Maharashtra Breaking News LIVE : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून आमदारांची विशेष काळजी

| Updated on: Jul 11, 2024 | 9:20 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 11 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून आमदारांची विशेष काळजी

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. सध्या सर्व पक्षांनी आपपल्या आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवले आहे. तसेच या आमदारांची मतदानासाठी रंगीत तालीमही घेण्यात आली. तसेच राज्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज बीडमध्ये होणार आहे. त्यामुळे बीडमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Jul 2024 08:06 PM (IST)

    ठाकरे गटाच्या आमदारांची आज उशिरा ITC ग्रँड हॉटेलमध्ये बैठक

    ठाकरे गटाच्या आमदारांची आज उशिरा ITC ग्रँड हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेची निवडणूक लढवत आहेत. ठाकरेंकडे केवळ 16 आमदार असताना उमेदवार मैदानात असल्याने ठाकरे गटाला मोठी कसरत करावी लागणार आहे. याच संपूर्ण नियोजनासाठी ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे.

  • 11 Jul 2024 05:52 PM (IST)

    हरियाणात INLD आणि BSP युती

    हरियाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडियन नॅशनल लोक दल (INLD) आणि बहुजन समाज पार्टी (BSP) यांच्यात युती झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी परस्पर युती केली आहे. हरियाणातील 90 जागांपैकी बसपा 37 जागांवर निवडणूक लढवणार आहे. अभय चौटाला हे आघाडीचे नेते असतील.

  • 11 Jul 2024 05:37 PM (IST)

    मनीष सिसोदिया प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी पुढे ढकलली

    मनीष सिसोदिया प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायमूर्ती संजय कुमार यांनी सुनावणीतून माघार घेतली आहे. आता सरन्यायाधीशांनी नवीन खंडपीठ स्थापन केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

  • 11 Jul 2024 05:25 PM (IST)

    ओडिशा : भाजप सरकार 25 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार

    ओडिशाचे मंत्री डॉ. मुकेश महालिंगा म्हणाले, “ओडिशात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 22 जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. 25 जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाईल. यामध्ये बरेच मुद्दे समोर येतील, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार तयार आहे, ते अर्थमंत्री देखील आहेत, आम्हाला आशा आहे की चांगला अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.”

  • 11 Jul 2024 05:10 PM (IST)

    दिशा सालियन मृत्यूप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना नोटीस

    दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांना चौकशी करायची आहे. याप्रकरणी दिशाच्या मृत्यूमागे बडे लोक, नेते आणि मंत्री असल्याचा दावा नितीश राणे यांनी केला होता. दिशाच्या मृत्यूनंतर लगेचच अभिनेता सुशांतचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. दिशा सुशांतची मॅनेजर होती.

  • 11 Jul 2024 03:58 PM (IST)

    पुण्याचे खेड तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन

    खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे यांच्या निलंबन झाले. त्यानंतर दहा दिवसांतच तहासिलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी तहसीलदार बेडसेंच्या विरोधात होत्या. त्यामुळे जनमाणसात शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

  • 11 Jul 2024 03:50 PM (IST)

    विधानसभेला महाविकास आघाडी बाजी मारणार

    विधानसभेला 288 जागांपैकी 225 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्या सोबत घेऊ.. देशात आपले राज्य प्रगत करूयात. विधानसभेला आमच्या 225 जागा निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • 11 Jul 2024 03:41 PM (IST)

    राज्यात पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स

    राज्यात उद्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. मते फुटू नयेत, आमदार कुठल्याही अमिषाला भुलू नये म्हणून राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं आहे.

  • 11 Jul 2024 03:30 PM (IST)

    काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा

    काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ बीकेसी पोलीस ठाण्यावर काँग्रेस कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. मुंबई अध्यक्ष वर्षां गायकवाड यांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिल संदर्भात अदानी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मोर्चाची परवानगी नाकारली असल्याने काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

  • 11 Jul 2024 03:20 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर नागरिकांचा गोंधळ

    कोणती ही सूचना न देता मोटार सायकल उचलण्याने भर रस्त्यात नागरिकांनी वीस मिनिटं गोंधळ घातला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर हा रोष व्यक्त करण्यात आला.

  • 11 Jul 2024 03:10 PM (IST)

    इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा हल्लाबोल

    इतिहासाचा अभ्यास नसलेला सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे, असा हल्लाबोल स अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केला आहे. मुनगंटीवार वाघनख्या बाबतीत सभागृहाच्या पटलावर धडधडीत खोटं बोलले. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, असा टोला त्यांनी लगावला.

  • 11 Jul 2024 03:00 PM (IST)

    IAS अधिकारी पूजा खेडकर वाशिममध्ये

    पुण्यात वादात अडकलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर वाशिम जिल्हाधिकारी कार्यलयात पोहचल्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचा पदभार घेतला.

  • 11 Jul 2024 02:51 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठी गर्दी

    शिवाजी महाराज चौकातील चारही रस्ते हाऊस फूल. मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणावरून जात आहेत तिथे ते मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत.

  • 11 Jul 2024 02:42 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल

    मनोज जरांगे पाटील हे आज बीड दाैऱ्यावर आहेत. आता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचले आहेत.

  • 11 Jul 2024 02:33 PM (IST)

    भाजप कार्यालयात कोअर कमिटीची बैठक

    भाजप कार्यालयात कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा होणार आहेत.

  • 11 Jul 2024 02:27 PM (IST)

    विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 अर्ज

    विधान परिषदेच्या 11 जागांसाठी बारा अर्ज आले असून ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

  • 11 Jul 2024 02:09 PM (IST)

    माधुरी अत्तरदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

    भाजपाच्या शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण .

  • 11 Jul 2024 02:02 PM (IST)

    पूजा खेडकर यांच्यावर पुणे पोलीस करणार कारवाई

    पूजा खेडकर यांच्या गाडीवर पुणे पोलिसांनी लावला 21 हजार रुपयांचा दंड. बेकायदेशीर रित्या गाडीला दिवा बसवल्याने दंड

  • 11 Jul 2024 01:54 PM (IST)

    Marathi News: मनोज जरांगेच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी जनसागर

    जरांगे पाटील यांच्या शांतता महारॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठ्यांचा जनसागर आला आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी पुरुषांसह महिलांचाही मोठया संख्येने उपस्थित आहे.

  • 11 Jul 2024 01:47 PM (IST)

    Marathi News: माजी आमदार आसिफ शेख हेच मास्टर माईंड

    मालेगावचे AIMIM चे आमदार मुफ्ती इस्माईल यांचा विधान सभेत राष्ट्रवादीच्या माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मालेगाव गोळीबार प्रकरणात आसिफ शेख मास्टर माईंड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मालेगावातील माजी महापौर गोळीबार प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख हेच मास्टर माईंड असल्याचा सनसनी आरोप केला आहे.

  • 11 Jul 2024 01:32 PM (IST)

    Marathi News: प्रशांत किशोर राजकीय पक्ष स्थापन करणार

    जनसुराज मोहिमेचे संस्थापक, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पक्ष स्थापन करणार आहे. प्रशांत किशोर 2 ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी जयंतीदिनी अधिकृतपणे एक नवा पक्षाची घोषणा करणार आहे.

  • 11 Jul 2024 01:18 PM (IST)

    Marathi News: पुण्यात अनधिकृत हॉटेलवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा

    पुण्यातील बंड गार्डन परिसरात महापालिकेकडून कारवाईला सुरूवात झाली आहे. बंड गार्डन परिसरातील अनधिकृत हॉटेलवर महापालिकेकडून कारवाईचा केली जात आहे. अनधिकृत हॉटेलसह इतर अनधिकृत आस्थापनांवर देखील महापालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.

  • 11 Jul 2024 01:05 PM (IST)

    Marathi News: सांगलीमध्ये रिक्षा, टॅक्सी चालकांचा बंद

    केंद्र सरकारकडून रिक्षा आणि टॅक्सी वाहनांना लागू करण्यात आलेल्या विलंब शुल्क विरोधात सांगलीमध्ये रिक्षा, टॅक्सी आणि व्हॅन चालक-मालक संघटनेकडून बेमुदत संप करण्यात आला आहे,मध्यरात्रीपासून सांगली शहरासह जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी रिक्षा व्यवसाय बंद ठेवत सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

  • 11 Jul 2024 12:51 PM (IST)

    वरळी हिट अँड रन प्रकरण : माझ्या हातून मोठी चूक झाला – मिहीर शाहला पश्चाताप

    वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला पोलिसांनी घटनास्थळी नेलं. त्याच्याकडून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला.

    या अपघातामे माझं संपूर्ण करिअर संपलं. माझ्या हातून मोठी चूक झाली, झालेल्या घटनेचा मला पश्चाताप आहे, अशी कबुल मिहीरने पोलिसांसमोर दिली.

  • 11 Jul 2024 12:46 PM (IST)

    वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटींचा खर्च केला जाणार हे असत्य – सुधीर मुनगंटीवार

    वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटींचा खर्च केला जाणार हे असत्य. वाघनखांसाठी जास्तीचा खर्च केलेला नाही. वाघनखांवरील विरोधकांच्या आरोपांना सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर .

  • 11 Jul 2024 12:38 PM (IST)

    नवीन पर्यटन धोरणास आज मंत्री मंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता

    नवीन पर्यटन धोरणास आज मंत्री मंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता. फाईव्ह स्टार हॉटेल, टुरिस्ट कंपन्या, ट्रॅव्हल एजंट यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार.  महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक होण्यासाठी नवीन पर्यटन धोरण. सर्व राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करून नवे धोरण तयार केले . नवीन धोरणामुळे सुमारे १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे.  मोदी सरकारच्या ३.० धोरणात पहिल्या १०० दिवसांत केलेली घोषणा होणार पूर्ण

  • 11 Jul 2024 12:19 PM (IST)

    सुशांत सिंह, दिशा सालियन केस प्रकरण दाबलं नसतं तर आदित्य ठाकरे जेल मध्ये असला असता – नितेश राणेंचा हल्लाबोल

    महाराष्ट्रचे गृहमंत्री हे युजलेस आहेत असा राऊत यांनी उल्लेख केला. पण स्वतः चा मालक उद्धव ठाकरे स्पाईन लेस आहे हे त्याला माहित नाही.

    मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका अजूनही माहित नाही. मिहीर शाह बाबत तत्परता आमच्या सरकारने दाखवली तेवढी तूझ्या महाविकास आघाडी सरकार ने केली असती का ? सुशांत सिंह, दिशा सालियन केस प्रकरण दाबलं नसतं तर आदित्य ठाकरे जेल मध्ये असला असता अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

  • 11 Jul 2024 12:03 PM (IST)

    मुंबईमध्ये आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोगसाठी कमिटी गठीत केली जाईल

    मुंबईमध्ये आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोगसाठी कमिटी गठीत केली जाईल.  मुंबईतील क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात येईल यासाठी हि कमिटी सूचना देईल. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली माहिती

  • 11 Jul 2024 11:50 AM (IST)

    मुंबई शहरात पावसाला दमदार सुरुवात

    मुंबई शहरात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाचं पुन्हा आगमन झालं आहे. अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र आता दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.

  • 11 Jul 2024 11:40 AM (IST)

    कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध कायम

    कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध कायम आहे. ‘सामुदायिक आत्मदहन करू पण हद्द वाढ होऊ देणार नाही’, असा हद्दवाढ विरोधी कृती समितीचा प्रशासनाला इशारा आहे. हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

  • 11 Jul 2024 11:30 AM (IST)

    IAS पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर

    IAS पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकर यांना मॉक इंटरव्ह्युमध्ये महाराष्ट्राशी संबंधित 2 साध्या प्रश्नांचीही उत्तर देता आली नाहीत. बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यात आल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. त्याबद्दल पूजा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं होतं.

  • 11 Jul 2024 11:20 AM (IST)

    हाथरसमधील ठाणे सिकंदररावच्या टोली गावाजवळ डबल डेकर बसची ट्रकला धडक

    उत्तर प्रदेशः हाथरसमधील ठाणे सिकंदररावच्या टोली गावाजवळ डबल डेकर बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 16 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी दिली.

  • 11 Jul 2024 11:10 AM (IST)

    दुबई किंवा श्रीलंकेत ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने आयोजित करण्याची बीसीसीआयची मागणी

    2025 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही. बीसीसीआय आयसीसीला दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्यास सांगेल, अशी माहिती बीसीसीआय सूत्रांनी ‘एएनआय’ला दिली.

  • 11 Jul 2024 10:54 AM (IST)

    Maharashtra News : शिंदे समितीकडून हैदराबाद येथे जुन्या नोंदीची तपासणी

    शिंदे समितीला महत्वाचे रेकॉर्ड मिळल्याची माहिती. शिंदे समितीने हायद्राबादेत 5 हजार कागदपत्रे तापसल्याची माहिती. 5 हजार कागदपत्रे स्कॅन करून मिळणार महाराष्ट्र शासनाला. 1881 आणि 1901 च्या जनागणेचीही शिंदे समितीकडून पाहणी. 39 टक्के कुणबी समाज मराठवाड्यात असल्याची नोंद मिळाल्याची माहिती.

  • 11 Jul 2024 10:53 AM (IST)

    Maharashtra News : अमली पदार्थ प्रकरणावर ठाकरे गट आक्रमक

    अमली पदार्थ प्रकरणावर ठाकरे गट आक्रमक. लक्ष्मी ताठे यांची उच्चस्तरीय चौकशी करा. तेलंगणा पोलिसांना माहिती मिळते ती महाराष्ट्र पोलिसांना मिळत नाही का ?. ठाकरे गट घेणार पोलीस आयुक्तांची भेट. ताठे यांच्या चौकशीत अनेक मोठे नाव समोर येण्याची शक्यता. शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष विलास शिंदे यांची माहिती

  • 11 Jul 2024 10:22 AM (IST)

    Maharashtra News : कावेरी नाखवा यांचा जीव 10 लाखाचा आहे का? संजय राऊत

    “आरोपीला कठोर शिक्षा होत नाही, तो पर्यंत त्या 10 लाखाला किंमत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव 10 लाखाचा आहे का? राज्याचा गृहमंत्री युजलेस आहे. गृहमंत्र्यांकडून साधी संवेदना नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 11 Jul 2024 10:14 AM (IST)

    Maharashtra News : विधान परिषद निवडणुकीच्या आधीच भाजप उमेदवाराकडून विजयी पोस्ट

    विधान परिषद निवडणुकीच्या आधीच भाजप उमेदवाराकडून विजयी पोस्ट. अभिनंदन करण्यासाठी चलो मुंबईचा नारा. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्याकडून विजयाचे व्हॉट्सॲप स्टेटस. “चलो मुंबई, चलो मुंबई योगेशअण्णा टिळेकर यांची विधान परिषद महाराष्ट्र आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चलो मुंबई” अशी पोस्ट. पोस्टवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांचे फोटो

  • 11 Jul 2024 09:54 AM (IST)

    अजित पवार गटाच्या नेत्या अर्चना पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला…

    अजित पवार गटाच्या नेत्या अर्चना पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला… धाराशिवमधील शांतता रॅली संपन्न झाल्यानंतर झाली भेट…

  • 11 Jul 2024 09:47 AM (IST)

    मुंबईत अनेक ठिकाणी रात्री उशिरा पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले

    मुंबईत अनेक ठिकाणी रात्री उशिरा पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. कांदिवली पश्चिम पटेल नगर, सागवाडी मध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी अजूनही लोकांच्या घरात साचले आहे… या भागात पूरसदृश परिस्थिती असून, घरात पाणी शिरल्याने नागरिक चिंतेत आहेत.

  • 11 Jul 2024 09:38 AM (IST)

    मंबई कोस्टल रोडचा तिसरा आजपासून सुरु

    कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी वेगवान… हाजी आली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत कोस्टल रोड सुरु… कोस्टल रोडवरून 300 मीटर अंतरावरून वरळी सी – लिंकवरही जाता येणार…

  • 11 Jul 2024 09:25 AM (IST)

    पूरग्रस्त भागात साथीचे आजार पसरण्याची भीती

    पूरग्रस्त भागात साथीचे आजार पसरण्याची भीती… अशा आजारांना आळा बसावा यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पूरग्रस्त भागातील १३४ घरांमधील ४९१ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच त्यांना आजारांची लागण होऊ नये, यासाठी अँटी बायोटिक औषधांचा डोस देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली…

  • 11 Jul 2024 09:13 AM (IST)

    विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वारीत सहभागी होणार

    विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वारीत सहभागी होणार… येत्या रविवारी राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याची माहिती.. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना वारीत सहभागी होण्याचे दिलं होतं निमंत्रण… वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार

  • 11 Jul 2024 08:39 AM (IST)

    Maharashtra News : विधानपरिषदेच्या मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून विशेष काळजी

    Maharashtra News : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी भाजप, ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि शिंदे गटाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. केवळ काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हॉटेल वारीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय.

  • 11 Jul 2024 08:36 AM (IST)

    Maharashtra News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची डान्सबार वरील कारवाई थंडावली

    Maharashtra News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची डान्सबार वरील कारवाई थंडावली, पोलिसांनी शहरात ३३ बार अनधिकृत असल्याचा अहवाल पालिकेला देऊन पालिकेकडून फक्त आठ बारवर कारवाई करण्यात आली. पालिकेची कारवाई थांबवल्याने इतर बारला आशीर्वाद कोणाचा असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. तर आपत्ती व्यवस्थापनात व्यस्त असल्याने कारवाईचा वेग कमी झाला असून कारवाई करणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

  • 11 Jul 2024 08:33 AM (IST)

    Maharashtra News : अंबरनाथमधील अनधिकृत ढाब्यांवर कारवाई

    Maharashtra News : अंबरनाथमध्ये अनधिकृत ढाबे आणि टपऱ्यांवर पालिकेनी कारवाई केली आहे. तर पालेगाव चौकातील भोज किंग हॉटेलसह चार अनधिकृत ढाबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अतिक्रमण विभाग प्रमुख संदीप कांबळे आणि क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र संख्ये यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

  • 11 Jul 2024 08:29 AM (IST)

    Maharashtra News : सांगलीतील पाणी प्रश्न पुन्हा पेटणार

    सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न पुन्हा पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाण्यापासून वंचित गावांच्या पाणी प्रश्नासाठी तुकाराम बाबा महाराजांनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. माडग्याळहून अंकलगी तलावात म्हैसाळ सिंचन योजने पाणी सोडण्याबाबत येत्या 22 जुलैपर्यंत कार्यवाही न केल्यास, रक्त घ्या पाणी द्या आंदोलन करत आमरण उपोषणासह रस्ता रोको करण्याचा इशारा देत कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. पाणी देण्यासाठी 26 कोटींचे तरतूद होऊन देखील गेल्या सहा महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांची फसवणूक झाल्याचा आरोप करत तुकाराम महाराजांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पाटबंधारे विभागाला निवेदन देत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.

Published On - Jul 11,2024 8:25 AM

Follow us
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.