Maharashtra Breaking News LIVE : उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर

| Updated on: Jul 07, 2024 | 9:41 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 7 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. बारामती ते काटेवाडीपर्यंत अजित पवार पायी चालत जाणार आहेत. तसेच मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सध्या जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Jul 2024 09:22 PM (IST)

    रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शाळांना उद्या सुट्टी जाहीर

    रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • 07 Jul 2024 06:48 PM (IST)

    लाडकी बहिण योजना लागू केल्यावर

    लाडकी बहिण योजना लागू केल्यावर मनसेकडून चेंबूर आणि सायनमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसेकडून सवाल विचारण्यात येतोय. लाडक्या बहिणीला दिलासा दिला तसा लाडक्या भावाला दिलासा कधी देणार? असा प्रश्न मनसेकडून विचारण्यात आला आहे. वाहनांवरील इ चलानची रक्कम माफ करा, उत्तर प्रदेश, कर्नाटक सरकार जर माफ करू शकते तर महाराष्ट्र सरकार का माफ करू शकत नाही? असा प्रश्न मनसेच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला आहे.

  • 07 Jul 2024 04:57 PM (IST)

    आग्रा: खंडौली येथे एका महिलेसह आठ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

    आग्रा यमुना द्रुतगती मार्गाजवळील खंडौली भागातील तलावात आठ मुले आणि एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. मुलांना वाचवण्यासाठी महिलेने तलावात उडी मारली होती.

  • 07 Jul 2024 04:45 PM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी पुरीमध्ये दाखल

    भगवान जगन्नाथ रथयात्रेतील भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरीमध्ये पोहोचल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री मोहन चरण माझी, ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि इतर मान्यवरही तेथे उपस्थित आहेत.

  • 07 Jul 2024 04:40 PM (IST)

    उत्तर भारतात जवळपास सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता: IMD

    हवामान परिस्थितीबाबत दिल्लीतील आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार म्हणाले की, मान्सून सक्रिय टप्प्यात आहे. त्याच्या प्रभावामुळे आज उत्तर भारतात जवळपास सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • 07 Jul 2024 04:38 PM (IST)

    वसई परिसरात पुरात अडकलेल्या 16 जणांची सुटका

    एनडीआरएफच्या टीमने वसई परिसरात पुरात अडकलेल्या 16 जणांची सुटका केली आहे. हे सर्व लोक शेतात कामाला गेले असताना अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सर्वजण शेतात अडकून पडले. प्रशासनाला माहिती मिळताच एनडीआरएफ टीमला माहिती देण्यात आली आणि त्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.

  • 07 Jul 2024 02:52 PM (IST)

    उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर

    उद्धव ठाकरे शेतीची पाहणी करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या निप्पणी शिवारात उद्धव ठाकरे पाहणी करत आहेत.  पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे.  या अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत.

  • 07 Jul 2024 02:45 PM (IST)

    डोंबिवलीतील एमआयडीसीत पुन्हा आग

    डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे. डोंबिवलीतील एमआयडीसीत दोन स्फोट झाले आहेत. याआधीही या एमआयडीसीत असे स्फोट झाले होते. आज पुन्हा एकदा स्फोट झालेत.

  • 07 Jul 2024 02:30 PM (IST)

    उद्धव ठाकरे आरक्षणावर काय म्हणाले?

    मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या उरावर बसवलं जात आहे. पण आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव आणा. मराठा, ओबीसी आणि धनगर समाजातील प्रतिष्ठितांना चर्चेसाठी बोलवा. जरांगेंनाही चर्चासाठी बोलवा. आरक्षणावर सरकारने सर्वमान्य निर्णय घेतला पाहिजे, त्याला माझा पाठिंबा असेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 07 Jul 2024 02:15 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर निशाणा

    उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाने मिळवलेला विजय हा चोरून मिळवलेला विजय आहे. महायुतीचा पापांचा घडा भरलाय. ही पापं झाकण्यासाठी योजनांचं पांघरूण घातलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 07 Jul 2024 01:46 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी

    बावनकुळे यांच्या आईच्या निधनानंतर घेत आहे सांत्वना भेट.

  • 07 Jul 2024 01:43 PM (IST)

    जरांगे पाटील परभणीत दाखल

    रायगड कॉर्नर येथे लाखोंचा जनसमुदाय उसळला. काही वेळात रायगड कॉर्नर या ठिकाणी जरांगे पाटील येणार आहे, रायगड कॉर्नर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरापर्यंत जरांगे पाटील शांतता रैली काढणार आहेत.

  • 07 Jul 2024 01:24 PM (IST)

    राजू शिंदे यांच्या समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

    शिवसंकल्प मेळाव्याच्या सभागृहात एन्ट्री करताना घोषणा बाजी. राजू भाऊ तुम आगे बढ़ो म्हणत घोषणा बाजी..

  • 07 Jul 2024 01:13 PM (IST)

    मराठा आंदोलकांनी फाडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर

    नूतन मैदान परिसरात जरांगे पाटील काही वेळात दाखल होणार त्याआधी आंदोलकांकडून फाडण्यात आला मुख्यमंत्र्यांचा बॅनर. शिंदे गटाचे शहीद खान यांच्याकडून खिचडी वाटप स्टॉल येथे मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात आला होता.

  • 07 Jul 2024 01:04 PM (IST)

    पनवेल मधील पडघे गावात पुराचं पाणी शिरलं

    कासाडी नदीचं पाणी अनेकांच्या घरात. पनवेल शहरात रिमझिम पावसाला सुरुवात.

  • 07 Jul 2024 01:02 PM (IST)

    जवळाबाजारात जरांगे यांचे स्वागत

    नुकताच मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीच्या जवळाबाजार येथे पोहोचले आहेत, यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

  • 07 Jul 2024 12:55 PM (IST)

    Maharashtra News : कळंबोली येथे मुसळधार पावसामुळे पटरीवर पाणी

    कळंबोली येथे मुसळधार पावसामुळे पटरीवर पाणी… कोकणातून येणाऱ्या गाड्या अडकल्या… सध्या मेंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईला येताना अडकली आहे… प्रवाशी गाडीतून उतरून पायी प्रवास करू लागले आहेत…

  • 07 Jul 2024 12:47 PM (IST)

    Maharashtra News : लोकसभेत चांगलं यश, राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष – नितिन राऊत

    लोकसभेत चांगलं यश, राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, 288 जागांवर आमची चाचपणी सुरु आहे… मविआ म्हणूनच विधानसभा निवडणूक लढणार… असं वक्तव्य नितिन राऊत यांनी केलं आहे.

  • 07 Jul 2024 12:40 PM (IST)

    Maharashtra News : सुप्रिया सुळेंना येवल्याच्या कार्यकर्त्याने दिली पैठणी भेट

    सुप्रिया सुळेंना येवल्याच्या कार्यकर्त्याने दिली पैठणी भेट… कार्यकर्ते म्हणाले ताई येवल्यावर लक्ष असू द्या… तुमचा उमेदवार ठरला आहे का ? ताईंचा सवाल… तर तुमच्या मनासारखं होईल ताईंची प्रतिक्रिया

  • 07 Jul 2024 12:22 PM (IST)

    Maharashtra News : मनोज जरांगे यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेनिमित्त आज बैठक

    सभेच्या निमित्ताने पुणे जिल्हा स्तरीय नियोजन बैठक… दुपारी ३ वाजता चांदणी लॉनस् येथे आज बैठक… अखंड मराठा समाज, पुणे शहरातर्फे बैठकीचे आयोजन… पुण्यातील रेस कोर्स मैदानावर होणार जरांगे यांची सभा… महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सभेचे आयोजन…

  • 07 Jul 2024 12:15 PM (IST)

    Maharashtra News : वरळी हिट अँड रण प्रकरणी मोठी अपडेट

    वरळी हिट अँड रण प्रकरणात वरळी पोलिसांकडून फॉरेन्सिक टीम ला बोलवले आहे. BMW गाडीची rto चाचणी देखील केली जाणार आहे… घटना स्थळाचे cctv पोलिसाकडून जप्त केले आहेत.

  • 07 Jul 2024 12:08 PM (IST)

    Maharashtra News : शहापूर तालुक्यात दमदार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती

    शहापूर तालुक्यात दमदार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती… शहापूर तालुक्यात एनडीआरएफचं पथक दाखल…

  • 07 Jul 2024 11:50 AM (IST)

    राजू शिंदे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज

    राजू शिंदे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज झाले आहेत. “राजू शिंदे यांनी लोकसभेला माझ्याविरोधात काम केलं. राजू शिंदे यांनी मला पाडलं. संदीपान भुमरे यांना 25 हजार मतं मिळवून दिली. पण आता उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. राजू शिंदे यांनी खूप वेळा आमच्याबद्दल उद्धव साहेबांबद्दल टीका केलेली आहे हे सगळं रेकॉर्डवर आहे. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले तर विधानसभा निवडणूक लढवणार. नशिबात जे असेल ते मिळणार. गद्दाराला पाडण्यासाठी मला आदेश दिला तर मी लढणार,” असं खैरे म्हणाले. संजय शिरसाठ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे चंद्रकांत खैरे यांनी संकेत दिले आहेत.

  • 07 Jul 2024 11:40 AM (IST)

    मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना

    कांदिवली परिसरातून राजेश शहा यांच्या मुलाला आणि चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. काही वेळात वरळी पोलिस स्टेशनमध्ये या दोघांना घेऊन येणार आहे. जखमी प्रदिप नाखवाने मिहिर शाह गाडी चालवत असल्याचा आरोप केला आहे.

  • 07 Jul 2024 11:30 AM (IST)

    मध्य रेल्वे विस्कळीत

    पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी येथे रद्द करण्यात आली असून चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. अनेक रेल्वे गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. प्रवाशी मुंबई आणि नाशिकला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घेत आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तास लागणार असल्याची शक्यता मध्य रेल्वे प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

  • 07 Jul 2024 11:20 AM (IST)

    अजित पवार गटाला नाशिकमध्ये शरद पवार गटाचा धक्का

    नाशिकचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. माजी आमदार नितीन भोसले यांनी ही माहिती दिली. आज १०० पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

  • 07 Jul 2024 11:10 AM (IST)

    कसरा लाईनवर रेल्वे सेवा विस्कळीत

    वाशिंद, खडवली, आटगावदरम्यान माती वाहून गेल्याने पोल वाकला. त्यामुळे ओव्हरहेडवायरवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे स्टेशनपुढे ट्रॅकवर झाड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा ते कसारादरम्यान अप आणि डाऊन मार्ग पूर्णपणे ठप्प झालं आहे. रविवारी विशेष मेगाब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत असून मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने मेगा ब्लॉक देखील रद्द करण्यात आला आहे.

  • 07 Jul 2024 10:57 AM (IST)

    महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प

    महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. चिखली जवळच्या घाटात वारंवार दरड कोसळत असल्यामुळे तापोळासह दरेगाव वाला जाणारा रस्ता बंद होत आहे.

  • 07 Jul 2024 10:46 AM (IST)

    Marathi News: नागपूरमध्ये रिमझिम पावसाला सुरवात..

    नागपूर शहरात रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. शहराकत सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरींना सुरवात झाली आहे. जुलै महिन्यात दमदार पावसाचा अपेक्षा असून अजूनही पाहिजे तसा पाऊस अद्याप पडला नाही.

  • 07 Jul 2024 10:32 AM (IST)

    Marathi News: शेतकऱ्यांवर सरकार असंवेदनशील

    शेतकरी आणि महिलासंदर्भात सरकार असंवेदनशील आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. राज्यात भ्रष्ट जुमला पार्टीचे सरकार आहे. भ्रष्टाचारांना भाजप रोज क्लीन चीट देत असे त्यांनी म्हटले.

  • 07 Jul 2024 10:23 AM (IST)

    Marathi News: बदलापुरच्या उल्हास नदीचा प्रवाह वाढला

    बदलापुरच्या उल्हास नदीचा प्रवाह वाढला. उल्हास नदी चौपाटी पाण्याखाली गेली आहे. घाटावर पडणाऱ्या पावसामुळे नदीला पाणी आले आहे. मध्यरात्रीपासूनच बदलापूर शहरात पावसाचे रिमझिम सुरूच आहे.

  • 07 Jul 2024 10:04 AM (IST)

    Marathi News: भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस

    भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत अर्धा टीएमसी पाण्याची विक्रमी आवक झाली आहे. ५२१ दशलक्ष घनफूट पाणी धरणात नव्याने दाखल झाला आहे. घाटघर, पांजरे आणि रतनवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणाचा पाणीसाठा पोहचला २४ टक्क्यांवर गेला आहे.

  • 07 Jul 2024 09:29 AM (IST)

    Maharashtra News : वसई-ठाणे भुयारी प्रवासाला मंजुरी

    Maharashtra News : ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि ठाणे, वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास अतिवेगवान करण्यासाठी आता ‘एमएमआरडीए’ने वसई, फाऊंटन हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास मंगळवारी एमएमआरडीएच्या प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे दोन्ही प्रकल्प अंदाजे 20 हजार कोटी खर्चाचे आहेत.

    तसेच ठाणे ते बोरीवली प्रवास अति जलद करण्यासाठी एम एम आर डी ने ठाणे ते बोरवलीदरम्यान 11.8 किमी चा दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.

  • 07 Jul 2024 09:27 AM (IST)

    Maharashtra News : ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरे देणार भाजपला धक्का

    Maharashtra News : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देणार आहे. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत पाच ते सहा नगरसेवक हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

Published On - Jul 07,2024 9:23 AM

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.