Maharashtra Breaking News LIVE : अभिनेत्री खासदार कंगना राणावतची महाराष्ट्र सदनाला पसंती

| Updated on: Jun 25, 2024 | 9:09 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 24 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : अभिनेत्री खासदार कंगना राणावतची महाराष्ट्र सदनाला पसंती

नवीन सरकारचे पहिले अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात पहिले दोन दिवस नवीन खासदारांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिभाषणासाठी धन्यवाद प्रस्ताव मांडून चर्चेला सुरुवात करणार आहेत. नीट घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करणार आहे. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी  दुपारी मंदिर समितीच्या वतीने आमंत्रण दिले जाणार आहे. पुण्यात महविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. आठ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तीन, काँग्रेस तीन तर शिवसेना ठाकरे पक्ष दोन जागा लढणार असल्याचे सांगितले जात आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jun 2024 08:13 PM (IST)

    पुण्याच्या नामांकीत हॉटेलमधील 6 वेटर अटकेत

    पुण्यातील L3 बार मधील पार्टी प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. L3 बारमधील 6 वेटर्सना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आली आहे.  त्या सर्वांना 29 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे मद्याचा साठा जमा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. परवानगी नसताना दुसऱ्या मजल्यावर मद्याची विक्री केल्याप्रकरणी वेटरांनाही अटक करण्यात आली आहे.

  • 24 Jun 2024 07:26 PM (IST)

    राज्यात लवकरच राईट टू हेल्थ कायदा लागू करणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

    पंढरपूर : राज्यात लवकरच राईट टू हेल्थ कायदा लागू करणार, अशी घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. राईट टू हेल्थ कायदा राबवणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य असणार आहे. राजस्थानमध्ये राईट टू हेल्थ हा कायदा अस्तित्वात आहे. या किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचं विधेयक पास करून अधिवेशनात लवकरच मंजूर केलं जाईल, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

  • 24 Jun 2024 06:52 PM (IST)

    केजरीवाल यांच्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येणार

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांचे न्यायालय दुपारी अडीच वाजता निकाल देणार आहे.

  • 24 Jun 2024 06:37 PM (IST)

    झाडे तोडल्याप्रकरणी ‘आप’ने एलजीचा राजीनामा मागितला

    दिल्लीतील आम आदमी पक्षाने उपराज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीतील 1100 झाडे तोडल्याचा दाखला देत उपराज्यपालांना घेराव घातला आणि राजीनामा मागितला. उपराज्यपालांनी बेकायदेशीरपणे 1100 झाडे तोडल्याचा दावा त्यांनी केला.

  • 24 Jun 2024 06:25 PM (IST)

    जेपी नड्डा राज्यसभेतील सभागृह नेते

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आधी पियुष गोयल होते, पण आता ते लोकसभेचे खासदार आहेत.

  • 24 Jun 2024 06:10 PM (IST)

    क्रिमियावरील हल्ल्यानंतर रशियाने अमेरिकेला दिला इशारा

    रशियाने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. क्रिमियावरील हल्ल्यासंदर्भात रशियाने ही धमकी दिली आहे. रशियाने प्रत्युत्तराच्या कारवाईबद्दल बोलले आहे. अमेरिकेच्या राजदूताला बोलावून रशियाने हा इशारा दिला आहे. क्रिमियावर झालेल्या ATACMS क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी रशियाने अमेरिकेला जबाबदार धरले आहे.

  • 24 Jun 2024 05:32 PM (IST)

    खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना राणावत महाराष्ट्र सदनात दाखल

    अभिनेत्री खासदार कंगना राणावतची महाराष्ट्र सदनाला पसंती मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना राणावत महाराष्ट्र सदनात दाखल झाल्या. यापुढे दिल्लीतील वास्तव्यासाठी महाराष्ट्र सदनातील रूमची चाचपणी करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. तसेच शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना राणावत महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 24 Jun 2024 05:09 PM (IST)

    8 ही आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

    पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपींना 5 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आलीय.

  • 24 Jun 2024 04:40 PM (IST)

    पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरण : सर्व 8 ही आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी.

    पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरण : ड्रग्स प्रकरणातील सर्व 8 ही आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी. आरोपींना 5 दिवसांची पोसील कोठडी.

  • 24 Jun 2024 04:20 PM (IST)

    नीट आणि यूजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाण याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी

    लातूर : नीट आणि यूजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाण याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आलीये. नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याचा आरोप जलील पठाण आणि त्याच्या सहकाऱ्यावर करण्यात आलाय. दरम्यान आज आरोपी जलील पठाण याला कोर्टात हजर करण्यात आले होते.

  • 24 Jun 2024 04:14 PM (IST)

    राज्यसभेच्या नेतेपदी भाजप अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची नियुक्ती.

    येत्या 27 जून पासून राज्यसभेचे अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनात जे पी नड्डा हे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून भूमिका बजावतील. यापूर्वी राज्यसभेच्या नेतेपदी पियुष गोयल हे कार्यरत होते मात्र आता लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांनी हे पद सोडले आहे

  • 24 Jun 2024 02:59 PM (IST)

    मुख्यमंत्र्याच्या भंडारा दौऱ्यावेळी मिडीया घेऊन जाणारी बोड बुडाली

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • 24 Jun 2024 02:27 PM (IST)

    डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले

    छत्रपती संभाजीनगरात मराठा संघटना आक्रमक झाली असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंतरवालीतील उपोषणाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारख यांच्या काळे फासण्यात आले आहे.

  • 24 Jun 2024 02:24 PM (IST)

    पाण्यावरून नाशिक जिल्ह्यात संघर्ष सुरु

    पावसाने ओढ दिल्याने पाण्यावरून नाशिक जिल्ह्यात संघर्ष सुरु असून पोलीस बंदोबस्तात नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

  • 24 Jun 2024 01:49 PM (IST)

    नीट परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट

    नीट परीक्षेच्या घोटाळ्याचे कलेक्शन लातूरपर्यंत पोहचले आहे.

  • 24 Jun 2024 01:25 PM (IST)

    एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्याने माथाडी वर्ग आक्रमक 

    माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट केले बंद. सर्व माथाडी मापाडी यांच्यासह मनपा मुख्यालयावर काढणार मोर्चा.

  • 24 Jun 2024 01:18 PM (IST)

    खासदार उन्मेष पाटील तसेच माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

    किसनराव जोर्वेकर यांच्यासह माजी खासदार उन्मेष पाटील तसेच माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.

  • 24 Jun 2024 01:11 PM (IST)

    चाळीसगाव येथे भाजपकडून आंदोलन

    चाळीसगाव येथे भाजपकडून सुरू असलेल्या आंदोलनात साहेबराव काळे या वयोवृद्ध कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात.

  • 24 Jun 2024 12:57 PM (IST)

    अजित पवार आणि नाना पटोलेंची बैठक

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बैठक सुरु आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरु आहे. साकोली विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात ही बैठक सुरु आहे.

  • 24 Jun 2024 12:45 PM (IST)

    पुण्यात पीएचडी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु

    पुण्यात पीएचडी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोनवरून संवाद साधला. राज्यातील सरकारशी चर्चा करुन विषय सोडवण्याचा प्रयत्न करूस असं यावेळी सांगण्यात आलं. बार्टी , सारथी , महाज्योती , पीएचडी च्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. आज पुण्यात काढला पायी लाँग मार्च काढण्यात आला.

  • 24 Jun 2024 12:30 PM (IST)

    अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु

    अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अद्यापपर्यंत केजरीवाल यांच्या जामीनावर निर्णय न घेतल्यानं आप सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. केजरीवाल यांना राऊज एव्येन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.त्या विरोधात इडीने उच्च न्यायालयात अपिल केले होते.  यावर सुनावणी झाली असून दिल्ली उच्च न्यायालयाने अद्यापर्यंत निर्णय दिलेला नाही. असं असताना केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली आहे.

  • 24 Jun 2024 12:15 PM (IST)

    तीन तरुण अन् एका महिलेचं अपहरण

    पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील तीन तरुणांसह एका महिलेला काही अज्ञात इसमाकडून अपहरण करून कारमधून अज्ञात स्थळी नेलं.  लाठ्या काठ्या, कोयता ,तलवारी सह हात पाय बांधून जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

  • 24 Jun 2024 11:53 AM (IST)

    Maharashtra News : ‘माझ्यावर स्टंट करतो असा आरोप केला जातो, मग….’

    “गुटखा, बारच्या पैश्यांवर निवडणुका लढवल्या आणि निवडणुका जिंकल्यात तेच आता नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत. मेधा कुलकर्णी बरोबर बोलत आहेत, यादी दिली त्याचं पुढे काय झालं? माझाही तोच आरोप आहे. त्या सत्तेत आहेत त्यांनी पोलिसांना विचारलं पाहिजे. गृहमंत्री आणि शंभुराज देसाई यांनी राजीनामा दिला पाहिजे. माझ्यावर स्टंट करतो असा आरोप केला जातो, मग अपघात प्रकरणात एवढे लोकं जेलमध्ये कसे गेलेत” असा सवाल काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी विचारला.

  • 24 Jun 2024 11:31 AM (IST)

    Maharashtra News : मराठा नेते मतांचा विचार करतात – मनोज जरांगे पाटील

    “मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्य मागणी कायद्याने केली. त्यामुळे यांना पटत नाही. मी मूळ मुद्दा मांडल्याने ओबीसी नेत्यांचे रंग उघडे पडले आहेत. यामुळे मराठा नेत्यांना सांगतो, सगळे ओबीसी नेते मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळू नये यासाठी मताचा विचार करत नाहीत. मात्र मराठा नेते मतांचा विचार करत आहेत. यामुळे मराठा नेत्यांनी एकत्र आल पाहजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 24 Jun 2024 11:29 AM (IST)

    National News : संसदेच्या पहिल्याच सत्रात मोठा विरोध

    इंडिया आघाडीच्या तिनही सदस्यांचा प्रोटेम स्पीकरच्या पॅनलवर बहिष्कार. काँग्रेसचे के सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू यांचा पॅनेलवर बहिष्कार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिघांनाही प्रोटेम स्पीकरच्या पॅनलमध्ये नियुक्त केले होते. प्रोटेम स्पीकरच्या पॅनलचे तीन सदस्य प्रोटेम स्पीकरला मदत करणार नाहीत. नवीन खासदारांना शपथ देणार नाहीत.

  • 24 Jun 2024 11:10 AM (IST)

    Maharashtra News : पंतप्रधान मोदी यांनी घेतली संसद सदस्यत्वाची शपथ

    संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद सदस्यत्वाची शपथ घेतली. 26 जून रोजी होणार लोकसभा अध्यक्षांची निवड. दोन दिवस नवनिर्वाचीत खासदारांना शपथ दिली जाणार आहे.

  • 24 Jun 2024 11:07 AM (IST)

    Maharashtra News : 13 जुलै पर्यंत आम्ही शांत राहू – मनोज जरांगे पाटील

    “जातीयवाद भुजबळ घडवून आणतोय. सगळ्यांनी एक व्हा. आम्ही कोणत्याही नेत्याला दोष देत नाहीय. आम्ही आरक्षणात आहोत. ओबीसीत आहोत. 13 जुलै पर्यंत आम्ही शांत राहू” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 24 Jun 2024 11:00 AM (IST)

    Maharashtra News | मराठ्यांनो तयार राहा, पण सुरुवात आपल्याला करायची नाही – जरांगे पाटील

    मराठ्यांनो तयार राहा, पण सुरुवात आपल्याला करायची नाही… लेकरांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र या… भुजवळांना दंगली घडवायच्या आहेत… असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 24 Jun 2024 10:47 AM (IST)

    Maharashtra News | पुणे ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाईच्या मुख्यमंत्री – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन… फोनवरून कालच्या प्रकरणाची माहिती घेण्यात आली… याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा… मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना

  • 24 Jun 2024 10:39 AM (IST)

    Maharashtra News | देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली – मोदी

    देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली… नव्या खासदारांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा… देश चालवण्यासाठी सहयोग महत्त्वाचा असतो – मोदी

  • 24 Jun 2024 10:36 AM (IST)

    Maharashtra News | पहिल्यांदाच नव्या संसदेत नव्या खासदारांचा शपथविधी – नरेंद्र मोदी

    संसदेत लोकशाहीचा आजचा दिवस गौरव दिन… पहिल्यांदाच नव्या संसदेत नव्या खासदारांचा शपथविधी… देशाच्या प्रगतीची स्वप्न घेऊन 18 व्या संसदेची आजपासून सुरुवात…  असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

  • 24 Jun 2024 10:30 AM (IST)

    Maharashtra News | राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भाजप करणार मंथन

    राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भाजप करणार मंथन… भाजपची पुढील आठवड्यात मंथन बैठक… रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधे होणार मंथन… बैठकीला भाजपचे राज्यातील वरिष्ठ 20 नेते उपस्थित राहणार… लोकसभेला झालेल्या चुका टाळून विधानसभा निवडणुकीची रणनीती बैठकीत ठरवली जाणार

  • 24 Jun 2024 10:13 AM (IST)

    Maharashtra News | गाफील राहू नका, शिंदेंचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन

    गाफील राहू नका, कार्यकर्त्यांच्या आतिआत्मविश्वासाने आम्हीही गाफील राहिलो… खोटं कथानक पसरविणाऱ्यांना जागृत राहून सडेतोड उत्तर द्या… शिंदेंचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन

  • 24 Jun 2024 10:06 AM (IST)

    Maharashtra News | संसदेत आता मोदी आणि शहांचा आवाज घुमणार नाही – राऊत

    मोदींच्या विरोधात प्रथमत विरोधी पक्षनेता असेल… संसदेत आता मोदी आणि शहांचा आवाज घुमणार नाही… संसदेत आता इंडिया आघाडीचा आवाज घुमणार… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 24 Jun 2024 09:55 AM (IST)

    पुणे ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाई करा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

    पुणे ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाई करा, अशी सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करून कालच्या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी सूचना पोलीस आयुक्तांना दिली.

  • 24 Jun 2024 09:52 AM (IST)

    मुंबई महापालिका आयुक्तांची मुंबईतील प्रश्नांवर बोलती बंद

    मुंबई महापालिका आयुक्तांची मुंबईतील प्रश्नांवर बोलती बंद. आज वांद्रे परिसरात वृक्ष लागवडीनंतर इतर प्रश्नांवर बोलणे आयुक्तांनी टाळलं. पाणी प्रश्न, वृक्षांची व्यवस्थित छाटणी न झाल्यामुळे आणि अपुरी नालेसफाई हे प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहेत. विरोधकांनीही गेले काही दिवस यावर आवाज उठवलेला असतानाही महापालिका आयुक्तांची यावर चुप्पी कायम आहे.

  • 24 Jun 2024 09:28 AM (IST)

    भाजपचे नवीन निवडणूक प्रभारी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार

    भाजपचे नवीन निवडणूक प्रभारी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मंत्री आश्विनी वैष्णव प्रभारी मुंबईत येणार. विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेतला जाणार असून भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

  • 24 Jun 2024 09:22 AM (IST)

    पुणे – ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई

    पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे.  ⁠शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निलंबित. तसेच⁠सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुचनेनंतर कारवाई करण्यात आली.

  • 24 Jun 2024 09:06 AM (IST)

    आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी १० वाजता वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते ,सरचिटणीस, राज्यातील प्रमुख पदाधिकारी राहणार बैठकीसाठी उपस्थित. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक आहे.

    काही दिवसांपूर्वी रंगशारदा सभागृह वांद्रे येथे झालेल्या बैठकीत मनसेने स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय सूचना करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • 24 Jun 2024 08:57 AM (IST)

    Marathi News: अमरावती ग्रामीण पोलिस भर्तीवर पावसाचे सावट

    अमरावती ग्रामीण पोलिस भर्तीवर पावसाचे सावट आहे. पावसामुळे मैदान खराब झाले आहे. यामुळे मैदानी चाचणीसाठी पुढची तारीख द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मैदानी चाचणीसाठी मैदान योग्य नसल्याचा विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

  • 24 Jun 2024 08:42 AM (IST)

    Marathi News: नीट परीक्षा प्रकरणात कठोर कारवाई करा- NSUI

    नीट परीक्षा पेपर फुटी बाबत सध्या देशभर उलट सुलट चर्चा आहे. याप्रकरणी काही संशियतांना ताब्यात घेण्यात आली आहे. पण या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होत असल्याने देशभर निषेध व्यक्त होत असून याबाबत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगली NSUI कडून करण्यात आली आहे.

  • 24 Jun 2024 08:29 AM (IST)

    Marathi News: दापोलीत पावसामुळे रस्ता खचला

    रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणार्‍या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मिटर रस्ता खचला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे.

  • 24 Jun 2024 08:20 AM (IST)

    Marathi News: महविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरला ?

    पुण्यात महविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. आठ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तीन, काँग्रेस तीन तर शिवसेना ठाकरे पक्ष दोन जागा लढणार आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष पर्वती, हडपसर आणि खडकवासला तर काँग्रेसकडून पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा ही जागा लढवण्यात येणार आहे. ठाकरे गट कोथरूड आणि वडगाव शेरीची जागा लढणार आहे.

Published On - Jun 24,2024 8:17 AM

Follow us
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.