पवारांसोबत असलेल्या 41 आमदारांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष… 25 टक्के आमदारांच्या मतदारसंघातील सर्वे सकारात्मक… पहिल्यांदा निवडून आलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळवण्याचे संकेत… इतर आमदारांबाबत कोणती भूमिका घेतली जाणार?
-
Maharashtra News: पुणे शहरात आज पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात
पुणे शहरात आज पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात दोन दिवसापासून पूर्णतः विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी… पुणे शहरासह उपनगरात आज दिवसभर रिमझीम पावसाचा अंदाज… पुणे शहरासह जिल्ह्याला आज आणि उद्या हवामान खात्याचा यलो अलर्ट… तर घाटमाथ्यावर देखील आज आणि उद्या पावसाचा अंदाज
-
Maharashtra News: कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं – रावसाहेब दानवे
कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं… जरांगेंचं समाधान होत नाही, अपेक्षा जास्त… मराठ्यांना आरक्षण देणार, असं मविआनं जाहीरनाम्यात टाकावं… रावसाहेब दानवेंचं मविआला आवाहन
-
Maharashtra News: राज ठाकरेंनी आरक्षण नको अशी भूमिका मांडली – रामदास आठवले
राज ठाकरेंनी आरक्षण नको अशी भूमिका मांडली… अशा भूमिका मांडल्या तर मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकावा… राज ठाकरेंच्या आरक्षणावरील भूमिकेवरुन आठवलेंची प्रतिक्रिया
-
Maharashtra News: पुण्यातील धरणावर आढळली महाकाय मगर
पुण्यातील धरणावर आढळली महाकाय मगर… वरसगाव धरणाच्या भिंतीवर मगर दिसल्याने खळबळ… वन विभगाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचऱ्यांनी रेसक्यु ऑपरेशन केल्यानंतर मगरीला पकडले… मध्यरात्री उशिरा मगरीला पकडण्यात आले यश…
-
Marathi News: पुणे येथील 29 बंगले पडणार
पिंपरी चिंचवड शहराच्या चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूर रेषेत बांधलेले 29 बंगले पाडण्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या परिसरातील रहिवाशांचा अर्ज फेटाळत न्यायालयाने त्यांना पाच कोटींचा दंडही केला आहे.
-
Marathi News: ठाण्यात लाडकी बहीण योजनेचे काम पूर्ण
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या, पहिल्या टप्प्यातील ९५ हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने शनिवार ०३ ऑगस्ट ते सोमवार ०५ ऑगस्ट या तीन दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे.
-
Marathi News: पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २०४ मतदान केंद्रांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ८४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
-
Marathi News: उद्धव ठाकरे आज काँग्रेस नेत्यांना भेटणार
शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आज काँग्रेस नेत्यांना दिल्लीत भेटणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी (शपा)पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत.
Published On - Aug 07,2024 8:13 AM