Maharashtra Breaking News LIVE : कोकण रेल्वेची वाहतूक अखेर 25 तासांनंतर सुरू

| Updated on: Jul 16, 2024 | 8:27 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 15 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : कोकण रेल्वेची वाहतूक अखेर 25 तासांनंतर सुरू

कोकणात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे अनेक नद्यांनी रौदरुप धारण केले आहे. खेडमधील जगबुडी, नारंगी नदी, चिपळूणची वशिष्टी, मंडणगडमधील भारज नदी आणि नागोठण्याच्या अंबा नदीला पूर आला आहे. त्यामुळे रस्ते, शेती पाण्याखाली गेली आहे, तर अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. तसेच मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका बसला आहे. खेड ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यासोबत रत्नागिरी, रायगडला ‘रेड अलर्ट’ही देण्यात आला आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणही तापलं आहे. अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jul 2024 07:51 PM (IST)

    हुश्श! 25 तासांच्या खोलंब्यानंतर अखेर कोकण रेल्वे ट्रॅकवर, प्रवाशांना दिलासा

    अखेर 25 तासांच्या खोलंब्यानंतर कोकण रेल्वे ट्रॅकवर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाणखवटी रेल्वे स्थानकानजीत रूळावर दरड कोसळल्याने रेल्वेसेवा विस्कळित झाली होती. मात्र रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाली आहे.

  • 15 Jul 2024 07:36 PM (IST)

    पावसामुळे पिकांना नवसंजीवनी

    वाशिममध्ये दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे . पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळत आहे. तसेच सतत पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढही होत आहे.

  • 15 Jul 2024 07:27 PM (IST)

    एफसी रोडवर कारवाईला सुरुवात

    पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उचलला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून एफसी रोडवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली आहे.

  • 15 Jul 2024 07:07 PM (IST)

    महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

    एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त पदं ही 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा आणि प्रकल्पस्तरावर देण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा, असं आवाहनही शासनाकडून करण्यात आलं आहे.

  • 15 Jul 2024 07:00 PM (IST)

    खेड रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांचा राडा

    खेडमध्ये स्टेशन मास्तराच्या केबिनमध्ये प्रवासी घुसले. यामुळे एकच गोंधळ उडाला. 24 तास होत आले तरी रेल्वेकडून काहीच माहिती मिळत नसल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. यामुळे प्रवाशी थेट स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये शिरले आणि मार्ग कधी सुरळीत होणार याचा जाब विचारत आहेत.

  • 15 Jul 2024 06:45 PM (IST)

    पंढरपुरच्या वेशीवर वारकऱ्यांना मोफत तेल मसाज

    पंढरीच्या वेशीवर वारकरी येऊन पोहोचलेत. वारीत अनेक किमी चाललेल्या पायांना विश्रांती देण्यासाठी पंढरपुरच्या वेशीवर वारकरी यांना मोफत तेल मसाज करुन दिला जात आहे. पितांबरीकडून विशेष आयुर्वेदिक तेलाने तरुण सेवेकरी वारकऱ्यांच्या पायांना मसाज करुन देत आहेत. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असा सेवाभाव तरुण सेवेकरी व्यक्त करत आहेत.

  • 15 Jul 2024 06:33 PM (IST)

    पीकविमा भरण्यासाठी केंद्राची मुदतवाढ

    महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा भरण्याची मुदत वाढवली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी केली होती. 31 जुलैपर्यंत पीकविमा भरण्यासाठी केंद्राने मुदतवाढ दिली आहे.

  • 15 Jul 2024 06:04 PM (IST)

    आदर्श तलाठी सापडला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

    कडेगाव महसूल विभागात आदर्श तलाठी पुरस्कारप्राप्त तलाठी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. कडेगावमधील अशा सर्व भ्रष्ट अधिकारी आणि दिरंगाई कारभाराविरोधात डी. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हलगी वाजवत विराट मोर्चा काढला. अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रस्त्यावर घेऊ असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

  • 15 Jul 2024 05:45 PM (IST)

    विशाळगडावर जे काही घडलं ते का घडलं याचं चिंतन सरकारने करायला हवं- संभाजीराजे

    शाहू महारांजांच्य भूमीत सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना आपण न्याय देतो. विशाळगडावर जे काही घडलं ते का घडलं याचं चिंतन सरकारने करायला हवं, असं छत्रपती संभाजीाराजे म्हणाले.

  • 15 Jul 2024 05:35 PM (IST)

    माझं म्हणणे पुढे मांडणार, समिती जो काही आहे तो निर्णय घेईल- पूजा खेडकर

    भारतीय संविधान प्रमाणे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती दोषी आहे असे म्हणता येत नाही. माझं म्हणणे समिती पुढे मांडणार समिती जो काही आहे तो निर्णय घेईल. हे सगळं जे काही होत आहे ते लोक बघत असतात यात जे काही सत्य आहे ते पुढे येईल, असं पूजा खेडकरने म्हटलं आहे.

  • 15 Jul 2024 05:19 PM (IST)

    जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका- छत्रपती संभाजीराजे 

    माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला पोलिसांकडून उत्तर मिळालं नाही. जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका. हा प्रश्न वरिष्ठांच्या पातळीवर सोडवला जावा. सीएम, डीसीएमसोबत बैठक व्हावी ही भूमिका होती- छत्रपती संभाजीराजे

  • 15 Jul 2024 05:15 PM (IST)

    शिवभक्तांऐवजी मला जबाबदार धरा- छत्रपती संभाजीराजे 

    जे घडलं त्याचं मी समर्थन करत नाही. शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी माझ्यावर करा, शिवभक्तांऐवजी मला जबाबदार धरा. गुन्हा दाखल केला म्हणून मी पोलीस ठाण्यात हजर हजर झालो- छत्रपती संभाजीराजे

  • 15 Jul 2024 04:57 PM (IST)

    संभाजीराजे छत्रपती यांचे पोलिसांना खडे सवाल

    संभाजीराजे छत्रपती गेल्या दोन तासापासून शाहुवाडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल आहे की नाही सांगा, असा सवाल संभाजीराजे यांनी पोलिसांना केला आहे. मात्र पोलिसांकडून उत्तरच मिळत नसल्यामुळे संभाजीराजे पोलीस स्टेशनमध्येच आहेत. जो पर्यंत उत्तर मिळत नाही आणि शिवभक्तांवरील कारवाई मागे घेतली जात नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून बाहेर पडणार नाही, अशी भूमिका संभाजी राजे यांनी घेतलीय.

  • 15 Jul 2024 04:45 PM (IST)

    अहमदनगरमध्ये पावसाला सुरुवात

    अहमदनगर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून होते ढगाळ वातावरण, पाऊस पडल्याने उघड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.  तर नाले सफाई न झाल्याने शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. शहरातील सखोल भागात पाणी साचलंय.

  • 15 Jul 2024 04:30 PM (IST)

    चिपळूण शहरात जोरदार पाऊस

    चिपळूण शहरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन ते चार तास रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण शहराला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा चिपळूण शहरात जोरदार हजेरी लावली आहे. पुढील दोन तास शहरात पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

  • 15 Jul 2024 04:20 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीकडून दाखल असलेल्या गुन्ह्याबाबतची सुनावणी सात ऑगस्टपर्यंत टळली.  दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी होणार होती. ईडीने जामीन अर्जाला विरोध केला.  ईडीच्या अर्जावर आज सुनावणी होणार होती.

  • 15 Jul 2024 04:10 PM (IST)

    कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मोठी अपडेट

    कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. NIA च्या अटकेत असलेल्या ज्योती जगताप यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच. जगताप यांना अंतरिम जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. अंतरिम जामिनाच्या प्रकरणावर नाही तर मुख्य प्रकरणावर सुनावणी करावी लागेल , असंही कोर्टाने म्हटलं आहे. सुनावणीसाठी पुढची तारीख लवकरच कोर्ट देणार आहे.

  • 15 Jul 2024 02:40 PM (IST)

    कोल्हापूर – संभाजी राजे छत्रपती शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल

    संभाजी राजे छत्रपती शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल.  अतिरिक्त पोलीस अधीक्षक निखेश खाटमोडे पाटील शाहुवाडी पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित आहेत.  संभाजीराजे खाटमोडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. विशाळगड अतिक्रमणविरोधी आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • 15 Jul 2024 02:16 PM (IST)

    अहमदनगर – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्रे सापडली

    आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्रे सापडली. आज जिल्हा शल्यचिकित्सक संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक होणार आहे.

    जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. आज ही सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर केली जातील.

  • 15 Jul 2024 02:08 PM (IST)

    महायुती सरकार 100% अस्वस्थ – जितेंद्र आव्हाड

    महायुती सरकार पूर्णपणे अस्वस्थ झालं आहे. आमदार विकत घेतले जाऊ शकतात, पण जनता विकत घेऊ शकत नाही

  • 15 Jul 2024 02:05 PM (IST)

    सांगली – सळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी पात्राबाहेर पडली, दोन गावांचा संपर्क तुटला

    सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकाठ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे. दोन गावांचा संपर्क तुटला आहे.  गेल्या चोवीस तासात पाणीपातळीत सुमारे साडे चौदा फुटांची वाढ झाली आहे. पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नागठाणे शिरगाव गावचा संपर्क तुटला आहे.

  • 15 Jul 2024 01:58 PM (IST)

    वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्रे सापडली

    आज जिल्हा शल्यचिकित्सक संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर करणार असल्याची माहिती. सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची होणार बैठक…

  • 15 Jul 2024 01:28 PM (IST)

    राज्यात ओबीसी आरक्षण देण्याच काम पवारांनी केले

    आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती आहे. मराठा समाजाचे लोक दुसऱ्या समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत आणि इतर समाजाचे लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत.

  • 15 Jul 2024 01:05 PM (IST)

    प्रश्न सोडवण्यासाठी पवार तयार- भुजबळ

    नुकताच छगन भुजबळ यांनी म्हटले की, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार तयार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.

  • 15 Jul 2024 01:03 PM (IST)

    मला राजकारण आणि मंत्रीपदाची पर्वा नाही- भुजबळ

    छगन भुजबळ यांनी नुकताच शरद पवार यांची भेट घेतलीये, त्यानंतर त्यांनी बोलताना म्हटले की, मला राजकारण आणि मंत्रीपदाची पर्वा अजिबात नाहीये…

  • 15 Jul 2024 01:02 PM (IST)

    कुठे कुठे काय झाले यावर चर्चा- भुजबळ

    नुकताच शरद पवार यांची भेट छनग भुजबळ यांनी घेतली असून त्यांनी म्हटले की, राज्यात कुठे कुठे काय झाले यावर शरद पवार यांच्यासोबत चर्चा आहे.

  • 15 Jul 2024 12:58 PM (IST)

    आरक्षणावरून काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती- छगन भुजबळ

    पत्रकार परिषदेत भुजबळ म्हणाले, “आरक्षणावरून काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती आहे. आरक्षणावरून राज्यात निर्माण झालेली परिस्थिती त्यांना सांगितली. पवारांना मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतराची आठवण करून दिली. शिंदेंनी जरांगेंना काय आश्वासन दिलं माहित नाही, असं पवार म्हणाले.”

  • 15 Jul 2024 12:55 PM (IST)

    छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद

    “आज मी शरद पवारांची भेट घेतली. सव्वादहा वाजता पवारांच्या भेटीला गेलो. मी गेलो तेव्हा ते झोपलेले होते. ते उठल्यानंतर आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी कोणतीही भूमिका घेऊन त्यांच्याकडे गेलो नाही”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

  • 15 Jul 2024 12:50 PM (IST)

    ज्योती जगताप यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच

    नवी दिल्ली – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी NIA च्या अटकेत असलेल्या ज्योती जगताप यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही. जगताप यांना अंतरिम जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. अंतरिम जामिनाच्या प्रकरणावर नाही तर मुख्य प्रकरणावर सुनावणी करावी लागेल, असं कोर्ट म्हणालं. सुनावणीसाठी पुढची तारीख लवकरच कोर्ट देणार आहे.

  • 15 Jul 2024 12:40 PM (IST)

    काल रात्रीपासून अनेक प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकावर अडकून

    काल रात्रीपासून अनेक प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकावर अडकून आहेत. चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा आहेत. पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक प्रवासी रात्रीपासून पाणी आणि जेवणाविना रेल्वे स्थानकावर अडकले आहेत.

  • 15 Jul 2024 12:31 PM (IST)

    थोड्याच वेळाच छगन भुजबळांची पत्रकार परिषद

    छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर बंगल्यावर जाऊन बोलणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा होती.

  • 15 Jul 2024 12:30 PM (IST)

    भुजबळ-पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर चर्चा

    छगन भुजबळ यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. भुजबळ महायुतीत नाराज होते, अशी चर्चा आहे.

  • 15 Jul 2024 12:20 PM (IST)

    छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

    छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळांना परत घेणार का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “आम्ही जर-तरवर राजकारण करत नाही. आम्ही खूप गांभीर्याने राजकारण करतो. आम्ही कोणा व्यक्तीसाठी राजकारण करत नाही.  लोकांसाठी आम्ही राजकारण करतो. भुजबळांची महायुतीत हेळसांड होतेय याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीत कोण येणार हा संघटनेचा निर्णय असेल.”

  • 15 Jul 2024 12:10 PM (IST)

    मी यावर काही बोलणार नाही- पूजा खेडकर

    वाशिम- “मी यावर काही बोलणार नाही. यावर मी माध्यमांपुढे काही बोलणार नाही. मी जे काही बोलणार ते समितीपुढे बोलणार. जे काही मला विचारलं जाणार, त्याची उतरं मी समितीपुढे देणार,” अशी प्रतिक्रिया पूजा खेडकर यांनी दिली.

  • 15 Jul 2024 11:55 AM (IST)

    Maharashtra News : महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर बलात्कार

    महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर बलात्कार. अकादमी मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराने 11 तारखेला केला अत्याचार. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • 15 Jul 2024 11:40 AM (IST)

    Maharashtra News : मनोरमा खेडकर यांचा फोन बंद

    पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा फोन बंद. त्यांचा शोध सध्या घेतला जातोय. कोणताही संपर्क त्यांच्याशी होत नाहीये. त्यांचे फोन बंद आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांची माहिती.

  • 15 Jul 2024 11:28 AM (IST)

    Maharashtra News : दादा भुसे छगन भुजबळ-शरद पवार भेटीवर काय म्हणाले?

    “या प्रश्नांचा उत्तर भुजबळ साहेबच देतील. ते कुठल्या कामासाठी गेले आहेत ते सांगू शकतील. भुजबळ साहेब यांनी शरद पवार साहेब यांच्या सोबत काम केले आहे. त्यामुळे या भेटी बाबत तेच सांगू शकतील. आपल्या महाराष्ट्राची हीच संस्कृती आहे. सध्या आरक्षण मुद्यावर जी परिस्थिती निर्माण झाली, त्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न होऊ शकेल. ओबीसी मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीला विरोधी पक्ष नेते आले नाहीत” असं दादा भुसे छगन भुजबळ-शरद पवार भेटीवर म्हणाले.

  • 15 Jul 2024 11:21 AM (IST)

    Maharashtra News : चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

    चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. रेल्वे वाहतुकीला पावसाचा मोठा फटका. कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द. चिपळूण रेल्वे स्थानकात देखील प्रवाशांची गर्दी. रेल्वे स्थानकातून सोडल्या जात आहेत प्रवाशांसाठी एसटी बसेस. रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांच्या बससाठी लांबच लांब रांगा.

  • 15 Jul 2024 10:57 AM (IST)

    Maharashtra News: पुण्यात आज पूजा खेडकर यांच्या आई विरोधात पुणेकरांचं आंदोलन

    पुण्यात आज पूजा खेडकर यांच्या आई विरोधात पुणेकरांनी आंदोलन केलं… पिस्तुल दाखवून धमकलवल्या प्रकरणी कारवाई करा अशी मागणी आज यावेळी करण्यात आली… भीक मागो आंदोलन करत आज खेडकर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं…

  • 15 Jul 2024 10:41 AM (IST)

    Maharashtra News: जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत चोरट्यांनी तेरा तोळे वजनाच्या सोनसाखळ्या केल्या लंपास

    जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील शांतता रॅली मधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पाच लाख रुपये किमतीच्या आणि तेरा तोळे वजनाच्या तीन सोनसाखळ्या लंपास केल्या. या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात दोन तर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • 15 Jul 2024 10:27 AM (IST)

    Maharashtra News: थोड्याच वेळात भुजबळ सिल्व्हर ओकवर जाणार – सूत्र

    थोड्याच वेळात भुजबळ सिल्व्हर ओकवर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात… भुजबळांनी कालच नाव न घेता शरद पवारांवर मोठा आरोप केला होता…

  • 15 Jul 2024 10:25 AM (IST)

    Maharashtra News: विशाळगड परिसरात जाळपोळ , वाहनांची आणि घराची तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    विशाळगड परिसरात जाळपोळ , वाहनांची आणि घराची तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल… पुण्याचे रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांच्यावर गुन्हा दखल… संभाजी राजे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांची माहिती… विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लावल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर.

  • 15 Jul 2024 10:18 AM (IST)

    Maharashtra News: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच…

    रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच… पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात… जिल्हात 24 तासात तब्बल 145 मिलिमीटर पाऊस… जिल्ह्यात 54 टक्के पाऊस बरसाला… गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत 32% पाऊस

  • 15 Jul 2024 09:57 AM (IST)

    Marathi News : ठाण्यात डेंग्यूचा ‘ताप’ वाढला

    ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन महिन्यांत डेंग्यूच्या जवळपास ३८ रुग्णांची नोंद झाली. ठाणे पालिका क्षेत्रांत २६ डेंग्यूच्या रुग्णांची नोद झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मे पेक्षा जून महिन्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

  • 15 Jul 2024 09:44 AM (IST)

    Marathi News : नाशिक जिल्ह्यात पाणीसाठ्या वाढ

    गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या परिसरात असलेल्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा धरणात 40% तर गंगापूर धरणात 33 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

  • 15 Jul 2024 09:29 AM (IST)

    Marathi News : मुंबईत सरासरीच्या ४५ टक्के पाऊस

    मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४५ टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यापर्यंत ३० टक्के पाऊस पडला होता. धरणक्षेत्रात मात्र पाऊस अद्याप कमी असून पाणीसाठा केवळ २९ टक्के आहे.

  • 15 Jul 2024 09:04 AM (IST)

    Marathi News : चिपळूण शहरात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात

    चिपळूण शहरात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. चिपळूण शहरात गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे. चिपळूणसह शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

  • 15 Jul 2024 08:37 AM (IST)

    Maharashtra Breaking News LIVE : नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

    Maharashtra Breaking News LIVE :  नाशिकमध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानंतर यंत्रणा सतर्क झाली आहे. आपत्कालीन विभागाच्या सर्व विभागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 15 Jul 2024 08:35 AM (IST)

    Maharashtra Breaking News LIVE : लोणावळ्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलली

    Maharashtra Breaking News LIVE : लोणावळ्यात धबधबे खळखळून वाहू लागले. मावळात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात येथील पर्यटनस्थळ निसर्गरम्य असल्याने पर्यटकांनी फुलली आहेत.

    लोणावळ्यातील धबधबे खळखळून वाहू लागलेत. हिरवेगार डोंगर आणि पांढरा शुभ्र धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. लोणावळ्यातील धबधबे पर्यटकांचे आकर्षण केंद्र असले तरी मात्र सहारा ब्रिज जवळील धबधब्याच्या वरच्या भागांत जाण्यास पर्यटकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी काही हौशी पर्यटक या धबधब्याच्या वरच्या भागांत जात असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याच्या खाली पर्यटक मनमुरादपणे भिजण्याचा आनंद घेत आहेत

  • 15 Jul 2024 08:32 AM (IST)

    Maharashtra Breaking News LIVE : चिपळूणमध्ये पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार पाऊस सुरु

    चिपळूण – खेड मार्गांवर जोरदार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे. रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच असल्याचे दिसत आहे.

  • 15 Jul 2024 08:30 AM (IST)

    Maharashtra Breaking News LIVE : दिवाणखवटी रेल्वे स्थानकावर रुळावर माती आल्याने कोकण रेल्वे ठप्प

    दिवाणखवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळावर माती आल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. चिपळूण रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी रेल्वेची वाट पाहत ताटकळत बसलेले आहेत.

Published On - Jul 15,2024 8:21 AM

Follow us
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....